Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Indo-American Trade – गवारीची शेंग भारत-अमेरिका व्यापार संबंधांत फार महत्त्वाची आहे – कसे ? जाणून घ्या Guar Gum बद्दल

Indo-American Trade मधे Trump Tarrif च्या अनुषंगाने सध्या गवारची (Guar) चर्चा होत आहे. जगात गवारीचे उत्पादन करणारा भारत हा प्रमुख देश आहे आणि गवारीचा व अमेरिकेच्या तेल उत्खननाचा महत्वपूर्ण संबंध आहे .गवार (Cluster beans)पासून बनणारी गवार गम ( Guar Gum ) अमेरिकेच्या oil drilling उद्योगाला कशी उपयोगी आहे ते समजून घेऊ..

Indo-American Trade - गवारीची शेंग भारत-अमेरिका व्यापार संबंधांत फार महत्त्वाची आहे - कसे ? जाणून घ्या Guar Gum बद्दल

Indo-American Trade आणि Guar Gum

गेल्या काही महिन्यांत गवार आणि गवारी पासून बनणारी गवार गम (Guar Gum) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकीकडे जागतिक बाजारात गवारच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी विविध देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर नवीन टेरिफ (Import Tariffs) लावण्याची भूमिका घेतल्याने भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या गवार गमवरही त्याचा परिणाम होईल का, याकडे जगभरातील व्यापारी आणि निर्यातदारांचे लक्ष लागले आहे.

गवार गम (Guar Gum)म्हणजे काय?

‘गवार गम’ हा गवारीच्या शेंगांमधील बियांपासून तयार होणारा नैसर्गिक पदार्थ आहे. तो अन्न उद्योग, औषधनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने, कागद उद्योग, वस्त्रोद्योग अशा अनेक क्षेत्रांत वापरला जातो. मात्र त्याचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणातील वापर अमेरिकेतील तेल व नैसर्गिक वायू उत्खनन उद्योगात होतो.

जगातील सुमारे ८० टक्क्यांहून अधिक गवार उत्पादन भारतात होते. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा ही त्याची प्रमुख उत्पादक राज्ये आहेत.Guar Gum च्या आवश्यकते मुळे भारतातील Guar विविध देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते.

अमेरिकन तेल कंपन्या Guar Gum चा वापर तेल उत्खननात कसा करतात?

अमेरिकेत जमिनीच्या हजारो फूट खाली शेल ऑइल (Shale Oil) आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. हे तेल बाहेर काढण्यासाठी हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग (Hydraulic Fracturing किंवा Fracking) ही आधुनिक तांत्रिक प्रक्रिया वापरली जाते.

Hydraulic Fracturing तंत्र असे काम करते

Infographic shows Hydraulic Fracturing / Fracking through Horizontal Well (L-shaped wellbore) for Shell Oil Drilling with the use of Guar Gum .Infographic made with AI.

वरील infographic मधे 90° वळण असलेली Horizontal Well (L-shaped wellbore) अमेरिकन तेल उत्खनन उउद्योगात वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष पद्धतीप्रमाणे.

Hydraulic Fracturing तंत्रात पाण्याच्या झोताचा प्रचंड वेगाने जमीनीखाली मारा करून दगडांना फोडले (Fracture) जाते. या क्रियेत प्रचंड दाबाने सोडलेल्या पाण्यामध्ये वाळू आणि Guar Gum सोबत काही रसायने जमिनीखालील खडकांमध्ये सोडली जातात. त्यामुळे खडकांना बारीक तडे जातात आणि त्या तड्यांमधून तेल किंवा वायू बाहेर येण्याचा मार्ग तयार होतो.

प्रक्रियेतील Guar Gum ची महत्त्वाची भूमिका

या प्रक्रियेत गवार गम पाण्याला घट्टपणा (Viscosity) देतो. त्यामुळे वाळूचे कण खोल जमिनीपर्यंत सहज पोहोचतात आणि खडकांमध्ये पडलेले तडे ही बंद होत नाहीत. परिणामी भूगर्भातील तेल आणि वायू अधिक प्रमाणात बाहेर काढणे शक्य होते. भूगर्भातील कठीण पाषाणांच्या उघडलेल्या भेगांना एक प्रकारे उघड्या किंवा विलग अवस्थेत धरून ठेवण्याचे काम Guar Gum करत.तेल उत्खनन अधिक सुलभ बनवणारा तो एक महत्त्वाचा नैसर्गिक असा घटक आहे.

गवार गम व पर्यायाने गवार च्या किमती का वाढत आहेत?

२०२६ च्या सुरुवातीपासून गवार गमच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

२०२६ च्या सुरुवातीपासून Guar Gum च्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

  • पहिले म्हणजे अमेरिकेत शेल ऑइल उत्खनन पुन्हा वेगाने वाढत आहे. यामुळे तेल कंपन्यांना अधिक गवार गम (Guar Gum) ची गरज भासत असल्याने जागतिक मागणी वाढली आहे.
  • दुसरे म्हणजे भारतात नव्या हंगामातील गवार पिकाचे उत्पादन तुलनेने कमी आहे. म्हणजेच मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे ‘नॅशनल कॉमॉडिटी डेरिवेट्स एक्सचेंज’ – NCDEX वर गवार गमचे भाव प्रति क्विंटल (Guar Gum per Quintal Rate) ११,८०० रुपयांच्या पुढे गेले असून जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत त्याच्या किमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. (14% Price hike)

Trump यांचे Terrif धोरण काय आहे?

Indo-American Trade

डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील उद्योगांना संरक्षण देण्यासाठी (America first policy)आयात होणाऱ्या वस्तूंवर अधिक शुल्क लावण्याची भूमिका घेतली आहे. यालाच “टेरिफ” किंवा आयात शुल्क धोरण म्हणतात.जर एखाद्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर लावला, तर त्या वस्तू अमेरिकेत महाग होतात. त्यामुळे अमेरिकन उद्योग स्थानिक पर्यायांकडे वळण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे भारतासह अनेक देश गवार च्या आयातीबाबत अमेरिकेच्या धोरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

गवार गमवरही टेरिफ लागू होणार का?

अमेरिकेच्या ट्रम्प सरकारकडून गवार गम वरील टेरिफ बाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या गवार गमवर अतिरिक्त आयात शुल्क लागू होईल की त्याला सूट मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र हा मुद्दा भारतासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण अमेरिका हा भारताच्या गवार गमसाठी सर्वात मोठी निर्यात (Cluster beans export)बाजारपेठ आहे. जर अमेरिकेकडून गवार गम वर अतिरिक्त शुल्क लागू झाले तर भारतीय निर्यातदारांच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम होऊ शकतो.सध्याच्या Indo-American Trade Policy मधील Trump Tarrif मुळे भारतीय निर्यातदार नाराज आहेत गवार गमला जर Tarrif मधे अमेरिकेकडून सूट मिळाली, तर भारतीय Guar उत्पादक आणि निर्यातदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

भारतासाठी याचा अर्थ काय?

गवार गमच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना सध्या चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र पुढील काळात अमेरिकेचे व्यापार धोरण, शेल ऑइल उद्योगातील मागणी आणि भारतातील उत्पादन या तीन गोष्टी बाजाराची दिशा ठरवतील.

अमेरिका-इराण युद्धानंतर भारताने अमेरिकेकडून तेल आयातीचे धोरण अवलंबले आहे. या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेबरोबर आता “गवार घ्या व तेल द्या” अशी भूमिका घेताना दिसेल अशी शक्यता आहे.


हे ही वाचा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment