मुंबई विभागासाठी FYJC प्रवेश प्रक्रिया २०२५-२६: संपूर्ण माहिती
मुंबई विभागासाठी FYJC online Admission प्रवेश प्रक्रिया २०२५-२६: संपूर्ण माहिती
मुंबई विभागासाठी इयत्ता ११ वी (FYJC online Admission admission) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. खाली दिलेले वेळापत्रक मुंबई विभागातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे:
वेळापत्रक
सराव सत्र (Practice Session):
सराव सत्र (Practice Session):
१९ मे २०२५ ते २० मे २०२५, सायं. ६:०० पर्यंत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि प्राधान्यक्रम भरण्याचा सराव. टीप: ही माहिती २० मे नंतर मिटवली जाईल. प्रत्यक्ष फॉर्म २१ मे पासून भरायचा आहे.
प्रत्यक्ष नोंदणी आणि फॉर्म भरायची प्रक्रिया:२१ मे २०२५ ते २८ मे २०२५, सायं. ६:०० पर्यंत
विद्यार्थी १ ते १० कॉलेज निवडू शकतात. कोटा अंतर्गत देखील अर्ज करता येईल. प्रत्येक फेरीत संमती आवश्यक. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी पुन्हा फॉर्म भरावा.
तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List):
तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List):
३० मे २०२५, सकाळी ११:०० वाजता ही तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित होईल.३० मे ते १ जून २०२५, दुपारी ४:०० पर्यंत विद्यार्थी यादीतील त्रुटींसाठी हरकती (Grievances) नोंदवू शकतात
गुणवत्ता यादी निश्चिती (Final Merit List):
३ जून २०२५, सायं. ४:०० वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
कॉलेज वाटप आणि प्रवेश प्रक्रिया:
६ जून २०२५, सकाळी १०:०० वाजता पासून कॉलेज वाटप यादी जाहीर. विद्यार्थ्यांनी ‘Proceed for Admission’ क्लिक करून प्रवेशासाठी सहमती द्यावी.
कॉलेजमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश न घेण्याची इच्छा असल्यास पुढील फेरीसाठी सहभाग घ्यावा.
प्रवेश पुष्टीकरणासाठी वेळ:६ जून २०२५, सकाळी ११:०० वाजता ते १२ जून २०२५, सायं. ६:०० वाजता
रिक्त जागांची माहिती:
१४ जून २०२५, रात्री १०:०० वाजता दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची यादी (Quota जागांसहित) प्रसिद्ध होईल
महत्वाच्या सूचना:
जर पहिल्या प्राधान्यक्रमात कॉलेज मिळालं असेल, तर त्यामध्ये प्रवेश घेणं अनिवार्य आहे. प्रवेश न केल्यास किंवा नाकारल्यास विद्यार्थ्याला पुढील फेरी (Round 2-4) साठी रोखले जाईल. प्रवेश रद्द केल्यास, विद्यार्थी केवळ पुढील फेरीतच पुन्हा अर्ज करू शकतो.
* कॉलेज फी केवळ डिजिटल पेमेंटद्वारे स्वीकारावी.
* प्रत्येक टप्प्याला दिलेला वेळ काटेकोरपणे पाळावा.
* कोटा (Management/In-house/Minority) प्रवेश प्रक्रिया ३ जूनपासून सुरू होईल.
वरील FYJC online admission 2025 चीमाहिती थोडक्यात खालीलप्रमाणे प्रमाणे आहे

अधिकृत वेबसाईट व हेल्पलाईन:👉
https://mumba.11thadmission.org.in
Email : support@mahafyjadmission.in
📞 हेल्पलाइन: ९८२३००९८४१ (सकाळी ९:०० ते सायं. ७:००)—जर तुम्हाला या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील, तर आपण वरील ईमेल वा फोन नंबर वर संपर्क करू शकता

