A K 47 चा शोध घायाळ सैनिकाने हॅस्पिटल च्या बेडवर लावला- Mikhail Kalashnikov यांचा परिचय

A senior Russian military general's profile picture while addressing  a conference
Mikhail Kalashnikov, inventor of AK47
 

A K 47 च्या बापाची गोष्ट

Story of Mikhail Kalashnikov, the father  of Popular Assault Rifle AK 47
Author: Avinash Bhanu Asha Ghodke

 

Mikhail यांचे बालपण

साल १९१९ …..रशियन यादवी युद्धाच्या धुमश्चक्रीत गरीब शेतकरी कुटुंबात  मिखाईल कलाश्निकोव चा जन्म झाला ..यादवी मुळे कुटुंबाची फरफट झाली . मिखाईल पोरवयात आला . गरीबीच्या डागण्यां मुळे मिखाईल संवेदनशील होत गेला . तो कविता करू लागला.  कवी बनण्याच स्वप्न बघणार्या या
मुलाला नियतीने  मात्र tank workshop चा रस्ता दाखवला . तिथे काम करत करत युद्ध सामुग्री बनवण्याचे तांत्रिक
कौशल्य त्याने एकलव्यासारखे स्वयं अध्ययनाने आत्मसात केले .. पुढे मिखाईल रशियन आर्मीत चिकटला. 
 

हॉस्पिटल बेडवर A K 47 चे प्रारूप 

मिखाईल १९४१
साली एका युद्धात जखमी होवून इस्पितळात जावून पडला.तिथे काही उपचार घेत असलेले  जवान “युद्धात वापरल्या जात असलेल्या बंदुका पूर्णपणे सिद्ध
नाहीत”  अशी चर्चा करताना त्याने ऐकले. हॉस्पिटल च्या पलंगावर पडल्या पडल्या मिखाईल चे मेक्यानिकल
डोके आता चालू लागले . मिखाईल ने Gas operated carbine gun चे प्रारूप
बनवले. पुढील सहा वर्ष तो या डिझाईन वर काम करत राहिला.
 

1947  A K 47 rifle चा जन्म 

अखेर दुसर्या
महायुद्धाच्या अखेरीस १९४७ ला “AK ( Automat Kalashnikov) 47” ही मिखाईल
कलाश्निकोव ने बनवलेली Gas operated carbine आपल्या पूर्ण सिद्ध रुपात
जन्माला आली
. याच वर्षी म्हणजे १९४७ साली भारत ही  स्वतंत्र झाला होता. 
 

User friendly अणि  हलकी AK 47 rifle

रशियन सैन्यात रशियन शेतकरी सैनिक म्हणून लढत होते . या
शेतकर्यांना सैनिकी प्रशिक्षण नव्हते. या शेतकर्यांना वापरायला अतिशय सोपी
अशी ही Gas Carbine होती. “युजर फ्रेंडली” हे AK47 rifle चे खास वैशिष्ट्य
होते. वाळूत ..पाण्यात ..बर्फात  पडली तरी ती शिलाई मशीन सारखी धडधडत चालते असे AK 47 rifle बद्दल म्हटले जाते. कलाश्निकोव च्या AK47 ने युद्धे  गाजवली . ती जगातली सर्वात POPULAR
CARBINE ठरली. 

पुढील दहा वर्षात  रशिया हळू हळू स्थिरावला… आणि भारत ही . 
 

Bollywood film ‘Mother India’ रशियात लोकप्रिय 

भारतातून गेलेले हिंदी सिनेमे तिकडे लोकप्रिय होऊ लागले . नर्गिस दत्त चा
Mother India तिकडे प्रचंड गाजला. १९१९-१९२१
या  यादवी च्या  कठीण काळात  रशिअन
शेतक
र्यांचे संसार तोलणार्या विशितल्या विवाहिता आता पन्नाशी जवळ आल्या होत्या ..मदर इंडिया तील नर्गिस च्या पात्राचा जीवन आलेख सुद्धा पंचविशी ते पन्नाशीच होता. मदर इंडीया च्या पडद्यावरली जीवन संघर्षाने पन्नाशीतल्या शेतकरी स्त्रियांना यादवीचा तो संघर्षमय इतिहास आठवून दिला असावा . म्हणूनच  नर्गिसने साकारलेल्या  Mother India मधे त्यांना आपली प्रतीमा दिसली.
 
1957 film Mother india's Poster with portrait of a poor peasant woman pulling plough in her farm
Poster of Film Mother India(1957)

Mother India आणि एक विरोधाभास 

 Mother India हा नर्गिस ची प्रमुख भूमिका असलेला Bollywood चित्रपट
पहायला रशियन ग्रामीण स्त्रियांच्या झुंडी ..डोंगर दर्या तुडवत मॉस्को ला
येत. त्या मिखाईल कलाश्निकोव
च्या आई सारख्याच  होत्या. त्यांच्यातल्याच
एकीच्या मुलाने त्यावेळी दशकभरा पूर्वी AK47 बनवली होती आणि त्याला  Hero of the Russian Federation असा सम्मान मिळाला होता ..पण ज्या Mother India मधे त्या स्वतःला पहात होत्या त्याच नर्गिस दत्त च्या मुलानेच पुढे  AK 47 चीच बनावट चीनी आवृत्ती AK 56 देश विरोधकांच्या नादाला लागून घरात आणली ..आणि तो तुरुंगात गेला ..

‘Spiritual Pain’ –  Kalashnikov यांची शेवटची खंत

मिखाईल कलाशनिकोव्ह जेंव्हा टी.व्ही वर आतंकवाद्यांकडून A K  47 rifle वापरल्या गेल्याच्या बातम्या पहात तेंव्हा ते फार व्यथीत होत. २००६ साली त्यांनी त्यांची ही खंत जाहीरपणे व्यक्त ही केली होती. ते म्हणाले होते “ जी गन मी माझ्या मातृभूमीच्या रक्षणा साठी बनवली तीच गन बिन लादेन सारख्या  आतंकवाद्यांच्या हाती लागल्याचे.पाहून मला आत्मिक क्लेश होतो” . २००९ साली आपल्या ९०व्या वाढदीवशी कलाशनिकोव्ह यांनी ही खंत पुनरुच्चारीत केली होती. कलाशनिकोव्ह यांना A K 47 विकून धंदा करायचा नव्हता आणी म्हणूनच त्यांनी एक तत्व म्हणून A K 47 rifle चे प्रारूप पेटंट करून घेतले नव्हते. पण याचा फायदा काळाबाजारी लोकांनी घ्यायचा तो घेतला. आज जगात उपलब्ध असलेल्या A K 47 पैकी अर्ध्या अधिक A K 47 rifle या बनावट आहेत. कलाशनिकोव्ह यांनी मृत्यूशय्येवर असताना आपल्या या ‘आत्मिक क्लेशाला’ शेवटचे उच्चारीत केले होते. मुलगी एलना हीच्या मदतीने त्यांनी आपल्या वैयक्तीक टीपण वही च्या पानावर रशियन ओरथोडॉक्स चर्च च्या प्रमुखांना आपल्या मनाची खंत ; जिला ते Spiritual Pain म्हणत ती लिहून कळविली होती. या पत्रात ते म्हणतात ..“माझा मृत्यू जेवढा प्रलंबित होत आहे तेवढीच खोल ही खंत माझा मेंदू पोखरत जात आहे. मला हा प्रश्न छळत रहातो की परमेश्वराने माणसाला सैतानी आकांक्षा, मत्सर,लालसा,आणी आक्रमकता असे भाव दीलेच का”. कलाशनिकोव्ह यांनी शेवटच्या क्षणी ज्या टीपण वहीत ही खंत लिहीली त्या टीपण वहीच्या प्रत्येक पानावर “A slave of God , the Mikhail Kalashnikov” असे   शब्द अंकित होते. 
 
23 डिसेंबर 2013 रोजी Mikhail Kalashnikov  यांनी अखेरचा श्वास घेतला. कलाशनिकोव्ह यांनी आपल्या  ‘आत्मिय वेदने’ तून शांती चे महत्वच अधोरेखित केले आहे. ही चिरशांती त्यांना ही लाभो. “long live peace! “

FAQ

या रायफल ला AK47 हे नाव‌ का दिले गेले?

-हे नाव देताना A हे अक्षर Automatic शब्दाचे आद्याक्षर व K हे अक्षर रायफल निर्माते श्री Kalashnikov यांच्या या आडनावाचे आद्य अक्षर घेवून AK व पुढे १९४७ सालची निर्मिती म्हणून 47 आकडा जोडून AK47 असे नाव या रायफल ला दिले गेले होते.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

5 thoughts on “A K 47 चा शोध घायाळ सैनिकाने हॅस्पिटल च्या बेडवर लावला- Mikhail Kalashnikov यांचा परिचय”

Leave a Comment