Agneepath 2-हातात Bhagvad geeta घेवून Sanjay Dutt ची Entry का?- चित्रपटात न दिसलेले कांचाचे बालपण ….

Villain Kancha resting on his chair
Collage of kancha and Vijay on s phone call

 

विजय आणी कांचा – Agneepath कविता आणि Bhagvad Geeta -विश्लेषण

Bhagvad geeta हातात घेवून Sanjay Dutt (खलनायक कांचा) मांडवा गावात येतो असे दृश्य Agneepath चित्रपटात दिसते. या महा खलनायकाच्या हातात गीता का? याचं उत्तर मूळ संहितेत होतं. जे कापलं गेलं. नायक विजय च्या प्रतिशोध व अंतिम विजयाला बळ देणारी हरिवंशराय बच्चन यांची कविता आणि Bhagvad Geeta या दोन्ही मधील तात्विक साम्य स्पष्ट आहे. मग कांचा हा महाखलनायक गीता वचन बोलतो पण आचरणात का आनत नाही..याला कारण आहे कांचा चे बालपण….जे Agneepath 2 चित्रपटात दिसलेच नाही.

Agneepath चित्रपटातील कांचा चे बालपण

धर्मा चा आधार घेवून अधर्म करणार्या प्रवृत्तींच प्रतिक.. असंच कांचा या पात्राच Agneepath 2 चित्रपटातलं खलनायकी पात्र होतं. मूळ  संहिते मधे कांचा च्या लहानपणीचं एक दृश्य होतं .. गावच्या सावकाराचा मुलगा असलेल्या छोट्या कांचाला अंगावर केस न येण्याच्या आजार( Alopecia Areata) झालेला असतो.या आजारामूळे तो काहिसा विदृप दिसू लागतो. डोक्यावर टक्कल व झडलेल्या भुवया या मुळे विचित्र दिसणार्या कांचा ला गावातली मुलं चिडवू लागतात. एकदा कांचा रडतच घरी येतो.. उद्विग्न व आत्मविश्वास हरवलेल्या लहान कांचाच्या हातात गावचे सावकार असलेले त्याचे वडील Bhagwat Geeta ठेवतात.”भावनाशील न होता कठोर हो” असा सल्ला ते त्याला देतात. “हे गाव सोडून तू मोठ्या शहरात जा .तिथे शिक्षण घे आणि परिपक्व होवून परत ये!” असं ते कांचाला सांगतात…” बडे शहर में रहेगा तो तेरी सोच भी बडी हो जायेगी... ये गीता तुझे जीवनका मार्ग बातायेगी !!” असा उपदेश करून ते कांचा ला मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठवतात.

छोटा कांचा गाव सोडतो ,तो वडीलांनी दिलेली Bhagvad Geeta ही आत्मसात करतो पण तो गीतेचे आपल्यापरीने;आपल्या सोयीचे असे चुकीचे अर्थ लावत मोठा होतो .अखेर कांचा गीतेला हिंसेचा “उन्निसवा अध्याय ” जोडण्याचं अहंकारी स्वप्न घेवूनच गावात परततो .मोठा झाल्यावर कांचा हातात गीता घेवून मांडवा गावात प्रवेश करतो ..हे Sanjay Dutt याने अभिनीत केलेल्या कांचा च्या Entry चं दृश्य Agneepath 2 चित्रपटात आहे व ती कांचा या महा-खलनायकाची entry जबरदस्त establish झाली आहे.

Sanjay Dutt च्या या entry आधीचा कांचा च्या बालपणाचा संपूर्ण भाग चित्रपटात कापला गेला आहे. कांचा असा का झाला? त्याच्या वैचारीकतेला अशी विकृतता का आली हे स्पष्ट करणारा वरील भाग चित्रपटात मात्र दिसत नाही.

तुम क्या लेकर आये थे – गीता वचन

Sanjay Dutt Agneepath 2 मधे प्रथम दिसतो तेंव्हा त्याच्या हातात Bhagvad Geeta का दिसते? ..”तू क्या लेकर आया था …क्या लेकर जायेगा ” हे Bhagvad Geeta मधील चरण कांचा वारंवार का उद्धृत करतो? याचं स्पष्टीकरण देणारा कथा भाग त्याच्या बालपणात घडला होता.   Alopecia आजाराने अंगावरचे केस जावून विद्रूप झालेल्या छोट्या कांचाची मांडवा गावाने केलेली कुचेष्टा कांचा च्या मनात घर करून राहिली होती. याचाच बदला म्हणून कांचा गावात त्याचे दमणकारी साम्राज्य उभे करतो

 Bhagvad geeta आणि शब्द महात्म्य

  कृष्णाने गीतेमध्ये स्वतः चे रूप विशद करताना “मी अक्षर आहे ” असे म्हटले आहे .. ‘अ-क्षर’ ..अर्थात ज्याचा विनाश होत नाही ते अविनाशी तत्व. व्यक्ती चे विवेकी विचार हे ईश्वरी सत्याचे हुंकार असतात ..आणि तेच शब्द होवून कागदावर उमटले की ‘अ-क्षर’ होतात. भारतीय अध्यात्मामधे शब्दाचे महात्म्य खूप मोठे आहे. जेव्हा हे विश्व अस्तित्वात नव्हते तेंव्हा या वैश्विक विशाल पोकळीत फक्त ओमकार रूपी शब्द होता असे अध्यात्म(Metaphysics )मानते. दिलेला शब्द पाळणारा व्यक्ती समाजात सज्जन मानला जातो .  जो शब्द पाळत नाही  तो दुर्जन असतो. Sanjay Dutt ने साकारलेला कांचा  हा Agneepath चा महाखलनायक तर दुर्जनांहून ही दुर्जन  होतो. तो शब्दांचे विरूपीकरण करतो . जसे काही परमेश्वराने त्याच्या चेहऱ्याचे विरूपीकरण केल्याचा तो सूड तो उगवत असतो.  सूड उगावण्याच्या भावनेने पछाडलेला कांचा Bhagawad Geeta मधील कृष्णा ने उच्चारलेल्या पुण्य अक्षरांना त्याच्या स्वतःच्या विकृत विचारांचा मुलामा देतो … गीतेच्या विचारांना तो आपले सोईस्कर अर्थ जोडतो. शब्दांचे अर्थ बदलून तो त्यांना त्याच्या चेहऱ्यासारखेच विदृप करतो. Bhagvad Geeta चे अर्थ बदलून तो तिचे वैयक्तिक शस्त्र करू पाहतो.

अग्निपथ ही हरिवंशराय यांची कविता: नायकाचे समर गीत होते

विजय ,या अग्निपथ च्या नायकाला लहानपणी  शाळा शिक्षक असलेल्या त्यच्या बाबांनी ‘अग्निपथ’ ही कविता सांगितलेली असते .  “रुके न तू …थमे न तू ” असं म्हणनारी ही कविता सुद्धा Bhagvad Geeta ग्रंथातील कर्मवादच सांगते. मूळ हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली ही कविता गीतेतील धर्म-समरात सांडलेल्या लाल रक्ताऐवजी ” अश्व श्वेत रक्ताची” अर्थात निढळाच्या घामाची महिमा सांगते. विपरीत परिस्थितीत,अडचणींना मात देत जीवनाच्या अग्निपथावर पुढे  जात रहा असे ती म्हणते. 

Agneepath चित्रपटात लहान असताना नायक विजयला त्याच्या बाबांनी Bhagwad Geeta नाही पण गीतेतला कर्मवाद सांगणारी ‘अग्निपथ‘ ही कविता सांगितलेली दिसते… आणि तीच छोटीशी कविता विजय च्या आयुष्याच्या धर्म-युद्धाची प्रेरणा ठरते.तीच अग्निपथ कविता त्याची Bhagvad Geeta होते ..  प्रत्येक व्यक्तीच आयुष्य हे त्याच स्वतःच अस एक  धर्मयुद्धच  असतं..त्याला त्याची गीता कुठल्या स्वरूपात मिळेल हे सांगता येत नाही….

Sanjay Dutt याने प्रभावीपणे साकारलेला कांचा हा खलनायक अखेर विजय च्या हातून मारला जातो व सत्याचा विजय होतो.

Writer – Avinash Ghodke ( AGNEEPATH -Additional Dialogue writer)

हे ही वाचाAgneepath 2 : फक्त नावात साम्य| करण मल्होत्रा चे वेगळे Vision || King ला अखेर राजाश्रय-शाहरुख खानला प्रथमच अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर -जवान चित्रपटातील भूमिकेसाठी 71व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात होणार सम्मानित

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment