Cucumber salad recipe – भारतीय जेवणात काकडीची पारंपरिक कोशिंबीर आपण अनेकदा खाल्ली असेल. याच काकडीचे European पद्धतीने Salad ही बनवून पहा .
काकडी चे सॅलड Low Calorie Diet
भरपूर Antioxidant असलेले काकडी चे सॅलड शरीराला Detox करते.या चविष्ट सॅलडमधून शरीराला व्हिटॅमिन K आणि C मुबलक प्रमाणात मिळते, जे हाडांच्या मजबुतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. चवीसोबतच आरोग्याची काळजी घेणारे हे एक परिपूर्ण ‘लो-कॅलरी’ डाएट ( Low Calorie Diet) आहे.”

काकडीचं सॅलड रेसिपी:
सहसा काकडी चे सॅलड करताना काकडीचे बारिक तुकडे अथवा काकडी चा कीस करून Cucumber Salad बनवले जाते. Slicer चा वापर करून थोड्या लांब अशा काकडीच्या फिती करून Salad साठी वापरल्यास या सॅलड ची चव व अनुभूती वेगळी होते.
साहित्य:
– २ मोठ्या काकड्या, पातळ कापलेल्या
– १ लहान लाल कांदा, पातळ कापलेला
– १/४ कप पांढरा व्हिनेगर
– १ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
– १ टेबलस्पून साखर (ऐच्छिक)
– चवीनुसार मीठ आणि मिरी
– सजावटीसाठी ताजी शेपू किंवा कोथिंबीर (ऐच्छिक)
टीप: वरील ingredients व्यतिरिक्त आपण आपल्या आवडी नुसार इतर काही जिन्नस वा भाज्या ही या Cucumber Salad मधे घालू शकता.
कृती:
3. हे मिश्रण काकडी आणि कांद्यावर ओता आणि सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा.
4. १५-२० मिनिटे सॅलडला मुरू द्या.
5. हवं असल्यास ताजी शेपू किंवा कोथिंबीर घालून सजवा.
6. थंडगार सॅलड सर्व्ह करा.
| 🥒 काकडीचे पोषण मूल्य (प्रति १०० ग्रॅम) | |
|---|---|
| कॅलरीज | १५ – २३ kcal |
| पाणी | ९५ – ९६% |
| प्रथिने | ०.७ ग्रॅम |
| कार्बोहायड्रेट्स | ५.१६ ग्रॅम |
| आहारातील फायबर | ०.८ ग्रॅम |
| व्हिटॅमिन के | भरपूर प्रमाणात |
| व्हिटॅमिन सी | उत्तम मात्रा |
| पोटॅशियम, कॅल्शियम | समृद्ध |
| अँटीऑक्सिडंट्स | उच्च प्रमाण |
निसर्गाने दिलेली आरोग्यदायी पाण्याची बाटली
थोडक्यात सांगायचं तर…काकडी म्हणजे थंडावा ..निसर्गाने दिलेली नैसर्गिक पाण्याची बाटलीच म्हणा ना! तुमच्या रोजच्या जेवणात काकडीचा समावेश असेल, तर डिहायड्रेशनची चिंता नाही. कॅलरीज चं ही टेंशन नाही. काकडी मधे अगदी कमी कॅलरीज असतात आणि फायबर व व्हिटॅमिन मात्र भरपूर असतात .या कारणांमुळेच काकडी ही वजन कमी करणाऱ्यांपासून ते त्वचेसाठी ग्लो मिळवू इच्छिणाऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम आहे.
थोडक्यात सांगायचं तर…काकडी म्हणजे थंडावा ..निसर्गाने दिलेली नैसर्गिक पाण्याची बाटलीच म्हणा ना! तुमच्या रोजच्या जेवणात काकडीचा समावेश असेल, तर डिहायड्रेशनची चिंता नाही. कॅलरीज चं ही टेंशन नाही. काकडी मधे अगदी कमी कॅलरीज असतात आणि फायबर व व्हिटॅमिन मात्र भरपूर असतात .या कारणांमुळेच काकडी ही Fasting वा intermittent Fasting करून वजन कमी करणाऱ्यांपासून ते अगदी त्वचेसाठी Glow मिळवू इच्छिणाऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम आहे.
काकडी ही हलकी व पचायला सोपी असते रोजच्या आहारात तिला स्थान देणे हितकारक आहे. वरील सोप्या recipe प्रमाणे काकडीचे सॅलड करून आपल्या आहारात तिला नक्की स्थान द्या..
FAQ
European Style Cucumber Salad फ्रिजमध्ये किती दिवस टिकते?
हे सॅलड हवाबंद (Airtight) डब्यात ठेवले तर साधारण 2 ते 3 दिवस फ्रिजमध्ये ताजे राहू शकते. मात्र काकडी कालांतराने पाणी सोडते, त्यामुळे सर्वोत्तम चव आणि पोतासाठी 24 तासांच्या आत खाणे अधिक योग्य ठरते.
या सॅलडमध्ये भारतीय पद्धतीने दही घालता येईल का?
होय. दही घालून हे सॅलड भारतीय चवीनुसार बनवता येते. मात्र व्हिनेगर आणि दही एकत्र मिसळल्यास दही किंचित फाटू शकते किंवा त्याचा पोत बदलू शकतो. त्यामुळे दही वापरणार असाल तर व्हिनेगरचे प्रमाण कमी ठेवा किंवा Original European style चव अनुभवण्यासाठी दही न घालणे योग्य.
Olive Oil वापरणे आवश्यक आहे का?
नाही. Extra Virgin Olive Oil वापरल्यास पारंपरिक युरोपियन चव मिळते. पर्याय म्हणून हलक्या चवीचे तेल वापरता येईल, परंतु चव आणि सुगंधात थोडा फरक पडू शकतो.
White Vinegar ऐवजी Lemon Juice वापरता येईल का?
होय. White Vinegar ऐवजी ताज्या लिंबाचा रस वापरल्यास सॅलडला अधिक भारतीय आणि ताजी चव मिळते. मात्र पारंपरिक युरोपियन रेसिपीमध्ये व्हिनेगरचाच अधिक वापर केला जातो.
सर्दी किंवा घशाचा त्रास असल्यास हे सॅलड खावे का?
सर्दी, घसा खवखवणे किंवा घशात सूज असल्यास थंड काकडी, व्हिनेगर आणि फ्रिजमधून काढलेले सॅलड काही लोकांना त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी ते खोलीच्या तापमानावर खावे किंवा काही दिवस टाळावे. वैयक्तिक सहनशक्तीनुसार परिणाम बदलू शकतो.
हे ही वाचा
➡️Intermittent fasting: Manoj Bajpayee करतोय 14 वर्षे हा उपवास
➡️कॉफीची आवड पण ॲसिडिटीचा त्रास? ‘Cold Brew’ तुमच्या साठी Best Coffee आहे!

