Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

शोले original 70 MM नव्हता ?आता Odyssey चा IMAX अनुभव ही खोटाच? – वाचा Cine Technique चा झोल -Sholay To Odyssey IMAX

Cinema ज्या लांबी- रुंदी च्या नेगेटिव (film) वर‌ चित्रित केला जातो त्या नेगेटिव ची साईज मिलिमीटर (Mili Meter) मधे असते. जेवढी नेगेटिव मोठी तेवढे चित्र सूस्पष्ट व भव्य दिसते. 70 MM साईज ची नेगेटिव ही सर्वात मोठी नेगेटिव असते.त्यामुळे या नेगेटिव चे चित्र भव्य असे दिसते. या नेगेटिव ज्या Camera मधे वापरल्या जावू शकतात त्या कॅमेरांना 70 MM Camera म्हटले जाते.

A collection of tangled old-fashioned camera film strips with a retro feel.

70 mm फिल्म – Sholay to Odyssey IMax

70 MM चित्रपट म्हटले की आपल्याला शोले (Sholay) हा भव्य भारतीय चित्रपट आठवतो. पण ‘70 MM‘(Made with 70 MM film technique)असे तांत्रिक बिरूद मिरवणारे सर्वच भारतीय चित्रपट पूर्णपणे 70 mm कॅमेर्यावर चित्रित झाले नव्हते हे वास्तव आहे. आजच्या digital तंत्रा च्या युगात भारतात 70 MM चित्रपट बनवण्याचा कुणी विचारही करणार नाही. Hollywood मधे मात्र आज Christopher Nolan या दिग्दर्शकाने 70 mm तंत्राच्याही पुढे जावून IMAX 70 MM Camera वापरून Odyssey हा संपूर्ण चित्रपट बनवला आहेत..

Film अर्थात नेगेटिव ची मिली मीटर (MM)साईज कशी विकसित झाली

Infographic About the different Sizes of Cinema Negatives (AI picture)

8 mm film

५०-६० च्या दशकात घरगुती वापरासाठी युरोपियन बाजारात Handy Cam आले होते. Handy Cam मधे 8 mm ची छोटी negative वापरली जायची. आता आपण घरगुती किंवा पर्सनल वीडियो जसे मोबाइल कैमरा वर शूट करतो तसे 8 MM Camera वर तेंव्हा शूट केले जायी. हे कॅमेरे भारतात श्रीमंत लोक आयात करत.

16 mm film

Community Screening hall किंवा Cinema hall मधे थोडा मोठा पडदा व्यापू शकेल असे चित्र दिसण्यासाठी 16 mm रुंदी असलेली फिल्म वापरली जायी. पुढे कमी बजेट असल्यास चित्रपटांसाठी 16 mm Film वापरून ते चित्रित केले जात. 90 च्या दशकापर्यांत मराठी चित्रपट प्रामुख्याने 16 mm Film वर चित्रित होत. बहुतेक निर्माते या 16 mm Film वर शूट केलेल्या रिळांना लॅब मधे 35 mm (जवळ जवळ दुप्पट) Blow up/enlarge करून चित्रपट प्रदर्शित करत असत. पण अशा परिस्थिति मधे चित्रामधे बारिक grains (ठिपके दिसत) तसेच frame ची वरची बाजूही (headroom ) एंलार्जमेंट मधे crop होत असे. अनुभवी कॅमेरामन ही समस्या गृहित धरून आधीच हेड स्पेस जास्त ठेवून 16 mm वर द‌श्य चित्रित करत असत. [मी लिहिलेले दोन मराठी चित्रपट देवदासी व थैमान अशाच पद्धतीने 16 mm वर चित्रित होवून पुढे 35 mm blow up केले गेले होते] . 16 mm वर चित्रिकरण करताना Camera वर Cinemascope (Anamorphic) lense लावली गेली होती जेणेकरून पडद्यावरील दृश्य आयताकृती ( 70 mm सारखे आडवे -पण विशाल नाही)असे दिसेल. मराठी व एकूणच रीजनल सीनेमा मधे तेंव्हा ही तांत्रिक कसरत कमी पैशात Cinematic दृश्य दिसण्यासाठी केली जायची.

35 mm Film

35 mm Film ही भारतात प्रामुख्याने व्यावसायिक चित्रपट निर्मितीसाठी वापरली जाणारी फिल्म अथवा Negative Size आहे.

Bollywood म्हणवल्या गेलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीत म्हणा किंवा Hollywood मधे म्हणा.. 35 mm film हा standard professional format मानला जातो.

Cinemascope – 70 MM चा स्वस्त पर्याय

या 35 mm film वर शूट करताना camera lense वर Cinemascope lense (Anamorphic lense)फिट करून शूट केल्यास आयताकृती आडवी दृश्ये चित्रित होत. भव्य दृश्यमानता अपेक्षित असलेल्या चित्रपटांसाठी Cinemascope लेंस लावूनच चित्रिकरण होयी. हा एकप्रकारे 70 MM साठी स्वस्त पर्याय होता.

यात Camera व film 35 mm चीच असायची . फक्त adopter लावून मूळ लेंसवर Anamorphic lense लावली जायची. Camera भाड्याने देणारे hirer’s अशा Adopters लावण्या योग्य Camera ना Cinemascope Camera असे म्हणून त्याला अधिकचे भाडे लावत. खरेतर तो camera तांत्रिक संरचनेनुसार 35 mm चाच असे.

70 mm Film ही मुळात 65 mm Film

70 mm Film चा मुळ आकार 65 mm चा असतो. या 65 mm ला Sound track ची 5 mm ची पट्टी जोडली जाते व‌ ती Film मग 70 mm होते. या फिल्मवर चित्रित केलेली दृश्ये स्पष्टता आणि भव्यता या दोन्ही कसोट्यांवर पुरेपूर उतरतात. 70 mm Camera वर चित्रित झालेला सिनेमा पडद्यावर पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. भारतात ‌एकही व्यावसायिक चित्रपट 70 MM Film/Camera वर चित्रित झालेला नाही. अगदी ‘शोले’ हा सुपरहिट चित्रपट सुद्धा 70 MM असे तांत्रिक बिरूद मिरवत असला तरी तो थेट 70 MM वर चित्रित झाला नव्हता. याची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. Sholay To Odyssey IMAX या सिनेतंत्राच्या विकासातील टप्पे पाहिल्यास प्रेक्षक अपेक्षित दृश्य अनुभूती पासून वंचित राहिले आहेत हे लक्षात येईल.

शोले व इतर भारतीय निर्मात्यांनी 70 MM चा दावा कसा केला?

फक्त भारतातच नाही पण Hollywood मधे सुद्धा 70 MM film/Camera वर थेट चित्रपट शूट करणे टाळले जाते कारण असे केल्यास खर्च चौपट वाढतो. पण हा खर्च टाळून 70 MM चा परिणाम साधण्या साठी एक ” तांत्रिक शक्कल”वापरली जाते तिला Blow Up तंत्र म्हणतात.

फक्त भारतातच नाही पण Hollywood मधे सुद्धा 70 MM film/Camera वर थेट चित्रपट शूट करणे टाळले जाते कारण असे केल्यास खर्च चौपट वाढतो. पण हा खर्च टाळून 70 MM चा परिणाम साधण्या साठी एक ” तांत्रिक शक्कल”वापरली जाते तिला “Blow Up” Cinema Technic म्हणतात.

‘Blow Up’ चे तंत्र

Photographer works with film negatives in a red-lit darkroom for traditional photographic processing.

खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी चित्रपट 35 mm Film/Camera वर चित्रित करून तो 70 mm मधे blow up किंवा enlarge केला जातो.

अगदी Steven Spillberg चे भव्य वाटणारे चित्रपट जसे Conan the Barbarian, Riders of the lost Arc, The Jaws हे चित्रपट 35 mm वर शूट होवून 70 mm blow up करण्यात आले होते. एखादा जुना छोटा फोटो आपण जसा एंलार्ज करतो तसेच काहीसे हे आहे.

१९८० पर्यंत Blow Up तंत्र भारतात उपलब्ध नव्हते. 35 MM to 70 MM Blow Up करायचे असल्यास London येथील Lab मधे film Process करावी लागे. शोले चित्रपट ही अशाच प्रकारे London हून blow Up करून आणला गेला होता. पुणे १९८२ पासून भारतात हे Blow Up तंत्र उपलब्ध झाले.

१९८२ साली प्रदर्शित झालेला ‘पदयोत्तम’ हा मल्याळी चित्रपट पहिला स्वदेशी Blow Up 70 MM चित्रपट आहे

70 mm तंत्राची बजेट व्यतिरिक्त इतर आव्हाने

Shooting Stage वरची आव्हाने

थेट ६५ मिमी कॅमेऱ्याने शूट करणे म्हणजे प्रचंड वाढणारा बजेटचा खर्च, कारण या फिल्मच्या रील अत्यंत महागड्या असतात. त्यातच डिजिटल कॅमेऱ्यांप्रमाणे दिग्दर्शकाला ‘इन्स्टंट रीप्ले’ किंवा मॉनिटरवर लगेच शॉट पाहण्याची सोय नसते; शॉट अचूक आलाय की नाही हे समजायला लॅब रिपोर्ट येईपर्यंत कित्येक दिवस वाट पाहावी लागते. आजच्या डिजिटल क्रांतीनंतर तर ही केमिकल फिल्म प्रोसेस करणाऱ्या मोजक्याच लॅबोरेटरीज जगात शिल्लक आहेत.

Post production ची आव्हाने

प्रॉडक्शननंतरचा एडिटिंगचा टप्पाही तितकाच गुंतागुंतीचा असतो. या अवाढव्य निगेटिव्ह फाईल्स थेट एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये कापता येत नसल्याने, आधी त्यांचे अत्यंत उच्च क्षमतेच्या (8K/11K) स्कॅनरद्वारे डिजिटल रूपांतर करावे लागते, ज्यासाठी अफाट डेटा स्टोरेज आणि वेळेची गरज असते.

प्रदर्शन पातळीवरची आव्हाने

सर्वात मोठी अडचण येते ती चित्रपट प्रदर्शित करताना. आज जगभरातील ९९% थिएटर्स हे डिजिटल (DCP) प्रोजेक्शनवर चालतात. त्यामुळे मूळ ७० मिमी फिल्म रीळ चालवू शकणारे अनालॉग प्रोजेक्टर्स आणि ते हाताळू शकणारे कुशल ऑपरेटर आता जगभरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. एका ७० मिमी चित्रपटाच्या फिल्मचे वजन जवळपास १५० ते २०० किलो भरते, ज्यामुळे त्याची वाहतूक आणि काळजी घेणे हे मल्टिप्लेक्स मालकांसाठी डोकेदुखी ठरू शकते

वरील आर्थिक व तांत्रिक आव्हाने असूनही Hollywood मधे थेट 70 MM Film/Camera वर चित्रपट Shoot झाले आहेत. त्या चित्रपटांची माहिती आपण खलील तक्त्यात वाचू शकता

थेट 70 MM वर shoot झालेले Hollywood चित्रपट

सिनेमाचे नाव (Movie Title)दिग्दर्शक (Director)वर्ष (Year)
Around the World in 80 DaysMichael Anderson1956
Ben-HurWilliam Wyler1959
West Side StoryRobert Wise, Jerome Robbins1961
Lawrence of ArabiaDavid Lean1962
CleopatraJoseph L. Mankiewicz1963
My Fair LadyGeorge Cukor1964
The Sound of MusicRobert Wise1965
2001: A Space OdysseyStanley Kubrick1968
TronSteven Lisberger1982
The MasterPaul Thomas Anderson2012
The Hateful EightQuentin Tarantino2015
DunkirkChristopher Nolan2017
Murder on the Orient ExpressKenneth Branagh2017
TenetChristopher Nolan2020
OppenheimerChristopher Nolan2023

Christopher Nolan यांनी आपल्या Dunkir,Openhimer या 70 MM चित्रपटांतील काही महत्वाची दृश्ये Imax Camera वापरून चित्रीत केली होती. Christopher Nolan यांचा नुकताच प्रदर्शित झालेला Odyssey हा चित्रपट संपूर्ण पणे Imax 70 MM वर चित्रित झालेला जगातील पहिला पूर्ण लांबिचा व्यावसायिक चित्रपट आहे.

भारतातील Odyssey चे Projection खोट्या IMAX वर

सन 2008 पासून Digital IMAX हा projection चा digital पर्याय Imax कंपनी ने उपलब्ध करून दिला आहे. याचा Resolution व Aspect Ratio खर्या IMAX 70 mm एवढा नसतो. जाणकार सिनेप्रेमी व तंत्रज्ञानाला उपरोधिक पणे LIEMAX (खोटा IMAX) म्हणतात.

थोडक्यात

Sholay To Odyssey IMAX हा सिने तंत्राचा प्रवास पाहता. आजपर्यंत निर्मात्यांनी तांत्रिक दृष्ट्या कबूल केलेल्या गोष्टी प्रेक्षकांना सिनेमा पाहताना मिळालेल्या नाहीत असे दिसते. शोले हा चित्रपट 70 MM म्हणून प्रदर्शित केला गेला होता पण तो खरा 70 MM चित्रपट नव्हता तर Blow up केलेला 70 mm होता.

याचप्रमाणे नुकताच प्रदर्शित झालेला Christopher Nolan यांचा Odyssey चित्रपट खर्या IMAX 70 MM film वर चित्रित झाला आहे पण Screening किंवा Projection Theater च्या अनुपलब्धतेमुळे आपण तो ‘खोट्या’ Digita IMAX projection वर पहातोय ज्याला उपरोधिक पणे LIE-MAX म्हटले जाते.


FAQ

७० mm म्हणजे काय?उत्तर:

७० mm ही फिल्मची मोजलेली रुंदी असते. सामान्यतः चित्रपट ३५ mm फिल्मवर शूट होतात. ७० mm फिल्म मात्र अधिक रुंद असते, त्यामुळे त्यावर अधिक डिटेल, रंग आणि प्रकाश चित्रित होतो. हा तांत्रिक दृष्ट्या उच्च-गुणवत्तेचा फॉरमॅट आहे.

LieMAX’ (लायमॅक्स) म्हणजे काय?

‘LieMAX’ हा एक उपरोधिक शब्द आहे, जो डिजिटल IMAX स्क्रीन्ससाठी वापरतात. True IMAX (७०mm) मध्ये १.४३:१ आस्पेक्ट रेशो आणि १२K-१८K रिझोल्यूशन असते, तर LieMAX (डिजिटल) मध्ये १.९०:१ आस्पेक्ट रेशो, २K-४K रिझोल्यूशन आणि लहान स्क्रीन असते. भारतातील सर्व IMAX स्क्रीन्स हे ‘LieMAX’ प्रकारच्या आहेत.

पदयोत्तम’ ७० mm वर शूट झाला होता का?उत्तर:

नाही. मल्याळी चित्रपट ‘पदयोत्तम’ (१९८२) हा सुद्धा ३५ mm वर शूट झाला होता आणि ७० mm वर ब्लो-अप करण्यात आला होता. मात्र, हा ‘भारतातील पहिला स्वदेशी 70 mm Blow Up’ चित्रपट होता (यापूर्वीचे ब्लो-अप साठी लंडन ला जावे लागत होते).

७० mm किंवा IMAX वर शूट/प्रदर्शित झालेले काही चित्रपट कोणते?

•Blow up केलेल्या ७० mm वर प्रदर्शित : ‘शोले’ (१९७५), ‘पदयोत्तम’ (१९८२)·
•IMAX ७० mm वर शूट (फक्त काही भाग-संपूर्ण नाही): ‘द डार्क नाईट’, ‘डनकर्क’, ‘टेनेट’·
•संपूर्ण पणे IMAX ७० mm वर शूट झालेली : ‘द Odyssey’ (२०२६) ही पहिली व्यावसायिक Feature Film आहे)

हे ही वाचा

➡️प्यासा मधला गुरूदत्त यांचा दरवाजातला शॉट -किस्सा Pyasa Cinematogrphy चा

➡️फक्त 20 दिवसात थायलंड मधे उभा केला Dhurandhar चा Lyari Town Set – बॅंकॉक मधे पाकिस्तान उभे करणारा हा कलादिग्दर्शक कोण?

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment