JRD Tata यांचे मुंबई Gateway of India समोरील Hotel Taj हे Gothic वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमूना आहे. हे हॉटेल बांधण्यामागे टाटा यांची एक प्रतीशोध कथा सांगितली जाते …. Hotel Taj History
 |
| तीन चित्रांचा कोलाज, डावीकडे, Hotel Taj, मध्यभागी भारतीय चित्रपटाचे जनक श्री. फाळके यांच्या पुतळया सोबत स्वत: लेखक – उजवीकडे वॉटसन हॉटेलची इमारत. |
Hotel Taj History आणि वॉटसन हॉटेल
-Cinematic प्रतिशोध कथा…
Hotel Taj ज्या फोर्ट भागात आहे तिथून काही अंतरावरच एक जुनी ब्रिटिश कालीन इमारत काला घोडा चौकासमोर उभी आहे. या इमारतीला एस्प्लेनेड इमारत म्हणतात. ताज होटल बांधण्याच्याही आधी ही इमारत ब्रिटिश काळात Watson Hotel म्हणून प्रसिद्ध होती. या इमारतीचे आणि Cinema चे ही एक विशेष नाते आहे. फ्रांस चे Lumier brothers जेंव्हा भारतात प्रथमच Cinema घेवून आले होते तेंव्हा याच Watson hotel मधे त्यांनी भारतातील पहिले Cinema show दाखवले होते. हेच Watson Hotel कारणीभूत ठरले होते ताज होटल च्या निर्मिती साठी आणि त्यामागची कथा Cinematic Vengeance story म्हणावी अशीच आहे. 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात Taj Hotel चे कासी नुकसान झाले होते. या हल्ल्यामुळे Taj Hotel जागतीक मीडियाच्या नजरेत आले होते. Ramgopal Verma सारख्या दिग्दर्शकाला या आतंकवादी हल्ल्याच्या घटनेवर चित्रपट बनवावा वाटला व योगायोगाने तो भारतीय सिनेमाच्या शतक महोत्सवी वर्षात प्रदर्शित झाला. म्हणजे Watson मधे Lumier चा Cinema show झाल्यावर एकशे सतरा वर्षांनंतर Taj hotel च्या दुर्दैवी आतंकवादी हल्ल्यावर Cinema बनला..
२००८ : Hotel Taj वरील दहशतवादी हल्ला
Hote Taj अर्थात ताज महाल हॉटेल हे मुंबई शहराचे अभिमान आहे. ताज हॉटेलमध्ये असणे ही कोणत्याही मुंबईकरासाठी स्वप्नपूर्तीची अनुभूती आहे. खूप पूर्वी, मी इंडस्ट्रियलिस्ट हिंदुजांच्या मालकीच्या केबल चॅनेलच्या उद्घाटन समारंभाचे मीडिया कव्हरेज करण्यासाठी तिथे होतो. श्री. हिंदुजा या प्रसंगी म्हणाले… “जसे मुंबई उपनगरातील रस्त्यांवर खड्डे असतात, तसेच न्यूयॉर्क उपनगरातील रस्त्यांवरही खड्डे आहेत… परंतु भारतीय खड्ड्यांचे नेहमी पश्चिमी माध्यमांद्वारे विशेष प्रदर्शन होते.” हिंदुजांच्या या उपरोधिक विधानानंतर काही वेळातच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेल काबीज केले आणि हा धक्कादायक हल्ला जागतिक माध्यमांवर झळकला. मी टीव्हीवर ताज हॉटेल आगीत आणि काळ्या धुराच्या ढगांमध्ये पाहिले. ताज हॉटेलची सुंदर रचना काळ्या धुराच्या ढगांनी वेढली होती. हा मुंबई शहरावरील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वात दु:खद अध्याय होता.
यानंतर, प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या आतंकवादी घटनेवर एक बॉलिवूड चित्रपटही बनवला. ‘The Attacks of 26/11’ नावाचा हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला, जो भारतीय सिनेमाच्या शतक महोत्सवाचं वर्ष होतं.
२०१३ – काला घोडा कला महोत्सवाने साजरे केले सिनेमाचे शतक महोत्सवी वर्ष
काला घोडा महोत्सव हा मुंबई शहराचा वार्षिक कला महोत्सव आहे, जो फोर्ट भागात आयोजित होतो आणि त्याचे आर्ट इन्स्टॉलेशन झोन Taj Hotel पासून जवळच असतात.
या सिनेमाच्या शतक महोत्सवी वर्षात त्यांनी महोत्सवाच्या इन्स्टॉलेशन झोनमध्ये भारतीय चित्रपटाचे जनक श्री. दादासाहेब फाळके यांचा एक कलात्मक पुतळा प्रदर्शित केला होता. चित्रपट लेखक आणि सिनेमा प्रेमी म्हणून मी स्वतःला भारतीय चित्रपटाचे जनक श्री. फाळके यांच्यासोबत फोटो काढण्यापासून थांबवू शकलो नाही.
हा फोटो काढत असताना, पुतळ्याच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे मला ब्रिटिश कालखंडातील जुनी इमारत ‘एस्प्लनेड मॅन्शन’ दिसली. १७ जुलै १८९६ रोजी येथे लुमिएर बंधूंनी (सिनेमाचे शोधक) येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित त्यांचा मूक चित्रपट दाखवला होता. भारतातील हा पहिला सिनेमा प्रदर्शन होता.
हॉटेल वॉटसन जेथे भारतीयांना प्रवेश मिळत नव्हता
त्या काळात एस्प्लनेड मॅन्शन हे हॉटेल वॉटसन नावाचे भव्य आणि आलिशान हॉटेल होते, जिथे केवळ गोरे ब्रिटीश लोकच प्रवेश करू शकत होते.
ऐकिव माहितीप्रमाणे, एकदा भारतातील महान स्टील उद्योजक सर जमशेदजी टाटा यांना या हॉटेल वॉटसनच्या प्रवेशद्वाराजवळ अडवले गेले आणि भारतीय असल्याने त्यांना प्रवेश नाकारला गेला. टाटा यांनी हा अपमान मनावर घेतला आणि सूड म्हणून १९०३ साली श्री. जमशेदजी टाटा यांनी वॉटसनच्या जवळच त्यांचे स्वतःचे आलिशान हॉटेल ‘हॉटेल ताज महाल’ बांधले. Hotel Taj अरबी समुद्राकडे तोंड करून उभे आहे आणि प्रसिद्ध ‘गेटवे ऑफ इंडिया’पासून काही अंतरावरच आहे. विशेष म्हणजे, ऐतिहासिक ‘गेटवे ऑफ इंडिया’ हे १९११ साली बांधले गेले, म्हणजे Hotel Taj उभारल्यानंतर ८ वर्षांनी .
अपमानीत झाल्यानंतर जिद्दी ने यश संपादित करायचे हा JRD Tata यांच्या Tata Spirit चा वारसा पुढे त्यांचे पुत्र रतन टाटांनी ही चालवला.
जरी इतिहासकार या “सूडकथेच्या” सत्यतेवर वाद घालत असले तरी, चित्रपट लेखक म्हणून मला ही कथा अत्यंत रंजक आणि चित्रपट निर्मिती साठी पूरक वाटते.
शेवटी, सूडकथा नेहमीच बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरल्या आहेत. आणि त्यांचे यश नेहमीच मुंबई शहरातील आलिशान हॉटेल्सच्या बॉलरूम्समध्ये साजरे ही केले जाते.
हे ही वाचा
About The Author
Very nice & interesting information. 👍🏻
Thanks a lot. Plz share and support