ट्रेडिंग गुरु अवधूत साठे – प्रवास, शिक्षण शैली आणि SEBI ची कारवाई
अशी झाली सेबी कारवाई
शेअर बाजारातील प्रसिद्ध “ट्रेडिंग गुरु” अवधूत साठे यांच्या कर्जत येथील अकॅडमीवर अलीकडेच SEBI ने छापा टाकला.
कारवाईचे कारण असे सांगितले जाते की, शिक्षणाच्या नावाखाली काही ठिकाणी गुंतवणूकदारांना penny stocks विषयी दिशाभूल करणारी माहिती दिली जात होती. याच साठी SEBI ने ही मोहीम उघडली आहे.या तपासणीदरम्यान SEBI अधिकाऱ्यांनी डिजिटल साधने, दस्तऐवज व ट्रेडिंग संबंधित डेटा जप्त केला.
ही कृती म्हणजे फिनफ्लुएंसरच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्याचा आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याचा एक प्रयत्न आहे असे सेबी चे म्हणने आहे.
अवधूत साठे यांच्या अकॅडमी चे उत्पन्न
गेल्या काही वर्षांत अवधूत साठे यांच्या अकॅडमी चे उत्पन्न ज्या पद्धतीने वाढले आहे ते अविश्वसनीय आहे.Moneycontrol ने उपलब्ध केलेल्या माहितीप्रमाणे, अवधूत साठे यांच्या Avadhut Sathe Trading Academy चे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे:
2021 ₹17 कोटी
2022 ₹37 कोटी
2023 ₹86 कोटी
2024 ₹116 कोटी
2025 (अंदाज) ₹200 (सुमारे)कोटी
*ही आकडेवारी वास्तविक प्रमाणावर आधारित नसून अंदाजावर आधारित आहे, म्हणून स्वतंत्रपणे सत्यापित करणे आवश्यक आहे, असे Moneycontrol ने अधोरेखित केले आहे
जीवन प्रवास
अवधूत साठे यांचा जन्म दादरच्या चाळीत झाला आणि त्यांचे बालपण साध्या परिस्थितीत गेले. नंतर कुटुंबासह ते मुलुंड येथे स्थायिक झाले.
इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करून त्यांनी IT क्षेत्रात काम केले. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही त्यांनी काही काळ नोकरी केली.
तथापि, 2007 मध्ये त्यांनी IT क्षेत्र सोडून ट्रेडिंगला पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकारले.
2008 मध्ये त्यांनी स्वतःची Avadhut Sathe Trading Academy (ASTA) सुरू केली.
सुरुवातीला फक्त काही विद्यार्थ्या सोबत सुरू झालेली ही अकॅडमी आज मोठ्या प्रमाणावर विस्तारली असून. कर्जत येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रा व्यतिरिक्त विविध शाखा तसेच ऑनलाइन कोर्सेस असा ASTA चा पसारा वाढला आहे.
नाट्यमय व रंजक शैली – बॉलीवूड रंगत
अवधूत साठे यांची शिकवण ही केवळ कोरडे चार्ट्स किंवा आकडेवारीवर आधारित नसते. त्यात नाट्य, ऊर्जा आणि वेगळा उत्साह असतो.
- वर्गात मोठ्या स्क्रीनवर चार्ट्स दाखवणे, लाईव्ह ट्रेडिंग दाखवणे
- विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलावून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे
- संगीत, जोश आणि रंगतदार सादरीकरण करून विषय शिकवणे
यामुळे त्यांची शैली “बॉलीवूड-स्टाईल” म्हणून ओळखली जाऊ लागली.
तसेच, त्यांनी अकॅडमीला गुरुकुलसारखा माहोल दिला आहे. विद्यार्थ्यांसाठी एकत्रित साधना, सत्संग, सकारात्मक वातावरण आणि उत्साही टीम स्पिरिट ही त्यांच्या शिकवणीची वैशिष्ट्ये आहेत.
ट्रेडिंगमधील मनोविज्ञान
अवधूत साठे यांनी ट्रेडिंगमध्ये मनोविज्ञान या घटकाला केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या मते—
“मन जिंकले की बाजार जिंकता येतो.”
- भावनांवर नियंत्रण: भीती आणि लोभ या दोन भावना ट्रेडिंगमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यांना काबूत ठेवणे आवश्यक आहे.
- Trader’s Mindset: नुकसान पचवण्याची ताकद, सातत्य ठेवण्याची वृत्ती आणि अपयशातून शिकण्याची तयारी ही ट्रेडरची खरी शक्ती आहे.
- शिस्त आणि संयम: बाजारातील प्रत्येक संधी लगेच फळ देत नाही. ठरवलेल्या नियमांचे पालन आणि संयम बाळगणे अत्यावश्यक आहे.
- सकारात्मक ऊर्जा: ध्यान धारणा(Yoga), Affirmations आणि Visualization यांद्वारे मन सकारात्मक ठेवल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाते.
- AFOOFA संकल्पना: All For One, One For All—सामूहिक मनोवृत्ती आणि परस्पर सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
ट्रेडिंगबद्दल त्यांचे मत
अवधूत साठे यांच्यासाठी trading म्हणजे फक्त उपजीविकेचे साधन नव्हते, तर एक राष्ट्रीय आणि जागतिक लढाईतील शस्त्र होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार…
“share market हा आकड्यांचा खेळ नसून मनाचा कस आहे. जो स्वतःच्या भावनांवर विजय मिळवतो, तोच खरा ट्रेडर ठरतो.”
कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
अवधूत साठे हे एक मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेले पण प्रचंड लोकप्रिय झालेले ट्रेडिंग गुरु आहेत. त्यांच्या शिक्षणशैलीतील उत्साह, मनोविज्ञानावर दिलेला भर आणि ट्रेडिंगला दिलेला वेगळा दृष्टीकोन यामुळे त्यांची ओळख ठळक झाली.
तथापि, SEBI च्या कारवाईनंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
आपल्या ट्रेडिंग प्रशिक्षणात संघभावना निर्माण करण्यासाठी अवधूत साठे AFOOFA अर्थात “All for one …One for all”या फ्रेंच ततत्वज्ञानचा आधार घेत असे कळते. हे तत्वज्ञान संत तुकाराम यांच्या अभंगाशी मिळते जुळते आहे. आपल्या एका अभंगात संत तुकाराम म्हणतात..
एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥१॥कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥२॥तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची ॥३॥ - संत तुकाराम
Treding मधे पैसा ‘जोडणे’ हे ध्येय असते. जे आजच्या काळात समर्थनीय ही आहे पण संत तुकारामांच्या अभंगातली शेवटची ओळ ..तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची ॥३॥ .. अर्थात आयुष्याची सर्वात मोठी जोड(पुंजी) परमेश्वराच्या चरणांची भक्ती आहे असे म्हटले आहे. भारतीय अध्यात्मात ध्येयवादाला आध्यात्माची जोड दिली आहे. अवधूत साठेंनी योग विचार फक्त तांत्रिकता म्हणून स्वीकारला इथे त्यांची गल्लत झाली असावी..

