Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

माझी लाडकी बहीण योजना – मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेखाली राज्यातल्या लाखो बहिणींना दरमहा १५०० रुपये मिळतात. पण आता मे संपला, जून आला, तरीही मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अजून आला नाही आहे त्यामुळे लाभधारक महिला चिंतेत आहेत.

मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का होत आहे -एप्रिलमध्येही झाला होता उशीर

याआधी मार्च-एप्रिलचे ३००० रुपये मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून (१३ मे पासून) येऊ लागले होते. पण प्रशासकीय कारणांमुळे SC प्रवर्गातल्या काही बहिणींना हे पैसे एक आठवडा उशीरा मिळाले होते. आता मेच्या हप्त्याबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे का अशी काळजी लाभार्थी महिलांना लागली आहे.

शासनाचे नियम काय सांगतात?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत निधी वितरणाचे काही ठराविक नियम आहेत:

नियम १. दर महिन्याच्या १ ते १० तारखेच्या आत सरकारने ‘महिला व बालविकास मंडळा’ला पैसे द्यायला हवेत.

नियम २. निधी मिळाल्यानंतर पुढील १५ तारखेपर्यंत तो पैसा महिलांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.

या वरील दोन नियमानुसार, मे महिन्याचा हप्ता जूनच्या १० ते १५ तारखेच्या दरम्यान (म्हणजे दुसऱ्या आठवड्यात) येण्याची शक्यता आहे. सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा सुरू आहे व लवकरच नियमाप्रमाणे बँकांना पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले जातील.

मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे कोणाला मिळणार?

ज्या लाभार्थी महिलांना मागचे ३००० रुपये आले आहेत, फक्त त्यांनाच अधिकृत लाभार्थी मानून मे महिन्याचे १५०० रुपये मिळतील. जर तुम्हाला मागचा हप्ता आला नाही, तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का, किंवा ई-केवायसी झाली आहे का, हे तुम्ही तपासून पहाणे गरजेचे आहे. त्याचबरोबर KYC ची प्रक्रिया तुम्ही योग्य प्रकारे केली होती का याची उजळणी करून पहाणे ही गरजेचे आहे.

ई-केवायसी विंडो पुन्हा उघडणार?

लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक होते. पण या e KYC प्रक्रियेत सुमारे ८० लाख बहिणी तांत्रिक त्रुटी किंवा अपूर्ण माहितीमुळे बाहेर पडल्याची माहिती आहे. अनेक पात्र बहिणींचे फॉर्म ई-केवायसी न झाल्याने अडकले आहेत.त्यामुळे आता महिलांकडून “लाडकी बहीण योजना ekyc” पुन्हा सुरू करण्याची मोठी मागणी होतेय. मुख्यमंत्र्यांनी ‘ e KYC पुन्हा सुरू करू’ असे आश्वासन दिले आहे, पण अद्याप त्यावर अधिकृत शासकीय आदेश आलेला नाही.

मार्च-एप्रिल चे पैसे मिळाले असतील तर मे चे नक्की मिळतीलच…

जर तुम्हाला मार्च व एप्रिल महिन्याचे एकत्रित असे 3000 रुपये प्राप्त झाले आहेत तर तुम्ही पात्र लाभार्थी आहात एवढे निश्चित, काळजी करू नका. नियम आणि प्रक्रिया पाहता, जूनच्या १० ते १५ दरम्यान मे महिन्याचे १५०० रुपये तुमच्या खात्यात येतीलच. फक्त ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या अधिकृत संकेतस्थळावर (ladakibahin.maharashtra.gov.in) माहिती पाहा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ekyc प्रक्रिया शासनाकडून पुन्हा राबवण्यात येण्याची शक्यता आहे पण तशी अधिकृत योजना अजून जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तसे मौखिक संकेत दिले आहेत यावरून आशा ठेवण्यास काही हरकत नाही. तसे झाल्यास आपली ekyc प्रक्रिया यावेळी काळजीपूर्वक करा. शक्यतो कुठल्याही एजंट वा मध्यस्था विना ही प्रक्रिया केल्यास योग्य राहील.

हे ही वाचा:

▶️लाडकी बहीण योजना E-KYC घरच्या घरी करा- नारी शक्ति दूत ॲप वरून

▶️आधार-पान-LINK-STATUS-कसे-चेक-कराल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment