मुंबई च्या जुन्या भूभागानुसार सायन हा परिसर शहराच्या वेशीवर होता. यामुळेच मराठी मधे Sion उपनगराला ‘शीव’ नाव पडले. पण पोर्तुगीज वसाहत काळात त्यांनी दिलेले Sion हेच नाव आज प्रचलित आहे. पोर्तुगीजांनी हे नाव इस्राएल, जेरुसलेम च्या एका पवित्र स्थानावरून घेतले आहे. मुंबई च्या इतिहासातले हे पान रंजक आहे
मुंबईतील टेकडी जवळचे Sion station
1853 ला पहिली मुंबई-ठाणे लोकल ट्रेन सुरू झाली तेंव्हा Sion च्या शिव मंदिर तलावातून वाफेच्या रेल्वे इंजिनात पाणी भरण्यासाठी रेल्वे इथे थांबत असे. तेंव्हा SION Station मात्र कुर्ल्याच्या बाजूला पुढे चुनाभट्टी इथे होते. हे स्टेशन नंतर मागे आले व तलावा जवळच असलेल्या Sion Hillock या टेकडीला लागूनच बांधण्यात आले. ब्रिटिश रेल्वे प्रशासनाने पोर्तुगीजांच्या जुन्या दफ्तर नोंदी नुसार SION हे नाव स्टेशन ला दिले.
ब्रिटिशांनी रेल्वे सुरू करण्याच्या 100 वर्षे आधी पोर्तुगीजांनी Sion नाव दिले होते
मूळ मराठी नाव शीव म्हणजे सीमा
इ.स. १५४३ मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईच्या सात बेटांचा ताबा घेतला, त्यावेळी या भागाला ‘शीव’ (Sheev) या स्थानिक मराठी नावाने ओळखले जात असे, ज्याचा अर्थ ‘सीमा’ किंवा ‘हद्द’ असा होता . कारण शिव हे गाव मुंबई बेट आणि साल्सेट बेट( पश्चिम मुंबई) यांच्यातील सीमेवर वसलेले होते .
Mount Zion वरून हे नाव पोर्तुगीजांनी दिले – उच्चार SION झाला
पोर्तुगीजांनी या टेकडीला जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘माउंट झिऑन’ (Mount Zion) या पवित्र टेकडीच्या सन्मानार्थ हे Zion नाव दिले . ‘माउंट झिऑन’ चा उल्लेख बायबल च्या जुन्या करारात (Old Testament) आढळतो . या धार्मिक कारणामुळेच पोर्तुगीज वसाहत काळात या भागाचे नाव ‘सायन’ (Sion) असे रूढ झाले. (पोर्तुगीज भाषेत ‘सियाओ’ (Sião) असा उच्चार ही आढळतो).
उच्चार अपभ्रंश प्रवास : झिओन → सिऑन →सायोन →सायन असा मानता येईल.
पोर्तुगीजांकडून मुंबई बेटांची मालकी मिळाल्यानंतर जेसुइट पाद्र्यांनी हे नाव दिले असाही समज आहे.
पोर्तुगीजांनी जेसुइट (Jesuit) पाद्र्यांना सायन ,वडाळा, परळ, वांद्रे या बेटांची मालकी दिली होती. या पाद्र्यांनी सध्याच्या सायन रेल्वे स्थानकाजवळील टेकडीवर एक चर्च (चॅपल) बांधले . हे चर्च तेंव्हा ‘नोसा सेन्होरा दि बोम कॉन्सेल्हो’ (Nossa Senhora de Bom Conselho) या नावाने ओळखले जात असे. आज मात्र ते ‘आवर लेडी ऑफ गुड काउंसल’ (Our Lady of Good Counsel) या नावाने प्रसिद्ध आहे. इथे याच नावाचे प्रसिद्ध Convent school ही आहे. ( Mumbai History – मुंबई चा इतिहास)
Mount Zion चे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व
बायबल मधे Mount Zion चा उल्लेख आहे
बायबल मधे , विशेषत: जुन्या करारात झिऑन चा उल्लेख अनेक वेळा येतो. ZION अर्थात ‘देवाच्या घरावर’ Babylon चा राजा डेव्हिड याने कसा कब्जा केला या ऐतिहासिक संदर्भा अनुषंगाने हा उल्लेख विशेषतः आढळतो. नव्या करारात “ZION” हा शब्द स्वर्ग या प्रतीक अर्थाने येतो. येशू ख्रिस्त यांच्या जीवन संदर्भात जेरुसलेम हा प्रदेश महत्वाचा आहे. इथल्याच ‘झिऑन टेकडीवर’ LAST SUPPER हा प्रसंग घडला होता अशी लोकांची श्रद्धा आहे.
Zion टेकडीवर Upper Room – वरच्या खोलीमधले ख्रिस्ताचे शेवटचे भोजन

येशू ख्रिस्तांनी क्रुसावरील मृत्यू नंतर पुनरुत्थान (Resurrection) दर्शन दिले व त्यांनी आपल्या अनुयायांसह शेवटचे भोजन (Last Supper)केले अशी बायबल मधे नोंद आहे. हे भोजन जिथे झाले ती वरची खोली Jerusalem च्या Mount Zion टेकडीवर होती असे ‘लोक-श्रद्धेतून’ मानले जाते. Mount Zion ला देवाचे घर असेही म्हटले जाते.
ऐतिहासिक महत्व
माउंट झिऑन ही जेरुसलेमच्या दोन टेकड्यांपैकी पूर्वेकडील टेकडी होती. इ.स.पू. १०व्या शतकात Babylon (इराक) चा राजा दावीदा (David) याने जेबुसी लोकांचा Zion हा किल्ला जिंकला आणि ती आपली राजधानी बनवली असा ऐतिहासिक घटनेचा उल्लेख बायबल मधे आहे (२ शमुवेल ५:६-९) . राजा डेव्हिड ने इथल्या स्थानिक लोकांना बंदी बनवून Babylon च्या टिग्रिस नदी काठच्या प्रांतात शेतमजुरी व इतर कष्टप्रद कामांसाठी गुलामांसारखे वापरले. या गुलामांच्या मनात Mount Zion मायभूमी चे प्रतीक म्हणून कायम राहिला . याच भावनेने पुढे आफ्रीकन अश्वेतांच्या मुक्ती चळवळीला, Zionism (‘झिऑनिझम’) हे नाव मिळाले. Boney M या ७० च्या दशकातील Disco Group ने बनवलेल्या प्रसिद्ध गाण्यात ZION चा उल्लेख मायभूमी या अर्थाने आला आहे.
Boney M Disco Group चे प्रसिद्ध गाणे- ZION चा Pop संस्कृति मधे महत्वाचा उल्लेख
“By the rivers of Babylon ” सायोन ची आठवण – African रास्ताफारी मुक्ती चळवळीत ZION हे मुक्तीचे प्रतीक
Boney M या पश्चिम जर्मनीतील Disco Group ने १९७८ मध्ये “By the Rivers of Babylon” हे गाणे प्रसिद्ध केले.
हे गाणे जुन्या करारातील स्तोत्र १३७ (Psalm 137) वर आधारित आहे, ज्यात ज्यू लोक बॅबिलोनमधे गुलामी चे कष्टप्रद आयुष्य जगताना आपली Israe मधील मायभूमी ‘Zion’ (सायन/झिऑन) ची आठवण काढून रडतात. हे गाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ” सागरा प्राण तळमळला” सारखेच मायभूमी ची आर्त आठवण व्यक्त करणारे आहे.
Boney M ने या गाण्यात Bible -जुन्या करारातील ४ श्लोक वापरले आहेत, कारण त्यातील दुःखं आणि विरहाचा भाव आणि विशेषतः ZION हे ठिकाण रस्ताफारी (Rastafarian) संस्कृतीत मुक्ती आणि आशेचे प्रतीक मानले जाते.
या गाण्याने जुन्या करारातील ‘Zion’ हा शब्द जगभरातील संगीतप्रेमींच्या मनात कायमचा कोरला.
गाण्यात ‘Zion’ चा उच्चार “साय-ऑन” (Zy-on) असा केला, तर मूळ इंग्रजीत तो “झाय-अन” (Zy-un) आहे.

Boney M ने Jerusalem च्या ZION टेकडिचा उल्लेख असलेले गाणे Bible,Old Testament मधून कसे घेतले आहे हे दाखवणारी @yourfevbuiniga या अकाऊंट ची खालील Instagram Reel जरूर पहा ⬇️
निष्कर्ष
पोर्तुगीजांनी इस्राएल देशातील ‘Mount Zion’ चे नाव मुंबईतील टेकडीला का दिले, यामागे धार्मिक, वसाहतवादी आणि भौगोलिक अशी तीन कारणे होती.
- धार्मिक: Portuguese हे कॅथोलिक ख्रिश्चन असल्याने, त्यांना Jerusalem या ‘पवित्र भूमी’ (Holy Land) चा आदर होता आणि त्यांना आपल्या भारतातील नवीन वसाहतीला त्या पवित्र ठिकाणाशी जोडायचे होते.
- वसाहतवादी: १६व्या शतकातील पोर्तुगीज वसाहतवाद्यांची ‘नवीन ख्रिस्ती जग’ निर्माण करण्याची मानसिकता होती, ज्यात ते बायबलमधील स्थळांची नावे आपल्या वसाहतींना देत असत.
- भौगोलिक: जेसुइट पाद्र्यांनी या टेकडीची निवड केली, कारण ती जेरुसलेमच्या टेकडीप्रमाणे उंच आणि दृश्यमान होती. आणि शक्यता अशी ही सांगता येते की, मराठीत ‘शीव’ (सीमा) या अर्थाशी Israel चा ‘माउंट झिऑन’ जवळीक करतो कारण तो भौगोलिक दृष्टिने Israel व यहूदा या दोन राज्यांची ‘सीमा’ होवून उभा होता.
टीप: ब्रिटीशांनी ज्या टेकडीवर नंतर Sion Fort बांधला व सायन स्टेशन ला लागून असलेली चर्च ची टेकडी हे दोन्ही पोर्तुगीज काळात सलग असा एक डोंगरी भाग असावा. पोर्तुगीजांनी ज्याला ZION म्हटले त्यात सायन कील्ला असलेला डोंगर ही समाविष्ट असावा.
संदर्भ ग्रंथ:
- da Cunha, J. Gerson. (1900). The Origin of Bombay. Bombay: Journal of the Bombay Branch of the Royal Asiatic Society. (मुंबईतील पोर्तुगीज काळातील नावांच्या उगमासाठी)
- Edwardes, S. M. (1902). The Rise of Bombay: A Retrospect. (Census of India, 1901, Vol. I). Bombay: Times of India Press. (पोर्तुगीज व ब्रिटिश काळातील ऐतिहासिक घटनांसाठी)
FAQ
मुंबईतील ‘सायन’ हे नाव ज्यू समुदायाने दिले का?
नाही. SION हे नाव पोर्तुगीज वसाहतकर्त्यांनी दिले आहे. त्यांनी जेरुसलेममधील ‘माउंट झिऑन’ (जुना करार) वरून या टेकडीला ‘Sião’ (सायन) असे नाव दिले
सायन(SION) आणि ‘झिऑन’ (Zion) मध्ये काय फरक आहे?
झिऑन’ (Zion) हे जेरुसलेममधील ऐतिहासिक टेकडीचे मूळ नाव (जुना करार). ‘सायन’ (Sion) हा पोर्तुगीज उच्चार (Sião) चा अपभ्रंश आहे, जो मुंबईत रूढ झाला. दोन्ही शब्दांचा उगम एकच, पण उच्चार आणि स्थान वेगळे.
शीव’ आणि ‘सायन’ ही दोन्ही नावे एकाच ठिकाणाची आहेत का?
होय. ‘शीव’ (Śīv) हे मूळ मराठी नाव आहे, ज्याचा अर्थ ‘सीमा’ (हद्द) असा होतो. ‘सायन’ हे पोर्तुगीजांनी दिलेले नाव. दोन्ही नावे एकाच भागाला वापरली जातात.
Boney M. च्या गाण्यातील ‘Zion’ आणि मुंबईतील ‘Sion’ यांचा काय संबंध आहे ?
Boney M चे गाणे थेट जेरूसेलम च्या पवित्र ZION टेकडीचा उल्लेख करते. मुंबई उपनगराचे SION नाव त्याच टेकडीचे स्मरण म्हणून दीले आहे.
सायनला चर्च ची टेकडी आणि सायन किल्ला अशा दोन टेकड्या का आहेत?
पोर्तुगीज काळात हा एकाच डोंगररांगेचा भाग होता. नंतर ब्रिटिशांनी १८०५ मध्ये खाडी भरून ‘सायन कॉझवे’ रस्ता बांधला, त्यामुळे हा परिसर दोन विभागांत विभागला गेला. चर्च हे जुने पोर्तुगीज बांधकाम असून किल्ला नंतरचा ब्रिटिशांनी बांधलेला आहे.
हे ही वाचा
भोपाळ चे एक वकील आहेत फ्रांसचे राजा – Nepoleon 4 – French king in Bhopal
The Great Maratha Mahadji Shinde यांचे जन्मगाव कोणते? श्रीगोंदा, जामगाव की कण्हेर खेड..

