Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

150 वर्षांपूर्वी शोधली मुंबई मिल कामगारांनी पावभाजी -Pav Bhaji ची Link अब्राहम लिंकन पर्यंत जाते

पावभाजी चा संबंध पहिल्या अमेरिकन गृह युद्धा(first American Civil War) सोबत आहे असे सांगितले तर तुम्हाला कसे वाटेल? Abraham Lincoln यांनी अमेरिकेत गुलामगिरी संपवली (Slavery Abolishment) या मानवता वादी निर्णयामुळे ब्रिटिश काळात कापड उद्योग केंद्र असलेल्या मुंबई कामगारांना झटपट बनणारी पावभाजी का शोधावी लागली हे सांगणारा हा लेख आहे. History of Pav bhaji Recipe ही पावभाजी इतकीच रोचक आहे….

मुंबई च्या फेमस पावभाजी चा जन्म दक्षिण अमेरिकेत गुलामगिरी च्या अस्तामुळे

Imaginary A I generated picture of 1866 depicting Mumbai Mill workers preparing their meal at night

1854 मध्ये मुंबईत ताडदेव इथे पहिली कॉटन मिल सुरू झाली. तिचे नाव होते The Bombay spinning and weaving mill.
पुढील पाच-सहा वर्षात आणखी दहा कॉटन मिल मुंबईत सुरू झाल्या. या सर्व मिल्स ला लागणारा कापूस हा भारत तसेच इजिप्त आणि फार मोठ्या प्रमाणात दक्षिण अमेरिकेतून मागवला जात असे.

1861 ते 1865 या काळात अमेरिकन सिविल वॉर सुरू झाले .

उत्तर अमेरिकेतील युनियन विरुद्ध दक्षिण अमेरिकेची कॉन्फिडरसी यांच्यामधील हे युद्ध होते. या युद्धाचे कारण होते ‘गुलामगिरी प्रथा
उत्तर अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीचे नेते त्यावेळी अब्राहम लिंकन होते. मानवतावादी अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेतून गुलामगिरी नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.
दक्षिण अमेरिकेत त्या काळात मोठ्या प्रमाणात आफ्रिकन गुलामांचा शेतीसाठी वापर केला जात होता. या शेतीत कापसाचे उत्पादन ही होत होते. कापड निर्मिती साठी ब्रिटन हा कापूस आयात करत होता.

दक्षिण अमेरिकेच्या कॉन्फिडरेसीला असे वाटले की जर गुलामगिरी बंद झाली तर शेती कामासाठी कामगार मिळणार नाही व उत्पादन थांबेल. कापसाच्या निर्यातीतून मिळणारा मोठ नफा हातचा जात होता .याच कारणासाठी त्यांनी अब्राहम लिंकन यांच्या विरुद्ध थेट युद्ध पुकारले.

उत्तर अमेरिकेच्या युनियनने युद्ध जिंकले व गुलामगिरीच्या प्रथेचा शेवट

अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली उत्तर अमेरिकेने हे युद्ध जिंकले व लिंकन यांनी गुलामगिरी प्रथा बंद केली. दक्षिण अमेरिकेचे आफ्रिकन गुलाम आता उत्तर अमेरिकेच्या सैन्यात भरती झाले. शेतांवर कामगार उपलब्ध न झाल्याने दक्षिण अमेरिकेची शेती उत्पादन घटले. कापसाचे उत्पादनही कमी झाले.ब्रिटन ला लागणारा कापड पुरवठा ही आता कमी झाला.

कापड पुरवठ्याची तूट मुंबई च्या कामगारांनी भरून काढली

ही तूट भरून काढण्यासाठी ब्रिटन ने भारतातील मुंबई मधील कापड गिरण्यांमधे उत्पादन वाढविण्याचे ठरवले.त्यांनी मुंबई मिल कामगारांना मिलमध्ये अहोरात्र कामास जुंपले. मुंबई मधले गिरणी कामगार आता दिवस-रात्र मिलमध्ये राहू लागले.
हे मिल कामगार विविध गट करून एकोप्याने राहत असत. एकाच वेळी सर्वांचे जेवण पटकन तयार व्हावे या उद्देशाने एक शक्कल लढवली गेली. ही शक्कल म्हणजेच पावभाजी या iconic पदार्थाची Pav bhaji Recipe.

अशी बनवत मिल कामगार पावभाजी

पोर्तुगीजांनी मुंबईत आधीच अनेक बेकर्या सुरू केल्या होत्या. या बेकऱ्यांमध्ये तयार पाव (Bread) मिळत असे. या पावामुळे चपाती बनवण्याचा त्रास व वेळ वाचे. मिल कामगार आपल्या उरलेला सर्व भाज्या एकत्रित करून त्यांना तेल व मसाल्यामध्ये उकडत व त्याचा लगदा करून पावसासोबत खात. ही भाजी कमी वेळेत तर बनत असेच पण चवीला ही ती उत्कृष्ट असे. सर्व भाज्यांचे मिश्रण असल्यामुळे ती पौष्टिक ही असे. अशाप्रकारे मुंबईच्या मिल कामगारांचा जेवणाचा प्रश्न मिटवून जेवण बनवण्याचा वेळ ही भाजी वाचवू लागली.
प्रसिद्ध पावभाजी चा जन्म अशा प्रकारे मुंबईमध्ये 19 व्या शतकाच्या मध्यावर झाला.

बटाटा हा जसा इतर सर्व भारतीय भाज्यांमध्ये आवर्जून असतो तसा तो पावभाजी मध्येही असतो. विशेष म्हणजे हा बटाटा सुद्धा दक्षिण अमेरिकेचे पीक आहे. बटाट्या सोबत फुल गोबी, मटर ,भोपळा अशा भाज्या कामगार पावभाजी करताना वापरत. दीडशे वर्षांपूर्वी आफ्रिकन गुलाम अब्राहम लिंकन मुळे गुलामगिरी तून मुक्त झाले आणि इकडे मुंबईत मानवी स्वातंत्र्याचा दरवळ घेवून पावभाजी जन्माला आली.

टीप: हा लेख ऐतिहासिक घडामोडी आणि खाद्यसंस्कृतीतील प्रचलित कथनांच्या आधारे मांडलेला सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आहे. येथे मांडलेला संबंध थेट दस्तऐवजीकृत कारण-परिणाम म्हणून नव्हे, तर एक अभ्यासपूर्ण निरीक्षण म्हणून पाहावा.

Preparation and pic by Avinash Ghodke

हे ही वाचा : येशू ख्रिस्त भारतात आले होते का? Did Christ visit India? || Old Monk Rum चं जनरल डायरशी जुळणारं नातं.. इतिहास जाणून घ्या || भोपाळ चे वकील आहेत फ्रांसचे राजा-Nepoleon 4-French king in Bhopal

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment