Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर आता मुंबईत पहाण्याची संधी आहे – ही संधी सोडू नका

Dr बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर मुंबईत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर आता मुंबईत पहाण्याची संधी आहे - ही संधी सोडू नका

डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर भारत सरकारने संरक्षित केले आहे. अनेकांना हे घर पहाण्याची इच्छा असते पण ते शक्य होत नाही. या घराची हुबेहुब प्रतिकृती सध्या मुंबईत १ मे २०२६ पर्यंत पहाता येणार आहे.

वरळी च्या SP Group ची संकल्पना

SP Group या वरळीच्या तरुणांच्या मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंती निमित्त 14 April 2026 रोजी आंबेडकरांच्या लंडन च्या घराची प्रतिकृती लोकांना पहाण्यासाठी खुली केली आहे. हे सर्व तरूण BMC कामगारांची मुले आहेत. अशा प्रतिकृती बनवण्याचा कुठला ही पूर्वानुभव नसताना या तरुणांनी हुबेहुब अशी ही प्रतिकृती बनवली आहे.

  • घराच्या मुख्य दालनातील आंबेडकरांचा अर्धपुतळा .
  • भिंतीवर आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो.
  • एक बुद्ध विहार
  • व आंबेडकरांची लायब्ररी इथे पहायला मिळते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर आता मुंबईत पहाण्याची संधी आहे - ही संधी सोडू नका

आंबेडकरांच्या लंडन मधील घराचे महत्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे उच्च शिक्षणासाठी दोन कालखंडात राहिले होते. १९१६ ते १९१७ व १९२० ते १९२३ हे ते दोन कालखंड. अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यालयामधे डॉक्टरेट मिळवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट करण्यासाठी आले होते. याच घरातील वास्तव्यात Problem of Rupee हा प्रबंध लिहून त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट संपादित केली.अभ्यासाची तीव्र भूक असलेल्या बाबासाहेबांनी LSE च्या शिक्षणासोबतच ‘ग्रेज इन’ या कायद्याच्या संस्थेतून बॅरिस्टरची पदवीही याच काळात संपादित केली.

आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासाची साक्षिदार असलेली लंडन मधील वास्तू Blue Plaque नामफलकाची मानकरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर आता मुंबईत पहाण्याची संधी आहे - ही संधी सोडू नका

Blue Plaque – निळी मानाची पाटी :लंडन मधील ज्या ऐतिहासिक वास्तूंमधे महान भारतीय व्यक्ति राहिल्या त्या वास्तूंवर सरकारी योजने नुसार मानाची निळी पाटी लावली जाते. यास Blue Plaque म्हणतात. वरळी येथील आंबेडकरांच्या लंडन मधील घराच्या प्रतिकृती वर ही हा Blue Plaque जशीच्या तशी साकारलेली दिसते.

बाबासाहेबांनी लंडनमध्ये वायव्य (North West London) लंडनमधील १०, किंग हेनरी मार्ग या पत्त्यावर, १९२१-२२ दरम्यान वास्तव्य केले होते.वर्ष २०१५ मध्ये, महाराष्ट्र सरकारने हे ऐतिहासिक घर ताब्यात घेतले व २०२० पासून हे घर Dr Babasaheb Ambedkar यांचे सुसज्ज स्मारक व संग्रहालय म्हणून सर्वांसाठी खुले करण्यात आले.

मुंबई मधे आंबेडकरांचे लंडन चे हे घर सध्या पहाता येणार आहे ..

सर्वसामान्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील या घराबाबत नेहमीच कुतूहल राहिले. अनेकांना आंबेडकरांचे लंडन मधील हे घर पहाण्याची इच्छा आहे पण ते शक्य होत नाही. हीच अडचण लक्षात घेवून वरळी च्या SP Group या संस्थेने‌ वरळी नाका चौका जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या लंडन च्या घराची हुबेहुब प्रतिकृती सर्वसामान्यांसाठी उभी केली आहे.

@liveitupwithrajeev या instagram channel वर या प्रतिकृती ची झलक पहायला मिळते. खालील लिंक वर ती जरूर पहा

कुठे पहाल

मुंबई च्या वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील घराची ही प्रतिकृती तुम्ही येत्या 1 में 2026 पर्यंत पाहू शकता .


हे ही वाचा: ▶️Dr Babasaheb Ambedkar चित्रपटात आंबेडकरांची भूमिका hollywood चे Robert de Niro करणार होते..पण..▶️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांची औरंगाबाद मधली तणावपूर्ण भेट : 1 जबरदस्त किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment