Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

मराठी कलाकार एवढे जबरदस्त काम करतात पण त्यांच्या कामाचा गवगवा का नाही? – नवाजुद्दिन सिद्दीकी यांनी व्यक्त केलेली खंत!

Nawazuddin Siddiqui praises Marathi Actors मराठी अभिनेत्यांबद्दल हिंदी चित्रपट अभिनेते नेहमीच आदर व्यक्त करतात. त्यांची मेहनत व कामाप्रती श्रद्धा पाहून हिंदी अभिनेते प्रभावित होतात. असे असूनही हिंदी कलाकारांच्या तुलनेत त्यांच्या कामाचा गवगवा (hype) होत नाही असे मत नवाज सिद्दीकी यांनी मांडले आहे.

ही मुलाखत कोणत्या कार्यक्रमासाठी होती?

Nawazuddin Siddiqui यांची ही खास मुलाखत पत्रकार पूजा तलवार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेल The Pooja Talwar Show साठी घेतली होती. मुलाखत नवाजुद्दीन यांच्या आगामी चित्रपट “कोस्टाओ” (Costao)च्या प्रचाराच्या अनुषंगाने होती. त्यात त्यांनी केवळ चित्रपटाविषयीच नव्हे तर अभिनय, सर्जनशीलता आणि कलाकारांविषयी सखोल विचार मांडले.

नवाजुद्दीन सिद्दीकी काय म्हणाले?

“मराठी ॲक्टर खूप टॅलेन्टेड असतात, पण त्यांना पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळत नाही!”

या एका वाक्यातून नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मराठी कलाकारांच्या गुणवत्तेबद्दल आपली जाणीव प्रकट केली आहे. त्यांच्या मतानुसार, मराठी सिनेक्षेत्रात काम करणारे कलाकार अतिशय मेहनती, अभ्यासू आणि प्रामाणिक अभिनय करणारे असतात. “पण असे असूनही त्यांच्या कामाचे व्यावसायिक पातळीवर म्हणावे तसे चीज का होत नाही हे मला कळत नाही “असेही ते पुढे म्हणाले.

मराठी अभिनेत्री प्रिया बापट COSTAO मधे पत्नी च्या भूमिकेत

‘कोस्टाओ’ चित्रपटात Nawazuddin Siddiqui यांच्यासोबत मराठी अभिनेत्री प्रिया बापट आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रिया यांनीही नवाजुद्दीन यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द काढले: “नवाज सर अत्यंत व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या अभिनयातील प्रामाणिकपणा प्रेरणादायक आहे.” असे त्या म्हणाल्या.

मराठी कलाकारांसाठी ही स्तुती महत्त्वाची का?

मराठी चित्रपट सृष्टीला V Shantaram, मास्टर विनायक, बाबुराव पेंटर अशा दिग्गज दिग्दर्शकांची परंपरा लाभली आहे. या दिग्दर्शकांनी अभिनेते व अभिनय परंपरा ही घडवली आहे.हिंदी कलाकारांना मराठी आभिनेत्यांबद्दल नेहमीच आदर असतो असे आजपर्यंत दिसले आहे.

मराठी कलाकारांच्या नाट्य पार्श्वभूमी मुळे हिंदी कलाकार मराठी कलाकारांना दबकून असतात व ते मराठी अभिनेत्यांचा नेहमी मान ठेवतात . नवाजुद्दीन यांनी स्तुती च्या पुढे जावून “मराठी कलाकारांनी कितीही उत्कृष्ट काम केले तरी म्हणावी तशी दखल घेतली जात नाही“ही खंत व्यक्त करून मराठी चित्रपटसृष्टीच्या व्यावसायिक पैलू कडे निर्देश केला आहे.

मुलाखत क्लिप या लिंकवर पहा

पुजा तलवार यांनी घेतलेली ही मुलाखत clip स्वरूपात @Marathi CineNews1 या चॅनलने repost केली आहे ती खाली लिंकवर जरूर पहा

निष्कर्ष

या मुलाखतीत मराठी कलाकारांच्या साठी एक थेट दाद आहे. नवाजुद्दीन यांचे हे उद्गार मराठी सिनेक्षेत्रासाठी ऊर्जा देणारे आहेत.अशाच प्रकारे परेश रावल या जेष्ठ अभिनेत्यांनी सुद्धा मराठी रंगभूमी व मराठी कलाकाराबद्ल ‘Advance’ असा शब्द वापरून स्तुती केली आहे.

नवाजुद्दीन यांनी या स्तूती नंतर मांडलेला संभ्रम हा मराठी कलाकारांनीही विचारात घेण्यासारखा आहे.‌ मेहनतपूर्वक केलेल्या कामाचं चीज न होणं ही चिंतेची बाब आहे. हा मार्केटिंग चा अभाव मराठी कलाकार व निर्माते येणाऱ्या काळात नक्कीच भरून काढतील अशी आशा आहे..


हे ही वाचा

➡️हृतिक रोशन वळतोय दिग्दर्शनाकडे : क्रिश‌ चं करणार दिग्दर्शन

➡️AI च्या युगात लेखणीतून काळाचा खेळ मांडणारा Hollywood चा लेखक दिग्दर्शक !

➡️अभिनेते राजकुमार यांचा अंत्यविधी गुप्तपणे झाला होता- पण या दिग्दर्शकाला त्यांनी अंत्यदर्शनाची संधी दिली होती- तीही मृत्यू आधी

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment