Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Don Film चा Director – टांझानियात बँक कर्मचारी होता- गायिका बहिणीने चित्रपटात आणले

Don या अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट सिनेमाने अमिताभ यांना Star बनवले. या चित्रपटाचा दिग्दर्शक चित्रपट सृष्टीत येण्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या टांझानिया देशात एका बॅंकेत काम करत होता.Don नंतर त्याने एकही चित्रपट केला नाही असे काही लोकांना वाटते ते अर्धसत्य आहे..(Don-first and last hit of Director Chandra Barot)

Don working still picture with Director Chandra Barot and lead actor Amitabh Bachchan

टांझानिया तील जन्म – वांशिक तणावा मुळे टांझानिया सोडले

चंद्रा बारोट यांचा जन्म टांझानियातला. दार एस सलाम या शहरातील बर्कले बँकेत व्यवस्थित नोकरी करत असताना अचानक वांशिक तणावा मुळे त्यांना १९६७ साली टांझानिया देश सोडावा लागला.
खरंतर चंद्रा बारोट यांना लंडन ला सेटल व्हायचे होते पण त्याआधी ते भारतातील आपली बहीण कमल बारोट हिला भेटायला इथे मुंबईत आले. कमल बारोट हिंदी चित्रपट सृष्टी प्रस्थापित गायिका होती. पारसमणी चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा’ हे तिचं प्रसिद्ध गाणं. कमल बारोट मुळेच चंद्रा बारोट यांची कल्याणजी आनंदजी यांच्याशी ओळख झाली .पुढे कल्याणजी यांनी चंद्रा यांची ओळख मनोज कुमार यांच्याशी करून दिली.

गायिका असलेल्या बहिणीला भेटायला मुंबईत आले असता मनोज कुमार यांची ओळख

त्यावेळी मनोज कुमार ‘उपकार’ चित्रपटाला फायनल टचेस देत होते. तरुण चंद्रा बारोट यांनी मनोज कुमार यांना चित्रपटातील एक छोटीशी चूक दाखवली. यावर प्रभावित होऊन मनोज कुमार यांनी चंद्रा बारोट यांना आपल्याबरोबर दिग्दर्शनात सहाय्यक म्हणून काम करण्याची ऑफर दिली.
चंद्र बारोट यांनी मनोज कुमार यांना नकार दिला. पुढे ते लंडनला गेले. लंडनला त्यांना हव्या तशा संधी मिळाल्या नाहीत . अखेर त्यांनी मनोज कुमार यांना फोन करून सहाय्यक पदाची विचारणा केली. मनोज कुमारांचा होकार आल्यावर ते मुंबईला परतले. तेव्हा मनोज कुमार आपल्या ‘यादगार’ या चित्रपटाचे चित्रकरण करत होते. 457 रुपये महिना पगारावर ते मनोज कुमार यांचे सहाय्यक म्हणून रुजू झाले. 9 वर्षे ते मनोज कुमार यांचे सहाय्यक राहिले.पूरब और पश्चिम ,रोटी कपडा और मकान ,शोर या गाजलेल्या चित्रपटात ते मनोज कुमार यांचे सहाय्यक होते.

तेजी बच्चन म्हणाल्या होत्या ‘हमारे मुन्ना का खयाल रखो’

महेंद्र कपूर यांनी मनोजकुमार यांच्या चित्रपटात गायलेल्या ‘मेरे देश की धरती’ या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार घेण्यासाठी महेंद्र कपूर यांच्या बरोबर चंद्रा बारोट ही दिल्लीस गेले . या वेळी परीक्षण समितीमध्ये तेजी बच्चन या सदस्य होत्या. एका भेटीत तेजी बच्चन यांनी महेंद्र कपूर व चंद्रा बारोट यांना सहज म्हटले ….

“ हमारा मुन्ना भी सिनेमा मे काम करने मुंबई आ रहा है .. उसका खयाल रखिएगा”

तेजी बच्चन यांचा मुन्ना म्हणजे अमिताभ बच्चन. मुन्ना हे त्यांचे घरगुती नाव होते. (Don-first and last hit of Director Chandra Barot)

अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याचा योग

1972 साली सिनेमॅटोग्राफर नरिमन ईराणी यांची निर्मिती असलेला ‘जिंदगी जिंदगी’ हा चित्रपट फ्लॉप झाला. इराणी हे चंद्रा बारोत यांचे मित्र होते. आपल्या मित्राला मदत करण्यासाठी त्यांनी ईराणी यांचा दुसरा चित्रपट डॉन चे दिग्दर्शन स्वीकारले. डॉन ची स्क्रिप्ट अनेक वर्षे लेखक सलीम जावेद यांच्याकडे पडून होती. Don ची कथा कुठल्याही खर्या Mumbai Underworld Don ची कथा नव्हती . सलीम जावेद यांनी अतीशय रंजक असे काल्पनिक कथानक यात रंगवले होते. असे असूनही धर्मेंद्र, जीतेंद्र,देव आनंद अशा मोठ्या अभिनेत्यांनी ही भूमिका नाकारली होती. अखेर अमिताभ बच्चन यांनी ही भूमिका स्विकारली.

ट्रायल पाहून मनोज कुमार यांचा सल्ला

डॉन ची ट्रायल चंद्रा बारोट यांनी आपले गुरू मनोज कुमार यांना दाखवली . मनोजकुमार यांनी चित्रपट सेकंड हाफ मधे ड्रॅग होत आहे व त्या भागात गाणे असणे गरजेचे आहे असा सल्ला दिला.
ऐनवेळी कल्याणजी आनंदजी यांनी मूलतः देव आनंद यांच्या बनारसी बाबू या चित्रपटा साठी तयार केलेले पण चित्रित न झालेले ‘खैके पान बनारसवाला’ हे गाणे Don चित्रपटात टाकले गेले.

Don चे गाणे : खैके पान बनारसवाला

1978 साली प्रदर्शित झालेला डॉन सुपरहिट ठरला. त्यातील ‘खैके पान बनारसवाला’ या गाण्याने प्रसिद्धी चा उचांक गाठला. अनेक लोक केवळ हे गाणे पहाण्यासाठी Don चित्रपट वारंवार पहात.

नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांची आठवण

नृत्य दिग्दर्शिका सरोजन खान या आखाती देशात त्या काळात रहात होत्या.त्यांनी आपली आठवण सांगताना असे सांगितले की केवळ ‘खैके पान बनारसवाला ‘ हे गाणे पहाण्यासाठी त्यांनी अनेकवेळा Don हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला. पुढे सरोज खान या स्वतः आघाडीच्या नृत्य दिग्दर्शिका म्हणून नावारूपाला आल्या.

Zee Music Channel च्या वरील लिंक वर आपण ‘खैके पान बनारसवाला‘ हे गाणे पाहू शकता..

Don film poster -Courtesy Google

व्यवसाय आलेख- Box Office

•25 लाखांत बनलेला हा चित्रपट

•50 आठवडे चालला

•चित्रपटाच्या एकूण 120 प्रिंट प्रदर्शित झाल्या होत्या

•पहिल्या आठवड्यात चित्रपट फ्लॉप घोषित झाला पण अचानक ‘खैके पान बनारस वाला‘ या गाण्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित केले

अमिताभ बच्चन यांचे सुपरस्टार पद मजबूत करण्यात डॉन चित्रपटाचा मोठा हात मानला जातो. (Don-first and last hit of Director Chandra Barot)

डॉन नंतर चंद्रा बारोट यांनी कोणते चित्रपट केले?

डॉन चित्रपटानंतर चंद्रा बारोट यांनी कुठलाही चित्रपट केला नाही असा एक समाज लोकांमध्ये आहे. खरे पाहिले तर चंद्रा बारोट यांनी बऱ्याच चित्रपटांची सुरुवात केली पण ते चित्रपट पूर्ण होऊ शकले नाहीत. 2006 साली rediff News ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी डॉन नंतर त्यांना 52 चित्रपटांची ऑफर आली होती असे सांगितले. यातील दोन चित्रपट त्यांनी स्वीकारले . दिलीप कुमार यांच्याबरोबर ‘मास्टर’ आणि सारिका बरोबर ‘तितली’ असे ते दोन चित्रपट जे कधी पूर्णच होवू शकले नाहीत.

मात्र त्यांनी 1989 साली आश्रित हा बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला जो 69 आठवडे चालला होता.

डॉन(Don )सारखे यश पुन्हा नाही

Bollywood मधला Don हा चित्रपट मात्र चंद्रा बारोट यांचा पहिला व शेवटचा “यशस्वी” चित्रपट ठरला.

चंद्रा बारोट यांना डॉन सारखे यश पुन्हा मिळाले नाही हे सत्य आहे. जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर याने डॉन चे यशस्वी रीमेक केले पण सत्तर च्या दशकातील तरुणाईला मात्र आज ही “Don को पकडना मुश्किल ही नहीं नामुम्किन है ! ” असे म्हणणार अमिताभ बच्चन यांचा डॉन आठवतो. दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचा डॉन हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.


हे ही वाचा

Jumping Jack जीतेन्द्र ची बांधकाम व्यवसायात उडी

या अभिनेत्रीने promise केला होता kiss ..पण नंतर काढला पळ- ५० च्या दशकातील शम्मी कपूर यांचा मजेशीर किस्सा

FAQ

अमिताभ बच्चन यांच्या Don (1978) चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होते?

उपलब्ध ट्रेड रेकॉर्डनुसार Don (1978) ने भारतात सुमारे ₹3.5 कोटी नेट कमाई केली होती, तर त्याचे जागतिक ग्रॉस कलेक्शन सुमारे ₹7 कोटी इतके मानले जाते. त्या काळात हा चित्रपट सुपरहिट/ब्लॉकबस्टर ठरला आणि 1978 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक होता. जुन्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस आकडेवारीत विविध स्रोतांनुसार थोडाफार फरक आढळू शकतो, कारण त्या काळात अधिकृत डिजिटल नोंदी केल्या जात नव्हत्या.

‘Don’ चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता?

Don’ हा चित्रपट 12 मे 1978 रोजी प्रदर्शित झाला. सुरुवातीला Don ला मध्यम प्रतिसाद मिळाला, मात्र नंतर तो प्रचंड लोकप्रिय ठरला आणि आजही बॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो.

‘Don’ चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले होते?

या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी केले होते. हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता आणि त्याने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख मिळवून दिली. Don हा त्यांचा एकमेव यशस्वी हिंदी चित्रपट आहे

अमिताभ बच्चन यांनी ‘Don’ मध्ये कोणती भूमिका साकारली होती?

अमिताभ बच्चन यांनी Don मधे दुहेरी भूमिका (Double Role)साकारली होती. एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ‘डॉन’ आणि त्याच्यासारखाच दिसणारा साधाभोळा ग्रामीण युवक’विजय’. या दोन विरोधी स्वभावाच्या व्यक्तिरेखा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी एक मानल्या जातात.

Don’ चित्रपटाचा रिमेक बनवण्यात आला आहे का?

होय. 2006 मध्ये शाहरुख खानच्या प्रमुख भूमिकेत ‘Don’चा रिमेक प्रदर्शित झाला. त्यानंतर 2011 मध्ये ‘Don 2’ आला. या दोन्ही चित्रपटांनी आधुनिक शैलीत मूळ कथेला नवीन रूप दिले.


About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment