Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

झुकरबर्ग ला 7800 कोटींचा दंड – वकीलाचा एक शब्द पडला महाग – जाणून घ्या तो शब्द- Meta New Mexico Case

Meta New Mexico Case मधे Meta चे Face Book व Instagram हे App अल्पवयीन मुलांच्या शोषणास कारणीभूत ठरत आहेत असा आरोप Meta वर होता. 6 August 2026 ला कोर्टाने Landmark Judgement दिले Zuckerberg च्या वकीलाने बचावात वापलेला शब्दच वापरून मेटा ला कोर्टाने दोषी ठरवले व 7800 कोटींचा दंड ठोठावला. 

Symbolic image made with AI,which shows an old factory building with Facebook and Instagram logos painted on its merky wall while Chimnies on roof omitting black smoke

काय आहे Meta वरची New Mexico न्यायालयातील Case?

अमेरिकेच्या New Mexico राज्याच्या मुख्य वकील राऊल टोरेझ( Raul Torrez) यांनी Mark Zuckerberg यांच्या Meta कंपनीवर 2023 साली  खटला दाखल केला  होता. Meta चे Facebook व Instagram App अल्पवयीन मुलांना एकप्रकारे व्यसन लावत आहेत तसेच अल्पवयीन मुलांचे शोषण करणाऱ्या गुन्हेगारांसाठी Facebook व Instagram हे App माध्यमाची भूमिका बजावत आहेत असा आरोप त्यांनी Meta वर केला होता.

New Mexico कोर्टाने दिलेला निकाल

New Mexico कोर्टाने 6 August 2026 ला Landmark Judgement देत Zuckerberg यांच्या Meta कंपनीला दोषी ठरवले आहे व Meta ला 7800 कोटींचा दंड ही ठोठावला आहे . ही landmark Judgement Social Media company संदर्भात सामाजिक जवाबदारी चा नियम ठरवणारी Blue Print मानली गेली आहे. या जजमेंट पर्यंत कोर्टाला पोहोचण्यासाठी बचाव पक्षाच्या (Meta च्या) वकीलाने वापरलेला एक शब्द जजसाहेबांनी Meta ला अपराधी ठरवण्यासाठी वापरून या केसला नाट्यमय कलाटणी दिली आहे.

वकीलाकडून बचावात Meta साठी रूपकात्मक रित्या FACTORY शब्दाचा वापर

“एखाद्या शहरातील फक्त एकाच Factory ला ‘प्रदूषणासाठी’ दोषी ठरवणे जसे न्याय्य नाही तसेच Meta ला ही मुलांच्या सर्व समस्यांसाठी दोषी ठरवणे न्याय्य नाही..!” –Meta चे वकील

Meta च्या वकीलांनी वरील प्रमाणे FACTORY या शब्दाचा रूपका मधे वापर करत “Meta Company ला अयोग्यपणे अल्पवयीन मुलांच्या समस्यांबाबत दोषी ठरवले जात आहे असा बचावात्मक पवित्रा कोर्टात घेतला”. Meta New Mexico Case मधे न्यायाधीश ब्रायन बिडशेड यांनी मात्र Meta च्या वकीलांच्या या रूपकालाच आपल्या निकालात वापरले आणि Zuckerberg यांच्या Meta company ला दोषी ठरवले.

Meta ला “सार्वजनिक उपद्रव” (Public Nuisance) ठरवताना न्यायाधीशांनी खालील रूपक वापरले

  • Meta च्या जाहिराती आणि कंटेंट हे एकप्रकारे” Factory चे उत्पादन आहेत.
  • अल्पवयीन मुलांचे मानसिक आघात व लैंगिक शोषण हे एकप्रकारे “प्रदूषण“च आहे.

न्यायाधिशांचे नेमके शब्द -FACTORY शब्द वापरून रूपकाची मांडणी

विक्रमी दंड आणि सक्तीचे उपाय:

दंडाचे दोन टप्पे

दंडाची रक्कम दोन स्वतंत्र भागांत (दोन टप्प्यांत) ठोठावण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात

$375 दशलक्ष (सुमारे 3,100 कोटी रुपये) एवढा दंड ठोठावण्यात आला, जो Meta ने मुलांच्या सुरक्षिततेबाबत ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्यूरीने (न्यायदंडाधिकाऱ्यांचा गट) लादला होता.

दुसऱ्या टप्प्यात

न्यायाधीश Bryan Biedscheid यांनी $567 दशलक्ष (सुमारे 4,700 कोटी रुपये) इतकी रक्कम ‘अबेटमेंट फंड’ (Abatement Fund) मध्ये जमा करण्याचा आदेश दिला. या रकमेचा वापर मुलांच्या मानसिक आरोग्यावरील परिणामांवर उपचार, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांसाठी (उदा. $420 दशलक्ष उपचारांसाठी) करण्यात येणार आहे.

या दोन्ही रकमा मिळून Meta वरची एकूण दंड रक्कम$942 दशलक्ष (सुमारे 7,800 कोटी रुपये) इतकी होते.

सक्तीचे उपाय

  • 18 वर्षांखालील मुलांसाठी रोज ३ तासांपेक्षा जास्त वापर न करणे व 90 तास प्रतिमहिना वापर मर्यादा
  • रात्री व शाळेच्या वेळी नोटिफिकेशन्स बंद करणे
  • “लाईक” ची मोजणी काढून टाकणे

हा निकाल ऐतिहासिक का?

  • Public Nuisance (सार्वजनिक उपद्रव) ही संज्ञा प्रथमच एखाद्या सोशल मीडिया बाबत वापरण्यात आली. सहसा ही संज्ञा वायु प्रदुषण, ध्वनी प्रदुषण, विषारी कचरा,दारू, तंबाखू सेवनामुळे अयोग्य वैयक्तिक वर्तन या बाबत वापरली जाते
  • दंडाची रक्कम ही अभूतपूर्व अशी 7800 कोटी एवढी आहे
  • Social Media विरुद्ध सरकारने जिंकलेली ही पहिलीच केस असल्यामुळे खुद्द जजसाहेबांनी या केसच्या निकालाला Blue Print व Road Map संबोधले आहे.

अमेरिकेतील इतर प्रलंबित खटले

Meta New Mexico Case व्यतिरिक्त Meta या सोशल मीडीया कंपनी विरुद्ध अमेरिकेत अनेक खटले प्रलंबित आहेत. 40 हून अधिक राज्ये व 13000 हून अधिक शाळा जिल्ह्यांनी (School District) Meta विरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले आहेत. या सर्वांसाठी New Mexico न्यायालयाचा निकाल नक्कीच Road Map ठरणार आहे.

Note- 40 राज्यांतील 29 राज्यांचा एकत्रित खटला नुकताच California Federal न्यायालयात अलीकडेच सुरू झाला आहे.

अमेरिकेबाहेर Social media संदर्भात कारवाई व निर्बंध

अमेरिकेच्या बाहेर, ‘Public Nuisance’ (सार्वजनिक उपद्रव) या विशिष्ट कायदेशीर संकल्पनेवर आधारित असा खटला आतापर्यंत इतर कोठेही आढळलेला नाही. मात्र, मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी जागतिक पातळीवर कायदेशीर आणि नियामक कारवायांची लाट आली आहे. काही देशांनी तर अमेरिकेतील या खटल्यापेक्षाही कठोर उपाययोजना केल्या आहेत.

यातील काही प्रमुख घटना पाहूया

  • भारत (नियामक कारवाई): २०२६ च्या जुलैमध्ये, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषण साहित्याच्या (CSAM) जाहिराती प्रसिद्ध झाल्याच्या अहवालानंतर, Meta ला कठोर नोटीस बजावली होती.
  • ऑस्ट्रेलिया (कायदेशीर बंदी): डिसेंबर २०२५ मध्ये, १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आणणारा जगातील पहिला देश ठरला.
  • युरोपियन युनियन (नियामक कारवाई): २०२४ मध्ये, EU ने Meta विरुद्ध ‘डिजिटल सर्व्हिसेस कायद्या’ (DSA) अंतर्गत तपास सुरू केला होता. नुकतेच, आपल्या दोन वर्षांच्या तपासात EU ने Meta च्या प्लॅटफॉर्मना “व्यसनाधीन” ठरवले असून, DSA चे उल्लंघन केल्याबद्दल मोठा दंड आकारण्याचा इशारा दिला आहे
  • United Kingdom -२०२६ च्या जूनमध्ये, UK सरकारनेही १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी आणण्याची, तसेच रात्रीचा कर्फ्यू आणि अनंत स्क्रोलिंगवर निर्बंध आणण्याची घोषणा केली आहे

सारांश

Social Media ला सार्वजनिक उपद्रव (Public nuisance) ठरवणारा Meta New Mexico Case बाबत न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक आहे. यापुढे Meta व इतर social media platforms ना जबाबदारीने वागावे लागणार आहे. करमणूक व अभिव्यक्ती साठी हे शक्तिशाली माध्यम असले तरी भावी पीढीच्या मानसिक स्वास्थ्याचा व सुरक्षिततेचा विचार करता आपण याचा वापर संयमाने व विचारपूर्वक करायला हवा.जो मुलांसाठी मार्गदर्शक ठरेल .आपले मत जरूर कळवा


FAQ

‘Public Nuisance’ (सार्वजनिक उपद्रव) म्हणजे नेमके काय?

Public Nuisance’ ही एक कायदेशीर संज्ञा आहे, जी एखाद्या कार्यामुळे समाजाच्या मोठ्या भागाचे आरोग्य, सुरक्षा किंवा हक्क धोक्यात आल्यास वापरली जाते. या प्रकरणात, Meta च्या प्लॅटफॉर्ममुळे मुलांच्या मानसिक आरोग्याला होणारा धोका हा ‘सार्वजनिक उपद्रव’ ठरवण्यात आला.

New Mexico च्या न्यायाधीशांनी Meta ची तुलना कशाशी केली?

New Mexico चे न्यायाधीश Bryan Biedscheid यांनी Meta ची तुलना ‘प्रदूषण करणाऱ्या कारखान्या’ (Polluting Factory) शी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जसे कारखान्यातून निघणारे प्रदूषण सर्वत्र पसरते, तसेच Meta च्या प्लॅटफॉर्मवरील मुलांना होणारे मानसिक आघात आणि लैंगिक शोषणाचे परिणाम संपूर्ण इंटरनेटवर आणि वास्तविक जगात पसरतात.

Meta ने या निकालाविरुद्ध कोणती भूमिका घेतली आहे?

Meta ने न्यायालयात युक्तिवाद केला होता की, हे निर्बंध इतके कडक आहेत की त्यांना न्यू मेक्सिकोमध्ये सेवा बंद करावी लागेल. तसेच, झुकरबर्ग च्या मेटा कंपनीने या निकालाविरुद्ध अपील (Appeal) करण्याचे स्पष्ट केले आहे.

Meta company चे किती Social Media App आहेत?

Meta चे 5 प्रमुख सोशल मीडिया Apps आहेत: 1) Facebook, 2) Instagram, 3) WhatsApp, 4) Facebook Messenger, आणि 5) Threads. हे सर्व त्यांच्या ‘Family of Apps’ विभागात येतात.

हे ही वाचा

▶️रतन टाटा यांनी बनवली होती पहिली भारतीय बनावटीची कार tata Indica

▶️Marathi Box Office – प्रथमच देशाच्या एकूण collection मधे मराठी चित्रपटांचा 4% वाटा – सहा महिन्यांत 250+ कोटींची ‘सैराट घोडदौड’

▶️Prada Kolhapuri controversy – इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल ला Leather Flat Sandal नावाने Prada ने सादर केले

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment