Prada ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून Limited edition Prada Kolhapuri chappal बाजारात उतरवल्याची घोषणा केली आहे व या लिमिटेड एडिशन कोल्हापुरी चप्पल चा सर्व नफा Prada महाराष्ट्र व कर्नाटकातील ८ जिल्ह्यातील कारागिरांच्या प्रशिक्षणासाठी वापरणार आहे.

सार्वत्रिक टिके नंतर Prada ने कोल्हापूर ला टीम पाठवली होती
Italian Fashion Brand Prada ने आपल्या Summer collection show मधे कोलहापुरी चप्पल चे प्रदर्शन केले होते पण यासंदर्भात कुठलेही श्रेय कोल्हापुरी चप्पल च्या कारागिरांना वा विशिष्ठ मराठी कलाकुसर संस्कृतीला दिले गेले नव्हते. यामुळे महाराष्ट्रात Prada वर टीका झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने पुढाकार घेत Prada ला याबाबत जाब विचारला होता. Geographical Indications Tag (GI Tag) मिळालेल्या कोल्हापुरी चप्पल चे नाव आम्ही कुठेच वापरले नाही पण आम्ही कोल्हापुरी चपलांच्या डिझाईन ने प्रेरित होऊन आमच्या चपला बनवल्या होत्या असा खुलासा Prada ने केला होता.
Prada ने यानंतर आपली एक टीम कोल्हापूरास पाठवून इथल्या कोल्हापूरी चप्पल उद्योगाची व या पारंपरिक कलेची संपूर्ण माहिती गोळा केली होती. या सर्व घटनाक्रमानंतर Prada आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Prada ने अखेर इंस्टाग्रामर .. “Inspire by Kolhapuri ” असे म्हटले

Prada च्या official इंस्टाग्राम account वर Made in India- Inspired by Kolhapuri असे लिहून प्रादा ने Kolhapuri Chappal विवादावर पडदा टाकला आहे. LIDCOM व LIDKAR च्या भारतीय कारागिरांनी ही नवी limited education kolhapuri Chappal बनवल्याचे Prada ने या पोस्ट मधे सांगितले आहे.
Prada limited edition कोल्हापुरी ची किंमत
Prada ने लॉन्च केलेल्या या लिमिटेड एडिशन कोल्हापूरी चपलेची किंमत 83 ते 85 हजार सांगितली जाते. भारतातील स्थानिक ब्रांड आपल्या कोल्हापूरी चपला अंदाजे 1200 ते 4500 रुपयांना विकतात. किंमती मधील ही तफावत लक्षणिय आहे तरी Prada चे Premium Target Market यास कसा प्रतिसाद देते हे काळच सांगेल.
PRADA चे कारागिरांना मोफत प्रशिक्षण
Prada ची ही नवी Limited edition Kolhapuri chappal म्हणजे ” भारतीय कलेचा वारसा आणि आधुनिक लक्झरी यांच्यातील संवाद” आहे असे Prada ने म्हटले आहे. कोल्हापूर – कर्नाटक सीमेवरील आठ जिल्ह्यांमधील कारागिरांसाठी Prada ने मोफत प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे जो त्यांच्या नव्या limited edition Kolhapuri chappal च्या विक्री नफ्यातून राबवला जाईल. या प्रशिक्षण प्रकल्पामधे NIFT (National Institute Of Fashion Designing) ची मदत Prada घेणार आहे. या संपूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी ३ वर्षांचा असेल.
प्राडा चे उद्दिष्ट
या प्रशिक्षण कार्यक्रमातून-
- बदलत्या बाजारपेठेनुसार कोल्हापुरी चप्पल चे उत्पादन
- स्थानिक कारागिरांचे डिझाईन व तांत्रिक कौशल्य वाढवणे
- पारंपारिक कलेचे महत्व टिकवणे
PRADA ची Official इंस्टाग्राम अकाऊंट वरील Reel आपण खाली पाहू शकता..
FAQ:
Cultural Misappropriation म्हणजे काय? हा व्यावसायिक गुन्हा आहे का?
Cultural Misappropriation (सांस्कृतिक अपहरण किंवा सांस्कृतिक गैरवापर) म्हणजे एखाद्या समाजाची, संस्कृतीची किंवा पारंपरिक कलेची प्रेरणा किंवा डिझाइन योग्य श्रेय, परवानगी किंवा आर्थिक लाभ न देता व्यावसायिक वापरासाठी घेणे. मात्र प्रत्येक Cultural Misappropriation हा कायदेशीर गुन्हा ठरत नाही. एखाद्या डिझाइनवर कॉपीराइट, ट्रेडमार्क किंवा Geographical Indication (GI) सारखे कायदेशीर संरक्षण असल्यासच त्याचे उल्लंघन न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते
Prada ने कोल्हापुरी चप्पल डिझाइन कॉपी केल्याबाबत काय खुलासा दिला?
Prada ने सांगितले की त्यांच्या सॅंडल्सना पारंपरिक भारतीय हस्तनिर्मित पादत्राणांपासून प्रेरणा मिळाली होती. मात्र GI हक्क उल्लंघनाच्या आरोपांना उत्तर देताना Prada ने असा युक्तिवाद केला की त्यांनी उत्पादनाच्या नावात, जाहिरातीत किंवा विक्रीत “Kolhapuri” हा शब्द वापरलेला नाही
G I Tag देण्यामागे काय उद्देश असतो?
GI टॅगचा उद्देश विशिष्ट प्रदेश व संस्कृती मधील स्थानिक कारागिरांचे हक्क जपणे आणि त्यांच्या उत्पादनाची वेगळी ओळख कायम ठेवणे हा आहे.
G I tag देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
भारतात GI (Geographical Indication) Tag देण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या ‘Geographical Indications Registry ‘ या कार्यालयाकडे आहे. हे कार्यालय Controller General of Patents, Designs and Trade Marks यांच्या अखत्यारीत कार्य करते आणि त्याचे मुख्यालय Chennai येथे आहे.
हे ही वाचा : Prada Chai perfume: चहाचा सुगंध बाटली बंद केलाय इटली च्या Prada ने – luxury perfume ची किंमत एकूण म्हणाल ‘चाय ला !’…

