अरूण गवळी हत्त्येच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत होता – त्या हत्त्येची गोष्ट थरारक आहे
अरुण गवळी ला हत्त्येच्या आरोपाखाली अटक झाली होती.2007 ची ही घटना आहे .दोन मार्च 2007 रोजी घाटकोपरच्या असल्फा भागात मोहिली विलेज मध्ये एक हत्याकांड झाले होते. ज्यांची हत्या झाली होती ते कमलाकर जामसांडेकर हे नुकतेच निवडून आलेले मोहिली विलेज चे शिवसेनेचे नगरसेवक होते.
कसे घडले हत्त्याकांड
संध्याकाळच्या वेळी. मोहिली विलेज मधील आपल्या इमारतीतील घरात जमसांडेवर टीव्ही पाहत बसले असता अचानक चार मारेकरी त्यांच्या इमारतीसमोर दोन गाड्यांतून उतरले. ते जमसंडेकर यांच्या घरात घुसले व त्यांच्यावर गावठी कट्ट्याने त्यांनी गोळीबार केला आणि त्वरित फरार झाले. किचनमध्ये स्वयंपाक करण्यात व्यस्त असलेली त्यांची भाची मनाली गोळीबाराचा आवाज ऐकून बाहेर आली . रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जामसंडेकर यांना पाहून ती घाबरली व ओरडू लागली. जामसंडेकर यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिस तपास सुरू
मनाली यांनी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदवली त्यानुसार सहा संशयतांना पोलिसांनी अटक केली. एक वर्ष उलटले पण तपास कार्य पुढे जात नव्हते . पोलिसांच्या हातात ठोस असे काही लागत नव्हते.
पोलिसांना एका दरोड्याची टिप- जामसंडेकर हत्त्येचे धागेदोरे
एक वर्षानंतर 26 एप्रिल 2008 रोजी मुंबई पोलिसांना दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथील ज्वेलरी शॉप वर दरोडा पडणार आहे अशी टीप मिळाली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार संशयितांना हॉटेल गोविंदराम येथून अटक केली. हे चार संशयित म्हणजे अशोक कुमार जयस्वाल ,विजय गिरी, अनिल गिरी आणि नरेंद्र गिरी. या चौघांची तपासणी करताना पोलिसांना त्यांच्याकडे एक गावठी रिवाल्वर सापडली. या रिवाल्वर चा घोडा अर्थात चाप किंवा ट्रिगर तुटलेला होता. एक वर्षापूर्वी घाटकोपर मध्ये झालेल्या जामसंडेकर यांच्या हत्येच्या स्थळी पोलिसांना एक तुटलेला पिस्तुलाचा चाप आढळला होता. पोलिसांनी आता चारही संशयतांची कसून चौकशी सुरू केली. या चौकशीत अजित राहणे आणि प्रताप गोडसे ही दोन नावे पुढे आली. अजित राणे म्हणजे अखिल भारतीय सेनेचे तेच नगरसेवक जे जामसांडेकर यांच्याविरुद्ध 367 मतांनी हरले होते. प्रताप गोडसे हे सुद्धा अखिल भारतीय सेनेचे एक कार्यकर्ते होते.
तपासाला गती
कमलाकर जमसंडेकर यांच्या खुनाच्या च्या तपासाला आता दिशा आणि गती मिळाली होती. पुढील चौकशीमध्ये सदाशिव सुर्वे व साहेबराव भिंताडे अशी दोन नावे पुढे आली.सुर्वे यांचा जामसांडेकर यांच्याबरोबर जमिनी संदर्भात एक वाद होता. या दोघांनी राणे आणि गोडसे यांच्याशी संपर्क साधला व जमसंडेकर यांची 30 लाख रुपयांची सुपारी दिली. या विषयावर ‘फायनल डिसिजन’ घेण्यासाठी गोडसे व राणे अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष अरुण गवळी यांना दगडी चाळीत जावून भेटले. अरुण गवळी याने यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आवाहन देत आपला *अखिल भारतीय सेना* हा पक्ष स्थापित केला होता. या पक्षाचे ते विद्यमान आमदार होते. गोडसे व राणे यांच्या अरुण भाऊ बरोबर झालेल्या मीटिंग नंतर भिंताडे व सुर्वे गवळी बरोबर मीटिंग झाली.
जामसंडेकर यांच्या हत्येचा प्लान आखला गेला.
गोडसे यानेच नरेंद्र गिरी आणि विजय गिरी हे शूटर अरेंज केले. दोघांना प्रत्येकी अडीच लाख रुपये ठरले तसेच वीस हजार रुपये प्रत्येकी आगाऊ देण्यात आले. पंधरा दिवस जामसंडेकर यांच्यावर पाळत ठेवून अखेर दोन मार्च 2007 रोजी त्यांची घाटकोपरच्या राहत्या घरी हत्त्या करण्यात आली. हत्त्या होण्याच्या महिनाभर आधीच जामसंडेकर हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या अजित राणे यांचा 367 मतांनी पराभव केला होता. अशाप्रकारे एका तुटलेल्या बंदुकीच्या चापाने पोलिसांना जामसंडेकर हत्येच्या अरुण गवळी या सूत्रधारापर्यंत पोहोचवले.
गवळीला अटक व 17 वर्षांनंतर जामिनावर सुटका
मार्च 2008 मध्ये अरुण गवळी याला मकोका कायद्याच्या अंतर्गत अटक झाली होती. 2012 मध्ये इतर अकरा आरोपींसह अरुण गवळी याला कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. गवळी याने सुप्रीम कोर्टात अनेक वेळा अपील केले पण ते फेटाळले गेले. यापूर्वी पॅरोल व परोल वर गवळी ला कोर्टाने सीमित काळासाठी सोडले होते. आपल्या मुलीच्या लग्नालाही तो उपस्थित राहिला होता. अरुण गवळीचे सध्याचे वय 76 वर्षे व सुटकेचा उरलेला काळ लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने त्याची आता नुकतीच सप्टेंबर 2025 मधे जामीनावर सुटका केली आहे.
अरूण गवळी पुन्हा राजकारणात सक्रिय?
अरुण गवळीच्या भायखळ्याच्या दगडी चाळीत ‘डॅडी’ परत आला म्हणून आनंद साजरा होतोय..अरुण गवळी ने आपल्याला कट करून या गुन्ह्यामधे विनाकारण गोवले गेले आहे असे यापूर्वी अनेकदा म्हटले आहे.76 वर्षिय डॉन आता आपल्या राजकीय पक्षाची धुरा पुन्हा सांभाळतो की निवृत्त आयुष्य जगतो हे काळच सांगेल.
हे ही वाचा: परसदारातील वेधशाळेतून थेट आकाश गंगेचे Astro Photo: हौशी खगोल छायाकार मिशेल ची हनुमान उडी ▶️ येशू ख्रिस्त भारतात आले होते का? Did Jesus Christ visit India? ▶️ Priyanka Chopra चा मराठी संवादांसाठी होता हट्ट- AGNEEPATH 2 – BTS

