Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

अभिनेते राजकुमार यांचा अंत्यविधी गुप्तपणे झाला होता- पण या दिग्दर्शकाला त्यांनी अंत्यदर्शनाची संधी दिली होती- तीही मृत्यू आधी

Bollywood actor Rajkumar आपल्या उर्मट स्वभावासाठी प्रसिद्ध होते.ते कुणाचा ही अपमान बेधडक पणे करत.हा स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वास शोभून ही दिसे .हाच उर्मटपणा राजकुमार यांची ओळख ही होवून बसला होता. त्यांच्या आवडत्या दिग्दर्शकाने सांगितलेली त्यांची आठवण त्यांच्या मनस्वितेचा वेगळा पैलू सांगते..

राजकुमार यांचा स्वभाव हीच त्यांची ओळख

Bollywood actor Rajkumar death – राजकुमार हे आपल्याच धुनकीत जगणारे उर्मट स्वभावाचे अभिनेते म्हणून चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध होते. त्यांच्या या स्वभावाची झलक त्यांच्या पात्रांतूनही दिसे. किंबहुना लेखक व दिग्दर्शक राजकुमार यांना डोळ्यासमोर धरून त्यांच्या सारखी अकडबाज व दमदार पात्रे त्यांच्यासाठी लिहीत. या पात्रांचे संवाद ही तितकेच वैशिष्ट्यपूर्ण व दमदार ठेवण्याची विशेष दखल घेतली जायी. राजकुमार यांच्या तोंडी असलेले अनेक संवाद कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत.

जानी! म्हणून वाक्य सुरू करत..

राजकुमार कुणाशीही बोलताना..जानी ! असे संबोधन करून बोलत असत. ही त्यांची लकब ते चित्रपटातील संवादात ही वापरत.प्रेक्षकांमधेही त्यांचा हा “जानी” शब्द लोकप्रिय होता. ते जानी!!..असे म्हणून जेंव्हा एखादा संवाद म्हणत तेंव्हा प्रेक्षागृहात हमखास टाळ्या व शिट्ट्या वाजत. राजकुमार यांचे कुणालाही “जानी” संबोधण्याचे कारण कुणीतरी शोधून काढले होते. या शोधातील माहिती नुसार – राजकुमार यांच्या कुत्र्याचे नाव “जानी”होते व ते प्रत्येकाला आपल्या कुत्र्याच्या नावाने हाक मारत . Bollywood actor Rajkumar यांचा हेकडी स्वभाव पहाता ही माहिती प्रथमदर्शनी विश्वसनीय ही वाटते.

दिग्दर्शकांना महत्व देत नसत

राजकुमार आपल्या दिग्दर्शकांना विशेष महत्व देत नसत. एका मोठ्या दिग्दर्शकाला त्यांनी नाकारले व त्याचे कारण त्यांनी असे सांगितले की..”तो भेटायला आला असता त्याच्या डोक्याला चमेली च्या तेलाचा वास येत होता व तो वास मला अजीबात आवडत नाही”.

एक दिग्दर्शक मात्र त्यांच्या आवडीचा होता. तो म्हणजे मेहूल कुमार. काही सुपर हिट गुजराती चित्रपट देवून मेहूल कुमार हिंदी सिनेसृष्टी स्थिरावले होते. Mass Appeal असलेले चित्रपट ते प्रामुख्याने करत.बरेचसे loud व playing to the gallery अशा पद्धतीचे नायक त्यांच्या सिनेमाचे असत. मेहूल कुमार यांच्या चित्रपटातील नायकांच्या या प्रकारात राजकुमार यांचे काम अधिकच उठावदार होई.

राजकुमार व मेहूल कुमार यांचा पहिला चित्रपट

गुजरात हून मुंबई मधे आल्यावर मेहूल कुमार यांनी अनोखा बंधन (१९८२)व लव मॅरेज (१९८४) असे दोन चित्रपट केले होते. यानंतर त्यांनी थेट राजकुमार यांना आपली कथा दक्षिण मुंबईतील एका गोल्फ क्लब मधे भेटून ऐकवली होती. राजकुमार यांनी स्वीकारलेल्या मेहूल कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव होते ‘ मरते दम तक’ .एक प्रामाणिक पोलीस निरीक्षक ते Underwold kingpin असा नाट्यमय graph असलेले पात्र (इन्स्पेक्टर राणे) राजकुमार यांनी या चित्रपटात निभावले आहे.

Marte dam tak films monochrome working still

वरील चित्रात: राजकुमार ,मेहुल कुमार व गोविंदा ‘मरते दम तक ‘चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान – pic courtesy Google

‘मरते दम तक’ चित्रपटातील अंत्यदर्शन सीनचे शूटिंग

साल १९८६ मधे दिग्दर्शक मेहूल कुमार आपल्या ‘मरते दम तक’ या चित्रपटाचे शूटिंग लोणावळा येथील फरियाज हॉटेल परिसरात करत होते. राज कुमार अभिनित पात्राच्या अंत्ययात्रेचे चित्रिकरण होत होते. चित्रिकरणासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. राजकुमार यांची अंत्ययात्रा एका ट्रक मधून चालली आहे असे दृश्य होते. राजकुमार ट्रक वर चोथर्यावर झोपले होते व त्यांच्यावर फुले पसरली होती. अनपेक्षित पणे राजकुमार यांनी दिग्दर्शक मेहूल कुमारला बोलावले व ” वो फूलोंका हार मुझे पेहना दो”असे सुचवले. मेहूल कुमार विचारात पडल्याचे पाहून राजकुमार पुढे म्हणाले… ” पेहना दो…फिर मौका नहीं मिलेगा!” मेहूल कुमारांना संदर्भ लागला नाही पण राजकुमार म्हणाल्या प्रमाणे त्यांनी मृत असल्याचा अभिनय करत निजलेल्या राजकुमार यांना हार घातला-(Bollywood actor Rajkumar death )

राजकुमार असे का म्हणाले होते?

एक दशकाचा काळ उलटून गेला. दरम्यान राजकुमार यांनी मेहूल कुमार यांच्यासोबत आणखी दोन चित्रपट केले.

१९८९- जंगबाज

१९९२- तिरंगा ….हे ते दोन चित्रपट

साल १९९६ चा जुलै चा महिना होता. मेहूल कुमार आपल्या चित्रपटाच्या कामात व्यस्त असताना राजकुमार यांच्या पत्नीने त्यांना फोन केला व राजकुमार यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी दिली. आपल्या अंत्यविधीस कुणालाही न बोलवता तो खाजगीत करावा ही राजकुमार यांची इच्छा होती..असे जेंव्हा त्यांनी मेहूल कुमार यांना सांगितले तेंव्हा १९८६ साली मरते दम तक चित्रपटाच्या शूटिंग वेळी राजकुमार ” हार पेहना दो..फिर मौका नहीं मिलेगा” असे का म्हणाले होते याचा संदर्भ त्यांना लागला.

मरते दम तक चित्रपटाची 35 वर्षे – जुलै महिन्याचा योगायोग

17 July 1987 रोजी मरते दम तक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या 35 वर्षानिमित्त दिग्दर्शक मेहूल कुमार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत वरील आठवण सांगितली आहे.(Bollywood actor Rajkumar death )

मरते दम तक चित्रपटाचे प्रदर्शन जुलै महिन्यात (17 July 1987) व राजकुमार यांचा मृत्यू ही जुलै महिन्यात(3 जुलै 1996)..हा ही एक योगायोग आहे. राजकुमार यांनी आपली मनमानी करण्याचा स्वभाव ‘मरते दम तक’ सोडला नाही असेच म्हणावे लागेल….

हे ही वाचा:

➡️Me too Dustin Hoffman पासून नाना पाटेकरांपर्यंत -जेष्ठ अभिनेत्यांवर आरोप

➡️प्यासा मधला गुरूदत्त यांचा दरवाजातला शॉट -किस्सा Pyasa Cinematogrphy चा

➡️या अभिनेत्रीने promise केला होता kiss ..पण नंतर काढला पळ- ५० च्या दशकातील शम्मी कपूर यांचा मजेशीर किस्सा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment