बॅंगलोर च्या वृषाली प्रसादे आणि दानिश आब्दी या तरूण Swimmer Couple चे new Swimming Record प्रस्थापित झाले आहे.भारत व श्रीलंकेतील पाल्क ची सामुद्र धुनी पार करत हे नवे रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केले आहे. विशेष म्हणजे या दोघांना ४ वर्षांपूर्वी अजिबात Swimming येत नव्हते.
अवघ्या चार वर्षांचा Swimming portfolio
वृषाली व दानिश हे दोघेही Adventure sports च्या खडतर क्रिडांमधे गेली काही वर्षे सातत्याने भाग घेत आहेत व अवघड अशा Triathlon स्पर्धांमधे ते यापूर्वी विजेते राहिले आहेत. Iron Man , Barcelona 2024 चे ते विजेते आहेत. Half Iron Triathlon बरोबरच त्यांनी इंग्लिश खाडी ( इंग्लंड ते फ्रांस ) याआधी पार केली आहे.
पोहण्याचा मार्ग -Palk सामुद्रधुनी -रामायणातील समुद्र सेतू चा मार्ग
वृषाली व दानिश या दांपत्याने श्रीलंका ते भारत पोहण्यासाठी ज्या पाल्क सामुद्रधुनी चा मार्ग अवलंबला तो मार्ग वाल्मिकी रामायणात रामाने लंकेवर केलेल्या आक्रमणाचा मार्ग आहे. याच मार्गावर समुद्रावर रामसेतू बांधण्यात आला होता व त्या रामसेतूचे अवशेष समुद्र तळाला आजही असल्याचे काही संशोधक मानतात. वृशाली व दानिश या पती पत्नी ने श्रीलंकेच्या तलयमन्नर ते भारतातील धनुषकोडी पर्यंतचा समुद्री मार्ग एकत्र पोहत पार केला आहे.

कसे केले Record
दानिश व वृषाली या मोहिमेची तयारी गेले काही महिने सातत्याने करत होते. रोज पहाटे उठून पोहण्याचा सराव व त्यानंतर व्यायाम असा दमछाक करणारा रूटीन या सरावासाठी त्यांनी अवलंबला होता. शारीरिक ताकदीसाठी तज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी Protein supplement ही घेतल्याचे ते सांगतात.
६ में रोजी भल्या पहाटे 4.30 वाजता श्रीलंकेच्या तलयमन्नार येथील समुद्र किनार्यावरून दोघांनी पोहायला सुरूवात केली. दानिश ने ” जय बजरंग बली!” म्हणत समुद्रात उडी घेतली .एकूण ३२ किलो मीटर चे समुद्री अंतर १० तास ४५ मिनिटांत एकमेकांच्या सोबतीने कापून या पती पत्नीने एक नवा Couple Swimming रेकॉर्ड प्रस्थापित केला. कुठल्या ही पती पत्नीने जोडीने असा रेकॉर्ड यापूर्वी केलेला नव्हता, त्यामुळे हे Couple चे New Swimming Record आहे.
Open water swimming ची आव्हाने
Swimming pool मधे पोहण्या पेक्षा समुद्रात Open water मधे पोहणे हे जास्त आव्हानात्मक असते. Swimming pool मधे एका सीमित जागेत व सुरक्षित अशा controlled environment मधे पोहायचे असे. इथे पाण्याची खोली तुलनेने अतीशय कमी असते. तसेच नैसर्गिक आव्हाने ही इथे शून्य असतात. याउलट Open water मधे एकदा पोहायला सूरूवात केल्यावर अनेक तास पायाला जमीन लागत नाही. हवेची दिशा व पाण्याचे प्रवाह अनेकदा नवनवी आव्हाने व अडचणी निर्माण करतात. केवळ अनुभव व शारिरीक क्षमतेच्या जोरावरच इथे आपले लक्ष गाठणे शक्य होते.
फेसबुक ने जमवली जोडी
दानिश हा कवी आहे व त्याने आपला कविता संग्रह ही प्रकाशित केला आहे. याच कविता संग्रहा संदर्भात दानिश व वृषाली चे फेसबुक वर बोलणे झाले.याच ओळखीतून पूढे संवाद वाढत गेला, एकमेकांच्या आवडीनिवडी एकच असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे Adventure sports ची दोघांची आवड हा महत्त्वाचा समान धागा दोघांत होता. जोडीने आपली स्वप्ने साकार करण्यासाठी दोघांनी अखेर विवाह करण्याचा निर्णय घेतला.
गिर्यारोहणाची ही आवड
दोघांनाही Swimming सोबतच गिर्यारोहण करण्याची आवड ही आहे. या आधी त्यांनी किलीमंजारो शिखर सर केले आहे व पुढे गिर्यारोहणातही एकत्रितपणे नवे रेकॉर्ड करण्याचा त्यांचा मानस आहे.
तुम्हाला Swimming मधे करीअर करायचे आहे का?
दानिश व वृषाली चे @our.life.in.miles हे Instagram account आहे. यावर त्यांनी आपण Swimming मधे आवड असणाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत अशी नुकतीच घोषणा केली आहे. Open water swimming कसे करावे याबाबत हे मार्गदर्शन असणार आहे. ” आम्ही स्वतःला swimming expert म्हणवून घेत नाही पण आम्ही आमचे अनुभव एखाद्या वर्ग मित्रा प्रमाणे आपल्या सोबत शेअर करू इच्छितो!” असे ते म्हणतात. या संदर्भातील अधिक माहिती आपण त्यांच्या वेबसाइटवर पाहू शकता. तुमच्या बरोबरच तुमच्या जोडीदाराला ही जर Open water Swimming मधे रुची असेल तर भविष्यात तुम्हीही Couple चे New Swimming Record प्रस्थापित करू शकाल.
दानिश ने ” जय हनुमान !” म्हणत रामसेतू समुद्र मार्गावर घेतलेली उडी खालील रील मधे पोस्ट केली आहे..

