Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Old Monk ban ही बातमी किती खरी आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

देशभरात मद्यप्रेमींमधे OLD MONK ban झाली” हा विषय सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि व्हिडिओंमध्ये “Old Monk ban झाली आहे ” असा दावा केला जात आहे. पण यामागील वस्तुस्थिती काय आहे? FSSAI (Food Safety and Standards Authority of India) ने
​ ‘खरंच Old Monk ची विक्री देशभर बंद केली आहे का? चला, सोप्या भाषेत जाणून घेऊया.

Old Monk वर संपूर्ण बंदी नाही

सर्वात प्रथम ही गोष्ट समजून घ्या की Old Monk या ब्रँडवर संपूर्ण देशभर अजिबात बंदी घालण्यात आलेली नाही. हे खरे आहे की FSSAI ने ‘विशिष्ट नियमांचे उल्लंघन’ झाल्याचा आरोप करत Old Monk च्या काही विशिष्ट व्हेरियंट्सवर कारवाई केली आहे. त्यामुळे “Old Monk पूर्णपणे बंद झाली” असे म्हणता येत नाही

FSSAI ने कारवाई का केली?

FSSAI च्या Old Monk ban (On three Variants)चे कारण असं आहे की, या मद्य उत्पादनांमध्ये कृत्रिम किंवा ‘Nature Identical’ फ्लेवरिंगचा वापर झालेला असून ही मद्य नैसर्गिकरीत्या मुरवलेले (Aged) असल्याचा दावा करत असल्याचा यांच्यावर आरोप आहे. FSSAI(भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) च्या मते असा खोटा दावा करणे बेकायदेशीर आहे आणि यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते.

फक्त Old Monk नव्हे, इतर ब्रँडही कारवाईच्या कक्षेत

या कारवाईचा फटका फक्त Old Monk ला बसलेला नाही. काही इतर लोकप्रिय व्हिस्की आणि रम ब्रँड्सवरही FSSAI ने कारवाई केली आहे. यावरून ही मोहीम एखाद्या ब्रँडविरुद्ध नसून अन्न व पेय सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते.

ग्राहकांनी काय समजून घ्यावे?

जर तुमच्या परिसरात Old Monk सध्या उपलब्ध नसेल, तर याचा अर्थ Old Monk ban आहे असा करून घेवू नका. Old Monk वर कारवाई झाली आहे पण ती विशिष्ट उत्पादनांवर किंवा विशिष्ट उत्पादन केंद्रांशी संबंधित व्हेरियंट्सवर लागू आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत स्त्रोतांवरील माहिती तपासूनच खात्री करावी.

Old Monk चे कोणते variants Ban ?

सध्या उपलब्ध अधिकृत आणि विश्वासार्ह वृत्तांनुसार FSSAI ने Old Monk च्या तीन व्हेरियंट्सवर कारवाई केली आहे, पण या तीन variants ची नावे त्यांनी सार्वजनिक केलेली नाहीत. FSSAI च्या आदेशात एवढेच नमूद आहे की महाराष्ट्रातील Mohan Rocky Springwater या महाराष्ट्रातील खोपोली स्थित ब्रिवरी मधे उत्पादित Old Monk च्या तीन व्हेरियंट्सना विक्रीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

Mohan Rocky Springwaters Breweries – खोपोली – परवानाधारक ब्रिवरी

Old Monk हा Mohan Meakin चा ब्रँड असून महाराष्ट्रात त्याचे उत्पादन परवानाधारक (Licensed Bottler) Mohan Rocky Springwater Breweries, खोपोली (रायगड) येथे Manufacturing Agreement अंतर्गत केले जाते. यामुळे या परवाना धारक ब्रिवरी वरील आरोपात खुद्द मोहन मेकिन्स ला किती जबाबदार धरले जाईल याबाबत ही साशंकता आहे.

इतर प्रभावित मद्य ब्रँड्स:

FSSAI ची ही कारवाई Old Monk व्यतिरिक्त खालील इतर ही मद्य उत्पादनांवर केली गेली आहे.

  • Antiquity Blue Whisky – मध्य प्रदेशातील United Spirits (Diageo India) च्या उत्पादनावर कारवाई
  • Royal Challenge Whisky – मध्य प्रदेशातील United Spirits च्या उत्पादनावर कारवाई.
  • Bagpiper Deluxe Whisky – मध्य प्रदेशातील Inbrew Beverages च्या उत्पादनावर कारवाई
  • Old Cask Deluxe XXX Rum – मध्य प्रदेशातील Inbrew Beverages च्या उत्पादनावर कारवाई.

वरील माहिती दृष्टिक्षेपात

ब्रँडकंपनीकारवाईस्थिती
Old MonkMohan Rocky Springwater3 विशिष्ट व्हेरियंट्सवर FSSAI ची कारवाईप्रभावित व्हेरियंट्सची अधिकृत नावे अद्याप जाहीर नाहीत.
Antiquity Blue WhiskyUnited Spirits (Diageo India)विशिष्ट उत्पादनांवर कारवाईसंपूर्ण ब्रँडवर बंदी नाही.
Royal Challenge WhiskyUnited Spirits (Diageo India)विशिष्ट उत्पादनांवर कारवाईसंपूर्ण ब्रँडवर बंदी नाही.
Bagpiper Deluxe WhiskyInbrew Beveragesविशिष्ट उत्पादनांवर कारवाईसंपूर्ण ब्रँडवर बंदी नाही.
Old Cask Deluxe XXX RumInbrew Beveragesविशिष्ट उत्पादनांवर कारवाईसंपूर्ण ब्रँडवर बंदी नाही.

टीप: FSSAI ने Old Monk च्या प्रभावित 3 व्हेरियंट्सची अधिकृत नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरील यादींवर विश्वास ठेवू नये.

Old Monk मर्यादित बंदी

Old Monk Rum ही भारतातील एक Cult Rum Brand आहे. Old Monk चा इतिहास पाहता आजपर्यंत या Brand वर कुठलेही दूषण आजपर्यंत लागलेले नाही. उपलब्ध माहितीनुसार Old Monk ban ची कारवाई फक्त एकाच उत्पादन केंद्रांतील (manufacturing units) काही विशिष्ट उत्पादनांपुरती मर्यादित आहे. कंपन्यांनी या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे पुढे परिस्थिती बदलू शकते.

पुढे काय होऊ शकते?

कारवाई झालेल्या संबंधित कंपन्या FSSAI च्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देऊ शकतात किंवा आवश्यक नियमांचे पालन करण्याची हमी देऊन पुन्हा उत्पादन व विक्रीची परवानगी मिळवू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत या बंदी बाबत आणखी स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष

FSSAI bans OLD MONK” ही trend होत असलेली बातमी पूर्णपणे चुकीची नाही पण ती अपूर्ण आहे. प्रत्यक्षात Old Monk या संपूर्ण ब्रँडवर बंदी घालण्यात आलेली नाही, तर नियमांचे कथित उल्लंघन करणाऱ्या काही विशिष्ट व्हेरियंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहिती आणि विश्वसनीय स्त्रोतातून आलेल्या बातमीवरच विश्वास ठेवणे योग्य ठरेल.

(टीप: हा लेख माहितीपर व Fact Check स्वरूपाचा असून मद्यपानाला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देत नाही.)


हे ही वाचा:

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment