अमेरिकेचे पंतप्रधान Donald Trump यांनी ” Meloni माझ्या बरोबर फोटो काढण्यासाठी याचना करत होत्या!” असे विधान केले. याला उत्तर देण्यासाठी इटली च्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे..

मेलोनी यांचे इंस्टाग्राम वर डोनाल्ड ट्रंप ना उत्तर -Donald Trump and Melony Controversy-
आपल्या Instagram video मधे इटली च्या पंतप्रधान मेलोनी यांनी इटालियन भाषेत..”Io e l’Italia non imploriamo mai.” असे म्हणत डॉनल्ड ट्रंप यांना खणखणीत उत्तर दिले आहे. या वाक्याचा अर्थ ” मी आणि माझा देश इटली कधीही याचना करीत नाही!”Trump and Melony Controversy-हा वाद म्हणजे एका मुलाखतीतील वक्तव्यावरून उफाळलेले राजकीय वादळ आहे
कशामुळे वाद
जून 2026 च्या एका मुलाखतीने हा वाद सुरू झाला. मुळात G7 परिषदे दरम्यान Donald Trump यांनी भर मंचावर Meloni या सुंदर आहेत असे विधान केले होते. याच प्रसंगी मेलोनी यांनी ट्रंप यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विनवणी केली होती, असा दावा आपल्या एका मुलाखतीत ट्रंप यांनी केला. त्यांच्या या विधानाने इटलीत राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. कारण हा प्रश्न केवळ एका फोटोचा नव्हता; तो एका सार्वभौम राष्ट्राच्या प्रतिष्ठेशी जोडला गेला आहे.

video खाली पहा…
मेलोनी यांनी काही तासांतच सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “मी आणि माझा देश इटली कधीही विनवणी करत नाही.” एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. ट्रम्प यांचा दावा “पूर्णपणे खोटा” असल्याचे सांगत त्यांनी त्यामागील सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले.या प्रतिक्रियेमुळे हा वाद वैयक्तिक मतभेदांच्या पलीकडे गेला.
विशेष म्हणजे याच G7 परिषदेच्या मंचावरून डोनाल्ड ट्रंप यांनी “जॉर्जिया मेलोनी या सुंदर महिला आहेत ” असे बेधडक विधान केले होते.
राष्ट्रप्रमुखावर केलेली टिप्पणी देशाचा अपमान
मेलोनी यांनी प्रत्यक्षात स्वतःचे संरक्षण करण्यापेक्षा इटलीच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वक्तव्यातील “I” आणि “Italy” हे दोन शब्द विशेष लक्षवेधी ठरले. संदेश स्पष्ट होता .एका नेत्यावर केलेली टिप्पणी संपूर्ण देशाचा अपमान ठरू शकते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या घटनेमागे केवळ अहंकाराचा संघर्ष नाही. ट्रम्प यांची राजकीय शैली अनेकदा व्यक्तिनिष्ठ आणि आक्रमक राहिली आहे. भारता विषयीचे ट्रंप यांचे धोरण ही असेच आत्मकुंठित आहे. प्रतिस्पर्धी असो वा मित्र, स्वतःला केंद्रस्थानी ठेवणारी “I am the best!” अशी भाषा ट्रंप बोलतात. दुसरीकडे मेलोनी यांनी गेल्या काही वर्षांत स्वतःला युरोपमधील प्रभावी आणि स्वतंत्र विचारांच्या नेत्या म्हणून उभे केले आहे. त्यामुळे सार्वजनिकरीत्या त्यांची प्रतिमा कमी लेखणारे विधान त्या सहजपणे स्वीकारतील, अशी शक्यता नव्हती.
वादाचे राजकीय पडसाद
या वादाचे परिणाम केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिले नाहीत. इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेचा नियोजित दौरा रद्द केल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे हा प्रश्न राजनैतिक पातळीवरही पोहोचला. जरी दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध मजबूत असले तरी सार्वजनिक वक्तव्यांमुळे निर्माण होणारा अविश्वास भविष्यातील संवादावर परिणाम करू शकतो.
Social Media आता आंतरराष्ट्रीय राजनीती चा आखाडा
या घटनेतून आणखी एक महत्त्वाचा बदल दिसून येतो. आधुनिक राजकारणात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही; ते राष्ट्रप्रतिष्ठेच्या द्वंद्वाचा आखाडा बनले आहे. पूर्वी अशा वादांवर अधिकृत निवेदने किंवा राजनैतिक बैठका होत असत. आज मात्र काही सेकंदांचा व्हिडिओ किंवा एक Instagram पोस्ट जागतिक चर्चेचा विषय बनू शकते.
या व्हिडिओमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी काय म्हणत आहेत
वरील insta video मधे Georgia Meloni Italian भाषेत काय म्हणत आहेत..
डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान पूर्णपणे बनावट आहे. खरेतर मी अचंबित झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या मित्र राष्ट्रांशी असे का वागतात, हे मला समजत नाही. ही पहिली वेळही नाही.
मी फक्त एवढेच म्हणू शकते की पश्चिम जगताच्या आणि अमेरिकेच्या शत्रूंविरुद्ध ते अशीच ठाम भूमिका घेत नाहीत, याचे वाईट वाटते.
पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे — मी आणि इटली कधीही कोणाकडे विनवणी करत नाही.”
-जॉर्जिया मेलोनी – राष्ट्राध्यक्ष इटली
अंतराष्ट्रीय राजकारणात आता भावनिक Diplomacy
ट्रम्प आणि मेलोनी यांच्यातील हा वाद भविष्यात किती वाढेल हे सांगणे कठीण आहे. परंतु एका साध्या फोटोच्या दाव्याने आंतरराष्ट्रीय संबंध, राष्ट्रीय स्वाभिमान आणि राजकीय नेतृत्वाच्या शैली यांवर मोठी चर्चा सुरू केली आहे. कदाचित या घटनेचा सर्वात मोठा धडा हाच असेल की आजच्या डिजिटल युगात भावनिक शब्द हे कधी कधी Diplomacy पेक्षा अधिक प्रभावशाली ठरतात.
राष्ट्रप्रमुखांची मानवीय बाजू
एकीकडे Trump यांची Aggressive diplomacy Italian राष्ट्राध्यक्ष Georgia Meloni यांच्यापुढे फेल गेलेली दिसते त्याच वेळी नरेंद्र मोदी यांची Georgia Meloni साठी Soft diplomacy सोशल मिडियावर गाजत आहे.
खरेतर राजकारणात मैत्री आणि मतभेद दोन्ही तात्पुरते असतात; कायम राहते ती राष्ट्रीय हितसंबंधांची गणिते. ट्रम्प यांच्या विधानाने निर्माण झालेला वाद काही दिवसांत शांत होऊ शकतो. मात्र मेलोनी यांनी दिलेले वैयक्तिक उत्तर जगभरातील लोकांना लक्षात राहील “मी आणि माझा देश इटली कधीही याचना करत नाही.” हे केवळ एका नेत्याचे उत्तर नव्हते; तो एका महिलेचा स्वाभिमान ही होता.
हे ही वाचा:
➡️No Kings आंदोलन: ८० लाख अमेरिकन Donald Trump विरोधात रस्त्यावर -जोरदार निदर्शने
➡️’ग्रासिया’ ची अपूर्ण प्रेम कहाणी -Love Story of Gracia -Covid कथा

