Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

रजत शर्मा ट्रम्प यांना म्हणाले “Modi is best!”यावर ट्रंप म्हणाले No! I am the best – रजत शर्मांनी सांगितलेला किस्सा रंजक आहे

रजत शर्मा यांना India TV वरील मुलाखतीत प्रश्न विचारला गेला की“ आपण डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या ‘आप की अदालत’ शो वर कधी बोलावणार आहात ?” याला उत्तर देताना रजत शर्मांनी ट्रंप यांच्या भेटीचा हा रंजक किस्सा सांगितला

रजत शर्मा ट्रम्प यांना म्हणाले "Modi is best!"यावर ट्रंप म्हणाले No! I am the best – रजत शर्मांनी सांगितलेला किस्सा रंजक आहे

2019 सालची Trump भेटीची आठवण

रजत शर्मा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीची आठवण सांगताना असे सांगितले की…2019 मध्ये डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते व प्रेसिडेंट हाऊस मध्ये त्यांच्यासाठी डिनर आयोजित केला गेला होता . प्रोटोकॉल प्रमाणे मी त्यांचे स्वागत करण्यासाठी इतर निमंत्रित मान्यवरांसोबत रांगेत उभा होतो. डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वांशी ओळख करून देत नरेंद्र मोदी माझ्यापर्यंत आले व माझी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ओळख करून दिली.

असा झाला होता ट्रंप आणि रजत शर्मा यांचा संवाद

मोदी जी ट्रंप यांना म्हणाले – “हे भारताचे सर्वात प्रसिद्ध टीव्ही स्टार आहेत!”

यावर डोनाल्ड ट्रंप रजत शर्मा यांच्याशी हस्तांदोलन करुन पुढे गेले …ट्रम्प पुढे जाऊन पुन्हा मागे आले

ट्रंप – Tv star? What makes you a TV star?

रजत शर्मा– मी एक शो करतो!

ट्रंप – कसला शो?

रजत शर्मा– मी court room Drama पद्धतीचा शोध करतो ज्यात प्रसिद्ध राजकारण्यांना शो वर बोलावून मी प्रश्न विचारतो !

(आता ट्रंप यांनी नरेंद्र मोदींकडे मिश्किलपणे बोट दाखवत शर्मा यांना विचारले)

ट्रंप– तुम्ही या व्यक्तीलाही बोलावलं होतं?

रजत शर्मा– होय मी यांना दोनदा बोलावल होतं!

ट्रंप– यांच्याबरोबर तुमचा अनुभव कसा होता?

रजत शर्मा– He is best?

ट्रंप– No I am the best !

रजत शर्मा– मग तुम्ही माझ्या शो ला यायला हवं!

(आता ट्रंप पुन्हा पुढे गेले आणि पुन्हा मागे वळून आले)

ट्रंप– हा शो तुम्ही कुठे करता?

रजत शर्मा – मी इथे भारतात शूट करतो पण आपण माझ्या शो वर येणार असाल तर मी वॉशिंग्टन ला देखील शूटिंग करू शकतो!.इथे डोनाल्ड ट्रंप आणि रजत शर्मा यांचा संवाद संपला

2019 च्या President House मधील Trump यांच्याशी झालेल्या संवादानंतर रजत शर्मा यांनी 2024 साली US President Donald Trump यांना आपल्या आपकी अदालत कार्यक्रमात बोलावण्यासाठी प्रयत्न सुरू केले… ट्रंप यांनी मुलाखतीस तयारी दर्शवली होती पण ….. (खाली वाचा)

रजत शर्मा यांच्या India TV वरील मुलाखतीची लिंक

2024 साली ट्रंप यांना आपकी अदालत मधे आणन्याचे निश्चित झाले होते..

2024 मध्ये जेव्हा अमेरिकेत निवडणुका प्रचार सुरू होता त्या दरम्यान रजत शर्मा यांनी Donald Trump यांना पुन्हा संपर्क केला. असे ठरले होते की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत ज्या कुठल्या शहरांमध्ये प्रचार दरम्यान गेलेले असतील त्या शहरात जाऊन ट्रम्प यांची एक तासाची मुलाखत करायची. पण नेमके याच वेळेस ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला व त्यांच्या कानाला गोळी चाटून जाण्याची गंभीर घटना घडली. या नंतर सुरक्षा व्यवस्थे कडून ट्रंप याची सार्वजनीक सुरक्षा व्यवस्था कड़क करण्यात आली आणि याच कारणास्तव आपकी अदालत चे शूटिंग ही कॅंसल करण्यात आले. रजत शर्मा पूढे म्हणाले “असे झाले असले तरी … भविष्यात मी ट्रंप यांना आपकी अदालत शो वर नक्की बोलवेन!”

रजत शर्मा यांची सदर मुलाकात या लिंक वर पहा→Rajat Sharma about Donald Trump on Apki Adalat

हे ही वाचा

▶️भारत व अमेरिकेमध्ये मांडवली करून देणारा मध्यस्थ कोण आहे? unpredictable Trump ला या माणसाने कसे समजावले

▶️Trump यांना घरचा आहेर -“भारत छोटा देश नाही! ..तो आपला अपमान विसरणार नाही!” अमेरिकेचे पूर्व सचिव Christopher यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा..

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment