Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

३ वर्षांनंतर मराठी चित्रपट महामंडळाची निवडणुक जाहीर – पण उमेदवारी अर्ज प्रक्रिया तातडीने का? जेष्ठ दिग्दर्शकाचा आक्षेप

३ वर्षांनंतर मराठी चित्रपट महामंडळाची निवडणुक जाहीर - पण उमेदवारी अर्ज प्रक्रिया तातडीने का? जेष्ठ दिग्दर्शकाचा आक्षेप

मराठी चित्रपट महामंडळ निवडणुक प्रक्रियेवर २०२३ पासून हायकोर्टाने स्थगिती लागू केली होती. ३ वर्षांनंतर आता पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ७ मे ला स्थगिती उठताच अनाकलनीय घाईने अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असा जेष्ठ दिग्दर्शकाचा आरोप आहे

मराठी चित्रपट महामंडळ निवडणुक स्थगिती ची पार्श्वभूमी

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूक प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली होती. ७ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आदेश देईपर्यंत, म्हणजेच सुमारे ३ वर्षे आणि ४ महिने ही स्थगिती लागू होती

स्थगिती ची कारणे व घटना क्रम

अपरिपूर्ण अशी पात्र मतदारांची यादी आणि सभासदत्वाच्या वर्गवारीतील त्रुटी या दोन प्रमुख कारणांमुळे अंतरिम स्थगिती (बंदी) हाय कोर्टाने दिली होती.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेक जुन्या आणि सक्रिय सभासदांची नावे मतदार यादीतून परस्पर वगळण्यात आल्याचा आरोप काही सदस्यांनी महामंडळाच्या कमीटीवर केला होता. हा वाद विकोपाला जाऊन अखेर दोन वेगवेगळ्या गटांनी आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे मराठी चित्रपट महामंडळ निवडणुक जाहीर केल्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी व नंतर न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करून स्थगिती दिली होती.

नृत्यदिग्दर्शक योगेश देशमुख आणि इतर सदस्यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, जानेवारी २०२३ मध्ये न्यायालयाने मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक प्रक्रियेला स्थगित करण्याचे आदेश दिले होते.

जेष्ठ दिग्दर्शक राजू पार्सेकर यांचा जाहीर आरोप- लोकशाहीची हत्या म्हणाले.

३ वर्षांनंतर मराठी चित्रपट महामंडळाची निवडणुक जाहीर - पण उमेदवारी अर्ज प्रक्रिया तातडीने का? जेष्ठ दिग्दर्शकाचा आक्षेप

विजय तेंडूलकर यांचे लेखन सहायक राहिलेले व गोविंद निहलानी या दिग्गज दिग्दर्शकाकडे उमेदवारी केलेल्या राजू पार्सेकर यांनी मराठी मधे अनेक हिंदी-मराठी मालिका व मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. राजू पार्सेकर यांनी सोशल मिडिया वर एक पत्रक प्रसिद्ध करून मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेवर स्पष्ट शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. लोकशाहीची हत्या…? अशा सूचक प्रश्नाने ते या पत्राची सुरुवात करतात.

पार्सेकरांच्या आक्षेपांचे मुद्दे

लोकशाहीची हत्या? राजू पार्सैकर यांच्या पत्रातील गंभीर आक्षेप

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीबाबत ज्येष्ठ दिग्दर्शक राजू पार्सैकर यांनी अनेक तात्विक प्रश्न उपस्थित केले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया लोकशाही तत्वांची पायमल्ली करते असे त्यांचे मत आहे.

निवडणुकीवरील बंदी उठली; पण आनंद अल्पकाळच?

७ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरील बंदी उठवली. राजू पार्सैकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र त्यानंतर एवढ्या घाईने उमेदवार अर्ज प्रक्रिया का उरकण्यात आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे

निवडणूक कार्यक्रमातील ‘आणीबाणी’चे संकेत

१८ मे २०२६ रोजी माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक परिपत्रक हस्ताक्षरित केले. या परिपत्रकानुसार अर्ज भरण्याची तारीख १९ मे ते २२ मे ,म्हणजे केवळ चार दिवस ठेवण्यात आली. पार्सैकर यांच्या मते, ही घाई एखादी ‘आणीबाणी’ जाहीर केल्यासारखी आहे.

३ वर्षांनंतर मराठी चित्रपट महामंडळाची निवडणुक जाहीर - पण उमेदवारी अर्ज प्रक्रिया तातडीने का? जेष्ठ दिग्दर्शकाचा आक्षेप

महामंडळ अखिल भारतीय आहे,मग फक्त कोल्हापूरच का?

पत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा –“आपले महामंडळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर अखंड भारतातील सभासद याचे सदस्य आहेत.”परंतु निवडणूक परिपत्रकानुसार अर्ज घेऊन भरण्याची प्रक्रिया केवळ कोल्हापूर येथेच करायची आहे. सर्व भारतीय सदस्यांपर्यंत ही माहिती चार दिवसांत पोहोचणे व त्यांच्याकडून अर्ज प्रक्रिया एवढ्या कमी वेळात पूर्ण होण्याची अपेक्षा करणे अव्यवहार्य असल्याचे राजु पार्सेकर यांनी नमूद केले आहे. pinga9 शी बोलताना राजु पार्सेकर यांनी महामंडळाच्या निवडणुक प्रक्रिये बाबत वैयक्तिक खंत बोलून दाखवली आहे

चार दिवसांच्या कालमर्यादेमागे कोणते कारस्थान?

पार्सैकर यांनी थेट प्रश्न विचारला आहे –· १८ मे रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी परिपत्रक जाहीर केले, आणि लगेच १९ मे पासून अर्ज मोहीम – ही घाई कुणाच्या फायद्यासाठी आहे? ही ‘आणीबाणी’ कुणाच्या तल्लख बुद्धीचे षडयंत्र आहे?· लोकशाही पद्धतीने सर्व सदस्यांना समान संधी द्यायची की केवळ कोल्हापूरकेंद्री प्रक्रिया करायची? असे थेट प्रश्न त्यांनी पत्रात उपस्थित केले आहेत.

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी १९ में ते २२ में असा केवळ चारच दिवसांचा वेळ का देण्यात आला असा प्रश्न ते उपस्थित करतात.

लोकशाही ला धरून नसलेली निवडणूक प्रक्रिया:

लोकशाहीचा भाग आहे की हत्यार?राजू पार्सैकर यांनी पत्राच्या शेवटी हा निवडणूक कार्यक्रम “लोकशाहीला धरून नसलेला” आणि “चुकीचा” म्हटले आहे. तीन वर्षे प्रलंबित असलेल्या निवडणुका नक्कीच व्हायला हव्यात, पण त्या पारदर्शक, न्याय्य आणि सर्व सदस्यांना सहज उपलब्ध अशा पद्धतीने व्हायला हव्यात असे मत पार्सेकरांनी मांडले आहे. दरम्यान जेष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनीही मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत एका मंत्र्यांकडून दबाव आणला जात आहे असा आरोप एका व‌त्तानुसार केला आहे.

येत्या ७ जूनला मराठी चित्रपट महामंडळाची निवडणुक ३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडत आहे. ही निवडणूक प्रक्रिया लोकशाही तत्वांना अनुसरून असेल अशी अपेक्षा करूया..

हे ही वाचा ▶️Cannes – प्राजक्ता माळी चा मराठमोळा नऊवारी Swag – Red Carpet चा Reel Viral ▶️ Goa Film City project प्रगती पथावर

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment