
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘Dr Babasaheb Ambedkar’ (1999) हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक सिनेमा आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का?
या चित्रपटातील डॉ. आंबेडकरांची भूमिका करण्यासाठी सुरुवातीला हॉलिवूड सुपरस्टार Robert De Niro यांचे नाव विचारात घेतले गेले होते!
मामूट्टींनी साकारले होते ‘ Dr Babasaheb Ambedkar’: पण ही भूमिका आधी रॉबर्ट डी नीरो करणार होते!
होय—‘Taxi Driver’, ‘Raging Bull’, ‘Godfather Part II’ असे दर्जेदार सिनेमे करणारे, Method Acting अभिनयाचे बाप म्हटले जाणारे रॉबर्ट डी नीरो. हे साकारणार होते Dr Babasaheb Ambedkar यांची भूमिका. प्रथम पसंती असलेल्या Robert de Niro यांनी पुढे ही भूमिका काही तांत्रिक कारणांमुळे नाकारली व ती दक्षिणेतले सूपरस्टार मामुट्टी यांनी केली.

रॉबर्ट डी नीरो — आंबेडकरांच्या भूमिकेसाठी पहिली पसंती होते!
Dr Babasaheb Ambedkar या चित्रपटाची संकल्पना मजबूत होती, बजेट आंतरराष्ट्रीय स्तराचे होते आणि उद्दिष्ट होते डॉ. आंबेडकर यांचे जागतिक व्यक्तिमत्त्व जगासमोर ठेवणे. चित्रपटाची जागतिक पोहोच वाढविण्यासाठी Dr Babasaheb Ambedkar यांच्या मुख्य भूमिकेसाठी जागतिक दर्जाचा नट असावा असे दिग्दर्शक जब्बार पटेल व निर्मात्यांना वाटत होते. त्या दृष्टीने शोध सुरू झाला. अखेर Hollywood चे सुप्रसिद्ध जेष्ठ नट Robert De Niro यांचे नाव पुढे आले व निश्चित झाले.
निर्मात्यांनी व दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी आता रॉबर्ट डी नीरो यांना संपर्क केला. Dr Babasaheb Ambedkar या थोर व्यक्तीमत्वाची भूमिका साकरण्यास Robert de Niro यांनी ही आपला होकार कळवला.
हॉलिवूड मधे बहूविध भूमिका करणारे रॉबर्ट डी निरो एक जेष्ठ व मुरब्बी नट आहेत. निरो यांच्या सामाजिक जाणीवा तीव्र आहेत व हे त्यांच्या निवडलेल्या चित्रपटांतून ही जाणवते. त्यांचा Taxi driver हा चित्रपट दुर्लक्षित working class बद्दल होता. Raging Bull चित्रपट मानसिक व सामाजिक दबावावर भाष्य होता.Roning आणि Wag the dog हे चित्रपट राजकीय व सामाजिक गुंतागुंत चित्रित करणारे होते.
The Mission (1986) मधे त्यांनी साकारलेल्या भूमिकेमधे सामाजिक संघर्षांचे खोल प्रतिबिंब होते
Robert De Niro यांच्या अनेक चित्रपटांमध्ये सामाजिक संघर्ष, अन्याय, सत्ता-संतुलन, आणि मानवी प्रतिष्ठेच्या लढाईचे ठळक चित्रण दिसते.
विशेषत: The Mission (1986) या चित्रपटात त्यांनी स्पॅनिश गुलाम व्यापाऱ्याची भूमिका केली आहे, जो दक्षिण अमेरिकेतील आदिवासींवर केलेल्या अत्याचारांना जवळून पाहतो व पुढे एका नैतिक परिवर्तनातून जातो.
या चित्रपटात गुलामी, आदिवासी समाजाचा संघर्ष, धार्मिक आणि राजकीय शक्तींचे दडपशाही* यांच्याशी संबंधित प्रश्न आहेत — म्हणजेच social justice हा मध्यवर्ती विषय.
अशा भूमिका त्यांच्यासाठी केवळ अभिनय नव्हत्या;तर त्या De Niro यांच्या आतल्या मानवी संवेदनांना स्पर्श करणाऱ्या कथा होत्या.
सामाजिक न्याय हा Robert de Niro यांचा आवडीचा विषय होता असे म्हणावे लागेल आणि म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर या सामाजिक न्यायासाठी झटलेल्या महामानवाचे चरित्र साकारण्याची संधी त्यांनी स्वीकारली असावी.
“One of the things about acting is it allows you to live other people’s lives without having to pay the price – Robert de Niro”
असे डि निरो यांनी एकदा म्हटले आहे. याच त्यांच्या उक्तीला अनुसरून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष अभिनयातून अनुभवण्याचा विचार केला असावा.
Robert De Niro यांची प्रत्यक्ष जीवनातील सामाजिक व राजकीय भूमिका
De Niro आपल्या वैयक्तिक आयुष्यातही मानवी हक्क, समानता, आणि सामाजिक न्याय यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत आले आहेत.
ते अमेरिकेतील वर्णद्वेष, सत्तेचा गैरवापर, आणि वंचितांवरील अन्यायाविरोधात वारंवार बोलत असतात.
त्यांचे interviews, public speeches आणि त्यांच्या समर्थनातील संस्था या सर्वातून ते human rights, dignity, anti-racism, आणि justice system reforms याबाबत सातत्याने चर्चा करताना दिसतात.
नुकतेच त्यांनी प्रसिद्ध Canes चित्रपट महोत्सवात आपल्या भाषणात निर्भिडपणे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या Tax नीती वर आपला आक्षेप नोंदवला आहे.
हे सर्व पाहता हे अधिकच स्पष्ट होते की Dr Babasaheb Ambedkar यांच्या “social justice” मिशनशी त्यांचे विचार नैसर्गिकरीत्या जुळत होते. याच कारणा मुळे त्यांनी Dr Babasaheb Ambedkar यांची भूमिका करण्यात रस दाखवला असावा हे निश्चित.
नियतीच्या मनात वेगळी स्क्रिप्ट होती…
जर डी नीरो यांनी ही भूमिका केली असती तर हा सिनेमा अधिक आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला असता यात दुमत नाही व त्यांनी आंबेडकरांच्या भूमिकेला न्याय दिला असता , पण असे काय झाले की डि निरो यांनी ही भूमिका पुढे केली नाही.
डी नीरो यांच्यासमोरील प्रमुख अडचण: Indo-British उच्चार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा इंग्रजी उच्चार Indo-British शैलीचा होता. चित्रपटासाठी हा उच्चार अगदी अचूकपणे साधणे आवश्यक होते.
यासाठी डी नीरो यांना विशेष प्रशिक्षण आणि विशिष्ट accent markers वापरण्याची अपेक्षा होती.
पण डी नीरो यांनी खालील मुद्दे सांगत आपला नकार कळवला:
* हा उच्चार नैसर्गिक आणि विश्वसनीय वाटेल असा कायम ठेवणे मला कठीण जाईल
* माझ्या अंगभूत व नैसर्गिक उच्चार पद्धतीशी हा उच्चार जुळत नाही
* संवादाच्या या तांत्रिक मर्यादेमुळे भूमिकेला न्याय देणे शक्य होणार नाही
मग प्रवेश झाला – दक्षिण भारतीय सिनेमाचे ‘मेगा स्टार’ मामूट्टी यांचा!
डी नीरो यांच्या नकारानंतर निर्मात्यांनी भूमिकेसाठी गंभीर, तेजस्वी व चेहर्यावर विद्वत्तापूर्ण झाक असलेले व्यक्तिमत्त्व शोधण्यास सुरुवात केली. आणि त्यांचे लक्ष गेले एका दमदार अभिनेत्याकडे—
मामूट्टी (Mammootty)
मलयाळम चित्रपटसृष्टीचा ‘मेगास्टार’ Mammootty, तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, शेकडो चित्रपटांचे नायक, आणि नैसर्गिक अभिनय व जबरदस्त screen presence साठी ओळखले जाणारे मामुट्टी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वास्तविक प्रतिमा पडद्यावर आणण्यासाठी लागणारे मुख्य गुण —
प्रभावी व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, गंभीरता, आणि भावनांचा नियंत्रित आविष्कार — हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.
त्यांनी केलेली तयारी
* आंबेडकरांच्या चालण्याची ढब
* त्यांचे बोलणे, विराम, उच्चार
* वाचन, लेखनाची देहबोली
* शांत पण प्रखर असलेले नेतृत्व व्यक्त करण्याची पद्धत
मामूट्टी यांनी महिनोन महिने अभ्यास करून आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला आत्मसात केले.
आणि परिणामी, त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार (Best Actor – 1999) मिळाला.
सिने निर्मितीची अद्भुत प्रक्रिया
चित्रपट निर्मितीचे जग हे नेहमीच अनपेक्षित गोष्टींनी भरलेले असते. Dr Babasaheb Ambedkar यांची भूमिका Robert de Niro यांनी नाकारली नसती तर काय झाले असते—हा एक अवास्तव विचार आहे. पण अवास्तवता हीच सिने निर्मितीची प्रेरणा व मर्मस्थळ आहे. सिनेसृष्टीत असे म्हटले जाते की कितीही नियोजनाचे आडाखे बांधले तरी ठराविक नियंत्रणा नंतर सिनेमा निर्मिती प्रक्रियेत स्वतःच आपली अशी एक वाट शोधत पुढे जातो.
हे ही वाचा : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांची भेट








खूप छान माहिती मिळाली 👏🏻👏🏻
Thanks 🙏