मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

King ला अखेर राजाश्रय-शाहरुख खानला प्रथमच अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर -जवान चित्रपटातील भूमिकेसाठी 71व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात होणार सम्मानित

शाहरुख खान ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

अखेर 33 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुपरस्टार शाहरुख खान याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्याला यावर्षी प्रदर्शित झालेल्या जवान चित्रपटातील भूमिके साठी देण्यात आला आहे. भारताचे 71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले आहेत. शाहरुख खान ला प्रथमच भारतीय सरकार कडून हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

1992 साली शाहरुख खानचा दिवाना हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. पदार्पणातच शाहरुख खान ने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुख खानचा पुढे एक खास असा चाहता वर्ग तयार झाला. त्याच्या चाहत्यांनी त्याला King खान अशी उपाधी दिली. भारताच्या सर्वोच्च सरकारी पुरस्कारापासून हा किंग आतापर्यंत वंचितच राहिला. अनेक वेळा उल्लेखनीय कामगिरी करूनही शाहरुख खान च्या हातातून हा पुरस्कार निसटत होता.

अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कार हातुन निसटला होता

पदार्पणातील दिवाना चित्रपटा नंतरच्या अभिनय कारकीर्दीत शाहरुखचे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, स्वदेश, चक दे इंडिया, माय नेम इज खान असे महत्त्वपूर्ण चित्रपट त्याला बॉलीवूडच्या सुपरस्टार पदापर्यंत घेऊन गेले. या चित्रपटांमधील त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा होता पण असे असले तरी अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक त्याला सतत हुलकावणी देत राहिले.

2004 साली आलेल्या स्वदेश या चित्रपटातील शाहरुखची मोहन भार्गव ही व्यक्तिरेखा त्याच्या प्रचलित व लोकप्रिय रोमँटिक इमेज ला छेद देणारी होती. पण त्यावर्षी राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार सैफ अली खान याला त्याच्या हम तुम या चित्रपटातील रोमँटिक कॉमेडी भूमिकेसाठी देण्यात आला.

2007 साली शाहरुख खानचा चक दे इंडिया हा चित्रपट आला होता या चित्रपटात त्याने कबीर खान या हॉकी कोच ची इंटेन्स भूमिका साकारली होती.या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट पॉप्युलर फिल्म म्हणाला होता पण शाहरुख खान ला मात्र अवॉर्ड मिळाले नव्हते. त्यावर्षीचा बेस्ट ऍक्टर पुरस्कार रितिक रोशन याला त्याच्या धूम 2 या चित्रपटासाठी मिळाला होता.

2010 साली शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला यात त्याने रिझवान खान या अॅस्पर्जर सिंड्रोम चा आजार असलेल्या व्यक्तीची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी शाहरुखची सर्वत्र वाहवा झाली पण यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने मात्र त्याला पुन्हा एकदा हुलकावले. यावर्षी तो पुरस्कार अमिताभ बच्चन यांनी आपल्या ‘पा’ चित्रपटातील प्रोजेरिया आजाराने ग्रस्त मुलाची भूमिका साकारली होती.

Overseas मार्केट व NRI प्रेक्षकांना आकर्षित केले

शाहरुख खान ला आतापर्यंत अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही हे सत्य असले तरी प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. करण जोहरने NRI मार्केट CASH करण्यासाठी ज्या विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती केली त्या चित्रपटांचा नायक म्हणून शाहरुख खान ने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. याच चित्रपटां मुळे बॉलीवूडला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी व प्रेक्षक मिळाला. बॉलीवूडचे ओव्हरसीज मार्केट विस्तारण्यात करण जोहर बरोबर शाहरुख खान याचा मोठा वाटा आहे.

या आधी पद्म पुरस्कार व फ्रान्स सरकार कडून सम्मान

भारत सरकारने यापूर्वीच शाहरुख खान ला पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे फ्रान्स सरकार चे दोन महत्त्वपूर्ण पुरस्कार ,the Ordre des Arts et des Lettres आणि the Legion of Honour शाहरुख खान ला प्रदान करण्यात आलेले आहेत.

यावर्षी शाहरुख खान ला जवान या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार त्याच्यासाठी व त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंद दायक घटना आहे. या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच एका मुख्य प्रवाहातील व्यावसायिक व ॲक्शन पट असलेल्या अशा चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे.

हे ही वाचा

Don ला पकडणारा दिग्दर्शक -चंद्रा बारोट

मनोज कुमार एक महान दिग्दर्शक

नसीरुद्दिन शहा यांचा पुरस्काराबद्दल अविश्वास

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment