American Pop Queen Madona Indian Spirituality च्या ओढीने भारताच्या प्रसिद्ध कुंभ मेळ्याला आली होती. आदी शंकराचार्यांच्या संस्कृत श्लोकावरील तिचे ‘ शांती /अष्टांगी’ हे गाणे या आधीच लोकप्रिय झाले होते.
मोडलेलं लग्न आणि यशाचा चढता आलेख
९० च्या दशकातील pop Queen Madona Indian Spirituality चे आचरण आपल्या आयुष्यात करत होती हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. १९८५ ला मॅडोनाने प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते शॉन पेन (Sean Penn) यांच्याशी पहिले लग्न केले होते ते चारच वर्षे टिकले . मोडलेले लग्न तिला भावनिक वेदना देवून गेले होते. दुसरीकडे “I am a material girl” हे 85 सालचे गाजलेले गाणे तिची ओळख झाले होते. Material Girl हे गाणं chartbuster झालं होतं.मात्र Star life च्या या झगमगाटात आपण आत्मिक सूख हरवतोय याची जाणीव मॅडोना ला आता होवू लागली होती.
दुसर्या जोडीदारासोबत Live in चा निर्णय
पहिल्या विवाहातून विभक्त झाल्यावर Madona च्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आले. यावेळी मात्र तिने लग्नाच्या सोपस्काराला टाळले. 90 च्या दशकात कार्लोस लिओन या fitness trainer बरोबर तिने Live in मधे राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. या संबंधातून तिला पहिल्यांदा मातृत्व लाभले.
पहिले मातृत्व आणि आत्मशोधाचा प्रवास
पहिली मुलगी ‘लूर्ड्स’ (Lourdes Leon) हिचा जन्म (Oct 96) झाला आणि Madona च्या मनात आपण आपल्या आपत्यासाठी मागे काय सोडून जाणार आहोत असा विचार पिंगा घालू लागला. इथूनच तिच्या आत्मशोधाचा प्रवास सुरू झाला. याच काळात गरोदरपणानंतरच्या शारीरिक फिटनेस साठी योग्य असा व्यायाम शोधताना तिला भारतीय अष्टांग योगाची माहिती मिळाली. याच अष्टांग Yoga प्रशिक्षणातून पुढे तिची भारतीय अध्यात्माची जिज्ञासा वाढली.योगासने करता करता तिची रुची हिंदू तत्त्वज्ञान, ध्यान (Meditation) आणि मंत्रोच्चारांकडे वाढली

कार्लोस च्या नात्याला विराम -Ray of hope Album प्रकाशित
1997 ला कार्लोस व तिचे नाते संपुष्टात आले . यावेळी तिची मुलगी लूर्डस एक वर्षाची होती.याच वर्षी तिने आदी शंकराचार्य यांच्या योगतारावली ग्रंथातील पहिल्या संस्कृत श्लोकावर आधारित ‘Shanti/Ashtangi’ (शांती अष्टांगी) हे गाणे रेकॉर्ड केले. हा अल्बम पुढील वर्षी रिलीज झाला. आपल्या गुरू ला नमन करण्याचा भाव आदी शंकराचार्यांच्या या श्लोकातील शब्दांतून व्यक्त होतो.
[टीप : योग गुरू पातांजली यांना नमन करण्याच्या भावाने हा श्लोक पातांजली योग ग्रंथात सुरूवातीला जोडला आहे यावरून हा श्लोक पातांजली ऋषींनी लिहिला आहे असा लोकांचा समज होतो ..पण तो मूलतः आदी शंकराचार्य यांनी त्यांच्या ‘योगतारावली’ ग्रंथात लिहिलेला आहे.]

Madona ने गायलेला आदी शंकराचार्यांचा हा संस्कृत श्लोक खालील प्रमाणे आहे…
वन्दे गुरूणां चरणारविन्दे संदर्शितस्वात्मसुखावबोधे।निःश्रेयसे जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै॥
आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणम्।सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम्॥
मॅडोनाचे अमेरिकन उच्चार व संस्कृत श्लोक
Madona ला संस्कृत चे उच्चार योग्य पद्धतिने उच्चारता आले नाहीत हा American Accent Issue आपल्या सारख्या भारतीयांच्या पटकन लक्षात येतो व ते खटकते. अमेरिकेत या गण्याचे ध्वनी मुद्रण करतानाही काही जाणकारांनी तिच्या संस्कृत उच्चाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Madona मात्र याने निराश झाली नाही . वाराणसीचे प्रसिद्ध संस्कृत व्याकरणतज्ज्ञ डॉ. भगीरथ प्रसाद त्रिपाठी (वागीश शास्त्री) यांच्याकडून बीबीसी (BBC) च्या माध्यमातून तिने थेट फोनवरून संपर्क साधला व त्यांच्याकडून संस्कृतचे शुद्ध उच्चार शिकून घेतले.
Madona ची भावना खरी होती. योग गुरू पातांजली यांना तिने मनोमन गुरू मानले होते व आपल्या गाण्यातून तिला त्यांना नमन करायचे होते. तिचे संस्कृत उच्चार सदोष असूनही अमेरिकन प्रेक्षकांनी तिचे Shanti -Ashtangi हे गाणे त्यावेळी डोक्यावर घेतले होते.
Indo American look मधे Mtv सोहळ्यात Shanti-ashtangi चे गायन

1998 मधे Mtv च्या पुरस्कार सोहळ्यात मॅडोना ने हे गाणे Unplugged गायले होते. यावेळचा तिचा Indo American look चर्चेत राहिला.
Madona ने मूळ अमेरिकन पेहराव म्हणून काळा सिल्क चा side slit Gown घातला होता व तिच्या पायात PRADA चे high heels strap sandals होते . असे असले तरी भारतीय शुभचिन्हांनी ती पूर्णपणे सजलेली दिसत होती.
भारतीय शुभचिन्हांचा साज
वैष्णव टिळा (Vaishnava Tilak): मॅडोनाने तिच्या कपाळावर हिंदू परंपरेनुसार ‘U’ आकाराचा ‘वैष्णव टिळा’ लावला होता.
हातावर मेहंदी: तिच्या दोन्ही हातांवर लग्नाच्या विधींसारखी डिझाईन असलेली पारंपरिक मेहंदी (Henna) काढलेली होती.
सोन्याचे दागिने: गळ्यात माला आणि हातभर बांगड्या असे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) तिने परिधान केले होते.
काळे केस: तिने तिचे नेहमीचे सोनेरी (Blonde) केस बदलून मुद्दाम गडद काळ्या रंगाची हेअरस्टाईल केली होती, जी तिच्या भारतीय लुकला साजेशी होती.
प्रयागराज चे महाकुंभ स्नान
२००० साली Madona ने ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक गाय रिची यांच्याशी विवाह केला व पुढील वर्षी म्हणजे २००१ साली ती भारतात प्रयाग राज च्या महाकुंभ मेळयाला सुद्धा येवून गेली. तिची ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती.
मॅडोना चे वैवाहिक जीवन अस्थिर राहिले. गाय रिची बरोबरचा तिचा संसार ही आठ वर्षेच टिकला. Madona चे आयुष्य विरोधाभासी दिसत असले तरी तिच्या आध्यात्मिक ओढीमुळे ती मानसिक दृष्ट्या स्थिर राहिली असावी.
गाय रिची पासून झालेला एक मुलगा व पहिली मुलगी अशी दोन अपत्ये असताना तिने चार आफ्रिकन मुलांना दत्तक घेवून आपली सामाजिक बांधिलकी ही सिद्ध केली आहे… प्रत्येक भावनिक विफलतेनंर’Like a virgin’ म्हणत पुन्हा उभी रहाणारी व सहा मुलांचे आईपण स्वीकारणाररी Madona एकाच वेळी अनिर्बंध आणि तात्विक वाटत असेल . तिचे Shanti Ashtangi गाण्यातील संस्कृत उच्चार अयोग्य ही वाटत असतील पण आपले आयुष्य आपल्या नियमांनी (On her own terms) जगण्याची ताकद pop Queen Madona Indian Spirituality मधूनच निर्माण करू शकली असणार एवढे निश्चित…

Madon आपल्या सहा मुलांसह वरील चित्रात दिसत आहे..
हे ही वाचा: ▶️टीना टर्नर चं अध्यात्म : Nichiren Buddhism ने बदललं आयुष्य▶️Tara – अध्यात्मातील पहिली महिला गुरू- तिचा मंत्र शक्तिशाली मानला जातो

