Cannes Prajakta Mali: जागतिक मान्यता असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठी कलाकारांनाही संधी मिळाली आहे. Red Carpet वर मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी चा पारंपारिक मराठी नऊवारी सारी look विशेष गाजत आहे.

प्राजक्ता माळी ने शेअर केला Cannes Red Carpet Reel
Cannes Festival Prajakta Mali look सध्या ट्रेंड होत आहे. Cannes festival (Festival de Cannes)च्या रेड कार्पेटवर प्राजक्ता माळी नऊवारी नेसून आत्मविश्वासाने व दिमाखात चालताना दिसते. आपल्या insta account वर तिने हा reel share केला आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेकांनी comments करून तिचे भरभरून कौतुक केले आहे.
स्वतःच्या ज्वेलरी ब्रांड चा साज
प्राजक्ता माळी ही अभिनया सोबतच एक महिला उद्योजिका ही आहे. प्राजक्तसाज‘ (Prajaktasaj) हा प्राजक्ता चा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे. मराठी संस्कृतीतील पुरातन व पारंपारिक असे दागिने ती या ब्रॅण्ड नेमने बाजारात आणते .प्राजक्ता ने प्राजक्तराज या आपल्याच ब्रांडचे दागिने Cannes च्या Red Carpet walk साठी परिधान केले आहेत . यात तिने पारंपरिक कोल्हापुरी ठसक्याची ठुशी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, दंडावर बाजूबंद, आणि कमरेला तणमणी हार (कमरपट्टा म्हणून) परिधान केलेला दिसतो.
निळ्या रंगाची पैठणी पण पायात कोल्हापुरी नाही
प्राजक्ता माळी ने आकाशी निळ्या रंगा ची रेशमी पैठणी परिधान केलेली या रील मधे दिसते. गडद निळ्या रंगाची backless चोळी यावर उठून दिसत आहे. भरजरी लांब पदराला सावरत ती आत्मविश्वासाने कान्स च्या रेड कार्पेटवर चालताना दिसते. पायात मात्र Flat Kolhapuri chappals न घालता तिने High Heels Sandals घातल्या आहेत. प्राजक्ताने रेड कार्पेटवरून प्रेक्षकांकडे पहात भारतीय पद्धतीने नमस्कार केला आहे व विदेशी पाहुणे तिच्या पेहरावाकडे कुतुहलाने पहात आहेत असे या रीलमधे दिसते.
‘अभिजात मराठी’ या OTT Platform चे जागतिक लॉन्चिंग चे निमित्त
‘अभिजात मराठी’ या नव्या OTT PLATFORM चे संस्थापक केदार जोशी यांच्यातर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पाठिंब्याने मराठी कलाकारांचे हे शिष्टमंडळ Cannes Festival ला यंदा गेले होते.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी, पुष्कर जोग, आणि डिजिटल क्रिएटर अंकिता प्रभू-वालावलकर (कोकण हार्टेड गर्ल). या कलाकारांच्या चमूने रेड कार्पेटवर आपली दमदार उपस्थिती लावली.
दोन वर्षांपूर्वी Cannes film festival मधे छाया कदम या मराठी अभिनेत्री ने आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने Cannes मधे हजेरी लावली होती. छाया कदम यांनी “खूपच सुंदर!” असे म्हणत प्राजक्ता च्या या रील ला दाद दिली आहे. तर काही लोकांनी अंगप्रदर्शन या मुद्द्यावर नाके ही मुरडली आहेत . एकूणच Cannes festival मधे मराठी कलाकारांचा सहभाग वाढल्यामुळे मराठी सिने सृष्टिला जागतिक पातळीवर व्यावसायिक ओळख निर्माण करण्यासाठी मदत होणार की ही फक्त मराठी संस्कृती ची जागतिक व्यासपीठावर छोटीशी झलक आहे हे येणारा काळच सांगेल.
FAQ
भारतीय चित्रपटाला आजपर्यंत Cannes festival चा मुख्य पुरस्कार मिळाले आहे का?
1946 मध्ये चेतन आनंद यांच्या Neecha Nagar या चित्रपटाला Cannes Film Festival चा सर्वोच्च सन्मान “Grand Prix du Festival International du Film” विभागून मिळाला होता. हाच पुरस्कार पुढे 1955 पासून “Palme d’Or” या नावाने ओळखला जाऊ लागला.
१९६७ पासून द्वितीय श्रेणीचा (Critics Award )’Grand Prix’ याच नावाने दिला जातो.
अभिनेत्री छाया कदम यांना Cannes मधे अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता का?
२०२४ च्या पायल कपाड़िया दिग्दर्शित All we imagine as light या चित्रपटाला Grand Prix (Critics Award)मिळाला होता पण अभिनेत्री छाया कदम यांना वैयक्तिक अभिनयाचा Cannes पुरस्कार मिळाला नव्हता. छाया कदम यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.
हे ही वाचा: ▶️The Great ‘Taxi Drive- Robert De Niro Trump यांना सरळ fascist म्हणाले..▶️Prada Kolhapuri controversy – इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल ला Leather Flat Sandal नावाने Prada ने सादर केले▶️Gloria Vanderbilt हिने जगात पहिली Ladies Fitted Jeans बनवली

