Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Rain Forecast Maharashtra: महाराष्ट्रात ४८ तासात‌ पाऊस

 पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर : वादळी वारा असेल छत्री सांभाळा

Rain drop falling down on shallow waters
कर्नाटकात रेंगाळलेला पाऊस काही तासांत

 महाराष्ट्रात दाखल होतोय .

सध्या पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

पाऊस कर्नाटकात काहीसा रेंगाळला

IMD अर्थात Indian Meteorology Department ने आपला हवामान अंदाज प्रसिद्ध केला आहे. केरळ मधे काही दिवसांपूर्वीच पावसाने आपली हजेरी लावली आहे . पुढे वाटेत कर्नाटकात तो काहीसा रेंगाळला. पण आता ४८ तासात पाऊस महाराष्ट्रात दाखल‌ होईल असे IMD ने जाहीर केले‌ आहे. 

मान्सून कर्नाटकात दाखल झाला असल्यामुळे बंगळुरूमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे . कर्नाटकात इतका तूफान पाऊस आहे की हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. इकडे‌ मुंबई पुणे अजूनही दग्ध-भूमीच आहे. 

महाराष्ट्रात पावसाबरोबरच वादळाची हजेरी असेल. पश्चिमी महाराष्ट्रात वादळी पाऊस 

महाराष्ट्रात काही भागात एव्हाना  pre monsoon showers  पडत ही आहेत. Monsoon महाराष्ट्रात या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. 3  व 4 जून रोजी मुंबई, ठाणे जिल्ह्यांसह महाराष्ट्रात इतर काही भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच या दरम्यान 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

उत्तर भारतात मात्र जून अखेर पर्यंत काहिली

आयएमडीच्या अंदाजानुसार, 7 जूनपर्यंत दिल्लीमध्ये आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस आणि किमान 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. 

दक्षिणेकडे मान्सून पोहोचला असताना, आयएमडीने दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. दिल्लीकरांना जून  अखेरपर्यंत उन्हाळ्याच्या उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळणार नाही, असं आयएमडीने म्हटले आहे.

यंदा महाराष्ट्रातील पाऊसमान

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 10 किंवा 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

अती वृष्टीचा अंदाज

 यंदा उष्णतेने उच्चांक गाठला त्याच तालावर पाऊस ही १०६% अधिक होण्याची यंदा शक्यता आहे. August September या‌ महिन्यांत अतीवृष्टीची शक्यता IMD ने‌ वर्तवली आहे. या दोन महिन्यांत शक्यता प्रवास टाळणे योग्य असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment