Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Monsoon चे ढग ऑस्ट्रेलिया तून भारताकडे निघाले- ITCZ पट्टा उत्तरेकडे सरकला – पुण्यात Pre Monsoon सरींची हजेरी…

ITCZ हा तप्त वातावरणाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यावर Monsoon ऑस्ट्रेलिया सोडतो व भारताकडे सरकू लागतो. ऑस्ट्रेलियातून या पाऊस गमनाला भारतीय हवामान खाते भारतासाठी strong indication of Monsoon मानते.

पावसाच्या आगमनाचा महत्वपूर्ण संकेत

ऑस्ट्रेलियातील पावसाळा संपणे ही बातमी भारतीय हवामान खात्यासाठी एक महत्त्वाचा संकेत आहे.  हवामान खात्याने असा अंदाज व्यक्त केला आहे की यंदा पावसाळा वेळेवर म्हणजे सुमारे १ जून रोजी केरळच्या किनाऱ्यावर दाखल होईल. मात्र, एकूण पावसाचे प्रमाण मात्र ‘सरासरीपेक्षा कमी’ (दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 92% च्या आसपास) राहण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू होणारा उन्हाळा म्हणजे भारतातील Monsoon चे आगमन?

मे २०२६ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाकडून (Bureau of Meteorology) उत्तर भागातील पावसाळी हंगाम संपल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली .

असे होते ITCZ पट्ट्यामुळे मान्सून चे स्थलांतर:

संपूर्ण विषुववृत्ताला वेढणारा ‘आंतर-उष्णकटिबंधीय अभिसरण पट्टा (ITCZ)’ नावाचा पावसाचा एक विशाल, अदृश्य पट्टा आहे. हा पट्टा, जसा सूर्याची स्थिती बदलते, तसे उत्तर गोलार्धाच्या दिशेने सरकतो आणि स्वतःबरोबर ओलसर हवेचे लाटा घेऊन जातो. हाच पट्टा भारताला मान्सून देतो.

तज्ञ काय म्हणतात? वेळेवर येईल, पण पुरेसा पडेल का?

वेळेवर प्रवेश (Onset): 9 में ला पुण्यात व महाराष्ट्रातील इतर भागात Pre Monsoon

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, मान्सून २०२६ केरळच्या किनाऱ्यावर वेळेवर म्हणजे १ जून रोजी दाखल होईल. पुण्यात 9 में ला Pre Monsoon सरी पडल्या. हलका वादळी वारा ही या वेळी अनुभवायला मिळाला. तामिळनाडू, केरळमध्येही अशाच स्वरूपाची पावसाळापूर्व वादळी वारे (pre-monsoon thunderstorms) सुरू झाले आहेत, जी पूर्वापार पाऊस आगमनाचे नैसर्गिक संकेत मानले जातात.

एकूण पर्जन्यमानाचा अंदाज (Rainfall):

यंदा पाऊस आगमन राज्यात वेळेत होत असले तरी, एल-निनोचे सावट यंदाच्या पाऊस हंगामावर आहे. IMD( भारतीय हवामान खाते)च्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या काळात पाऊस ‘सरासरीपेक्षा कमी’ राहण्याची शक्यता आहे. म्हणजे दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९२% एवढाच पाऊस पडू शकतो.

प्रादेशिक परिणाम: कधी, कुठे, आणि कसा पडेल पाऊस?

महाराष्ट्रात पाऊस

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वाटत आहे. तसेच विदर्भात काही भागांत सामान्य पावसाची शक्यता आहे, पण त्याबाबत खात्री कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.


भारतातील अंदाज:

यावर्षी सर्वसाधारण स्थिती आणि एल-निनो यांच्या संयोगामुळे पावसाचे पर्जन्यमान भारतात विविध प्रदेशांमध्ये विसंगत राहण्याची शक्यता आहे. मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भागात (विशेषतः गुजरात-राजस्थान) पावसाची कमतरता जाणवू शकते.

यंदाच्या पावसाळ्याची मार्गिका कशी असू शकते, यावर एक दृष्टीक्षेप

सध्या केरळ-कर्नाटक-तमिळनाडू भागात सक्रियता वाढली आहे. पुढील काही आठवड्यांत अंदमान-निकोबार मार्गे ही Monsoon एक्सप्रेस मुख्य भूभागात दाखल होईल.

यंदाचा पाऊस एल निनो च्या सावटा खाली असणार व तो सरासरी पेक्षा कमी असणार हा भारतीय हवामान खात्याचा अंदाज किती खरा ठरतो हे येणारा Monsoon हंगामच सांगेल..

हे ही वाचा: ▶️पिंडदान चित्रपट आता Zee Marathi YouTube वर पाहता येईल.. ▶️जय बजरंग बली ! म्हणत रामायणातील रामसेतू वरून पोहत गाठला भारत – New Swimming Record

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment