ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स (NSW) संसदेतील लिबरल पक्षाचे खासदार जॉर्डन लेन (Jordan Lane) यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आपल्या निरोपाच्या भाषणादरम्यान (Valedictory Address) गेले दशकभर प्रेयसी असलेली नताली (Natalie) हिला भर संसदेत लग्नाची मागणी घातली.
नेमके काय घडले?
Australia Parliament Marriage Proposal : रायड (Ryde) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे 32 वर्षीय तरूण खासदार जॉर्डन लेन सभागृहात आपले शेवटचे भाषण देत होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी वर पब्लिक गॅलरीमध्ये बसलेल्या नतालीकडे पाहत विधानसभेच्या अध्यक्षांना (Speaker) उद्देशून म्हटले,
“अध्यक्ष महोदय ! रायडचा खासदार म्हणून हा माझा शेवटचा प्रश्न ..आणि तो माझी प्रेमिका नताली हिला आहे.”
असे म्हणत त्यांनी कोटाच्या खिशातून आंगठी ची डबी काढली. Jordan यांचा हात यावेळी भावना आवेगाने थरथरला. त्यांनी गॅलरी कडे जात पुढे प्रेयसी नताली ला ..
“तू माझ्याशी लग्न करशील का?”
असा प्रश्न केला. यावेळी नताली ही लज्जा,आनंद,संकोच अशा संमिश्र भावाने पुढे आली व तिने जॉर्डन यांच्या या अनोख्या Parliament Marriage Proposal ला होकार दिला.
खालील @brutindia च्या video मधे आपण या प्रसंगाचे काही क्षण पाहू शकता
नतालीचा होकार आणि संसदेची नोंद
नतालीने या प्रस्तावाला तात्काळ होकार दिल्या नंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. जॉर्डन लेन यांनी तिला अंगठी घातली आणि संसदीय कामकाजाच्या अधिकृत नोंदीत (Hansard) “तिने ‘हो’ म्हटल्याची नोंद करावी !” अशी मिश्किल विनंतीही अध्यक्षांना केली.
दशकाहून अधिक काळाचे नाते
जॉर्डन आणि नताली गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून एकत्र आहेत. लेन यांनी या प्रसंगाला आपल्या ‘आयुष्यातील एक मोठे पाऊल’ संबोधले आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना “माझे माझ्या रायड या मतदार संघावर प्रेम आहे आणि नेहमीच राहील, पण माझे नतालीवर त्याहून जास्त प्रेम आहे” अशी भावनिक पोस्ट लिहिली.
Parliament Marriage Proposal वर अध्यक्षांची प्रतिक्रिया
NSW विधानसभेचे अध्यक्ष ग्रेग पायपर (Greg Piper) यांनी या अनोख्या क्षणाचे स्वागत करत, “५८ वी संसद ही ‘प्रेमाची संसद’ (Parliament of Love) म्हणून कायम लक्षात राहील,” अशी मजेशीर टिप्पणी केली.
राजकारणातून निवृत्तीचा निर्णय
या प्रपोजलच्या काही दिवस आधीच (६ नोव्हेंबर रोजी) जॉर्डन लेन यांनी आगामी मार्च २०२७ मधील राज्य निवडणूक न लढवण्याची आणि सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे रायड चे खासदार म्हणून सभागृहातील त्यांचा हा शेवटचा दिवस अविस्मरणीय ठरला.
नताली कोण आहे ?
खासदार जॉर्डन यांची प्रेयसी व सध्या वागदत्त वधू असलेली नताली ही प्रसिद्धी पासून दूर राहणारी private person आहे असे समजते. Jordan हे नगरसेवक असल्यापासून खासदार होईपर्यंत नतालीने त्यांना साथ दिली आहे.या दरम्यान त्यांनी रायडचे सर्वात तरूण महापौर म्हणून पद ही भूषवले. Jordan यांनी Instagram वर पोस्ट केलेल्या Video च्या विवेचनात ही नताली च्या आडनावाचा देखील उल्लेख केलेला नाही.
हे ही वाचा
फ्रांस च्या अध्यक्षांना पत्नीचा धक्का: French President GROUNDED by wife at Vietnam airport
शरद पवार यांचा वेगळा विजय – पवारांचा नातू आहे Basketball खेळाडू
Ajit Pawar Air Crash- Bombardier Learjet 45 विमान दोषी?- विमानाचा इतिहास आणि अपघातांचा मागोवा..
पॅरिस च्या आयफेल टॉवर वर सायकल चढवणारा तरूण-Aurélien Fontenoy (Record du Monde)

