Putin India Visit:रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियन भाषेतील भगवद्गीता भेट दिली. ही घटना फक्त औपचारिक नव्हे, तर India Russia relations मध्ये सांस्कृतिक बंध अध्यात्मिक पातळीवर मजबूत करणारा संकेत आहे.
नुकत्याच झालेल्या या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी रशियन राष्ट्रपती पुतीन यांना भगवद्गीतेची रशियन भाषेतील आवृत्ती Bhagvad Geeta as it is (“Бхагавад-гита как она есть”) भेट दिली आहे. या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी रशियात गीतेवर झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्या घटनेचा संदर्भ समजून घेणे महत्वाचे आहे.
रशियात भगवद्गीतेवर बंदीची मागणी जुनी घटना
२०११ मध्ये रशियाच्या टोम्स्क प्रांतात “Bhagavad Gita As It Is” Бхагавад-гита как она есть” या पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली होती. काही लोकांनी दावा केला की गीता हिंसेला प्रोत्साहन देते आणि तिला extremist साहित्य घोषित करावे.
या प्रकरणामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. भारतीय सरकारने औपचारिक पातळीवर चिंता व्यक्त केली. जगभरातील भारतीय समुदायातही निषेध व्यक्त केला गेला.
शेवटी रशियन कोर्टाने सगळे दावे तपासले आणि ते अमान्य केले. कोर्टाने म्हटले की भगवद्गीता हा एक प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ आहे आणि त्यात हिंसेचे समर्थन नाही. त्यामुळे बंदीची गरज नाही.
हा न्यायालयीन निर्णय दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आदर अधिक दृढ करणारा ठरला.
Putin India Visit मधे Modi यांनी Putin यांना गीता भेट का दिली?
ही भेट एक साधी political gesture नसून. ती मोदींच्या Cultural Diplomacy चे उत्कृष्ट व उत्तम उदाहरण आहे.ही कृती
- भारताचा सांस्कृतिक आत्मविश्वास दाखवते.
- Modi-Putin संबंधांमध्ये वैयक्तिक सुसंवाद यात दिसतो.
- India Russia relations आर्थिक आणि सामरिक पातळीवरच नाही तर सांस्कृतिक मुळांनीही जोडलेले आहेत असे सूचक संकेत आंतरराष्ट्रीय समूदायाला दिले जातात.
- भेटीमागे “Soft Power” चा वापर दिसतो.
जगात भू-राजकीय बदल सुरू असताना अशा भेटी महत्वाचा संदेश देतात.
राजकीय अन्वयार्थ – या भेटीचा अर्थ काय?
सध्या रशिया पश्चिम देशांपासून दूर जात आहे. अशावेळी भारत त्याचा जवळचा रणनीतिक भागीदार आहे. ऊर्जा, व्यापार, संरक्षण या क्षेत्रात दोन्ही देशांचे हितसंबंध एकमेकांशी जोडलेले आहेत.
Modi Putin Gita ही भेट अशीच एक सांस्कृतिक गुंफण आहे जी राजकीय नात्याला अधिक स्थिर करते.
या भेटीचा स्पष्ट संदेश:
- संबंध फक्त व्यवहारांवर नाहीत, तर मूल्यांवर आधारित आहेत.
- रशियात कधी वादग्रस्त ठरलेली गीता आज त्यांच्या राष्ट्रपतींना भेट म्हणून दिली जाते.
- यातून दोन्ही देशांमध्ये वाढलेला विश्वास दिसतो.
भारत रशिया मैत्री अधिक मजबूत
Modi gift Bhagavad Gita to Putin ही घटना India Russia relations मध्ये एक सकारात्मक आणि अर्थपूर्ण पाऊल आहे. रशियातील गीतेवरील वाद, कोर्टाचा निर्णय आणि आजची सांस्कृतिक भेट या सर्वातून दोन देशांची मैत्री अधिक मजबूत होत असल्याचे दिसते.
Putin India Visit मधली ही भेट फक्त एक पुस्तक-भेट नव्हे, तर दोन देशांच्या मजबूत सांस्कृतिक नात्याचे प्रतीक आहे.

