Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

टीना टर्नर चं अध्यात्म : Nichiren Buddhism ने बदललं आयुष्य

टीना टर्नर चं अध्यात्म : Nichiren Buddhism ने बदललं आयुष्य


High hairs, Mini Skirt and Buddha

आंतरीक आणि बाह्य अशा दोन पातळ्यांवर Tina Turner आयुष्य जगली. बुद्धाच्या ध्यानातून मिळालेल्या आंतरीक शांतीने तिचे आयुष्य उजळत गेले
Written by Avinash Bhanu Asha Ghodke

पाश्चात्य pop संगीताच्या वाटेला खूप गेलो नाही पण ८० च्या दशकात मित्र श्रीधर मुळे काही गायक व ग्रुप्स माहित झाले. Madonna, Whitney Huston, Samantha Fox अशा काही महिला pop stars ही माहित झाल्या. त्यात कृष्णवर्णीय टीना टर्नर ही होती. मादक व काहीसा भरडा आवाज, कुरळ्या केसांची उंच केशभूषा आणि तिचे देखणे पाय प्रदर्शित करणारा छोटासा स्कर्ट . टीना टेचात चालत “What’s Love got to do with it!! असं गात बाॅक्स टी व्ही च्या स्क्रीन वर चालताना दिसायची तेंव्हा “uff” असं वाटायचं.

Tina’s Life

अमेरिकेच्या दक्षिण पूर्व प्रांतातील टेनेसी राज्यातली अॅना ही कृष्णवर्णीय मुलगी, पूर्ण नाव अॅना मये बुलक Anna Mae Bullock. अॅना ला चित्रपट पहाण्याचा शौक होता. चित्रपट पाहून आली की अॅना चित्रपटातील पात्रांचे संवाद कुटुंबियांना अभिनय करत म्हणून दाखवी. टेनेसी प्रांत तसा Blue grass व Blue संगीता साठी प्रसिद्ध होता. Off beat वाजणारे हे संगीत अॅना चं आयुष्य off beat मार्गाने उत्कर्षाकडे घेवून गेलं. नर्सिंग चं काम करत गाण्यात रमलेली आपली मुलगी शिक्षिका होईल असं अॅना च्या आईला वाटे. तसं अॅनालाही ती pop singer होईल असं कधीच वाटलं नव्हतं.

वयाच्या विसाव्या वर्षी अॅना ने Tina Turner हे नवे नाव धारण करत आपली संगीत कारकीर्द सुरू केली. याच काळात संगीतातील साथिदाराशी भावबंध जुळले पण पुढे हे नात टीना साठी आत्यंतिक शारीरीक व मानसिक क्लेशकारक ठरलं. या भावनिक आघातातून बाहेर पडण्यासाठी तिने निचेरियन बुद्धिजम ला अंगिकारले. बुद्धाच्या शीतल करूणा तत्त्वाने टीना चे उद्विग्न मन शांत केले.

Success in 40s

1984 सालचं तिचं हे गाणं तिच्या करीअरचं टर्निंग पॉइंट ठरलं. हे सर्व घडत होतं तिच्या वयाच्या चाळिशीत. चष्म्याशी जुळवून घेण्याच्या वयात टीना नेत्रदीपक अशा यशाला सामोरी जात होती. Anti Love असलेल्या या गाण्याबद्दल टीनाला व संगीतकाराला ही विशेष अपेक्षा नव्हती. असफल व वेदनादायी अशा वैवाहिक जीवना नंतर टीना च्या मनात बहुधा प्रेमाविषयी अनासक्ती व द्वेष निर्माण झाला असावा आणि हाच द्वेष तिच्या आवाजातून खरेपणाने उमटला असावा. टीनाच्या भावना मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोचल्या आणि त्यांनी तिचा न्याय केला. मागील दहा वर्षे बुद्धाचे केलेले ध्यान फळास आले होते.
Nicherian Buddhism brought peace in her life
1974 साली तिने निचिरेन पंथीय बुद्ध धर्म स्वीकारला होता. रोज न चुकता ३ तास ध्यान व ” नम्मे हो रेंगे क्यो ” “Namm mye ho renge kyo!” या मंत्राच्या नामोच्चारणात जात. आत्मिक ऊर्जा वाढत गेली. मंचकावरून लाखोंच्या समुदायाच्या मनांना ती लिलया स्पर्श करू लागली. १९८८ च्या रिओ दी जानेरिओ च्या तिच्या कॉन्सर्ट ला १,८८,०००प्रेक्षक हजर होते. त्या काळानुसार आणि युरोपिय लोकसंख्ये नुसार हा आकडा प्रचंड मोठा होता. प्रेक्षक उपस्थिती बाबतीत ‘फ्रँक सिनात्रां’ सारख्या दिग्गजाचे रेकॉर्ड टीना टर्नर ने मोडले होते.

Buddhism showed the way

एका मुलाखतीत टीना म्हणते “आयुष्यात आलेल्या अपरिमित दु:खांना ओलांडण्याच्या खडतर तपश्चर्येनंतर मी अविनाशी असा आनंद प्राप्त केला आणि तोच आनंद मी इतरांच्या आयुष्यात आणण्याचं एक ध्येय मला Buddhism ने दिलं!” बुद्धीजम मुळे आपण आंतरिक परिवर्तीत झाल्याचे टीना सांगते.

Life philosophy

काय ?आणि कसे? ( What and How) या दोन प्रश्नांना आयुष्यात सातत्याने सामोरे जावे लागते. त्यातील काय? What हा प्रश्न मी महत्वाचा मानत आले. आपल्या ध्येयासाठी सातत्याने कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न करत रहाणे हे Buddhism ने मला शिकवले. ही आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया असते ज्याला Buddhism मधे Human Revolution मानवीय उत्कर्ष म्हणतात असं टीका सांगते.

Migration to Europe

मी अमेरिकन असले व Pop Star म्हणून अमेरिकेत नाव कमावले असले तरी अमेरिकेत मी Madona एवढी मोठी स्टार नाही असे टीना ने मान्य केले होते. पण टीना ला युरोपात खूप जास्त प्रसिद्धी व प्रेम मिळाले. अखेर ती अमेरिका सोडून स्वित्झर्लंड ला स्थाईक झाली. इथल्या शांत निसर्गाने तिचा अध्यात्मिक आंतरिक प्रवास आणखी सुकर केला.
२००५ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष W Jeorge Bush यांनी टीना च्या देखण्या पायांवर मिश्किल पणे ” her legs were most famous in showbusines! ” अशी टिप्पणी केली होती.स्वित्झर्लंड च्या घरातील आपल्या देवघरात हेच देखणे पाय उशीवर दुमडून बसत टीना बुद्धाला न चुकता शरण जात राहिली आणि अखेर बुद्ध तत्वात विलीन झाली. पुरूष आणि स्त्री मधले प्रेम खरेच निःस्वार्थ असते का? असत ही असेल कधीकधी… पण बरेच दा.. What’s love got to do with it?… असेच असते.
हे ही वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment