Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

गायक संंजू राठोड- हिंदित अपयशी मराठीत मात्र Hit- आईच्या सल्ल्याने मिळाले यश – म्हणाली होती..

Gulabi Saadi fame गायक संजू राठोड यांनी प्रथम हिंदीत गाणी रेकॉर्ड करून YouTube वर अपलोड केली होती पण त्यांच्या या हिंदी गाण्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. गायक संजू राठोड च्या आईच्या सल्ल्यानंतर मात्र त्यांचे नशीब बदलले

बंजारा समाजातील गायक संजू राठोड

जळगाव जिल्ह्यातील धानवड या अतिशय छोट्या गावात, बंजारा कुटुंबात गायक संजू राठोड यांचा जन्म झाला. मुलाखतींमधे आपला हा संघर्ष काळ सांगताना त्यांनी अशी माहिती दीली की त्यांच्या गावात अवघी ५० घरे होती . अशा छोट्याशा गावात ते रहात.‌त्यांचे वडील शेती काम तसेच वेल्डरिंग करत असत.

भजनाचा वारसा

त्यांच्या छोट्याशा गावात संगीत शिक्षक नव्हते. इंटरनेट वगैरे अजिबात नव्हते त्यामुळे यूट्यूब वरून संगीत शिकण्याची ही सोय नव्हती. त्यांच्या कुटंबात मात्र संगीत परंपरा होती.आज सुप्रसिद्ध असलेले गायक संजू राठोड यांचे आजी आजोबा भजन गात असत.आपल्या आजी-आजोबांकडून भजनाचा वारसा त्यांना मिळाला .

गायक संजू राठोड उच्च शिक्षित आहेत

संजू राठोड यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा/शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना लिखाण आणि गायनाची आवड निर्माण झाली . आपण ही Pop गायकी मधे काही करावे असे त्यांना वाटू लागले.

हींदी गाण्यांमधे अपयश – आईने मोलाचा सल्ला दीला

गायक संजू हिंगे यांनी सर्व प्रथम हिंदी गाणी बनवून YouTube वर टाकली पण त्यांच्या या गण्यांना प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही.

या निराशेच्या काळात गायक संजू राठोड यांच्या आईने त्यांना मोलाचा सल्ला दिला ……

“मराठी लिही” “Bappa Wala Gana लिही!”

आईच्या सल्ल्यानंतर मराठी गणेश गीतातून पहिले यश

बाप्पावाला गाना हे गाणे YouTube वर लोकप्रिय झाले. या गाण्याला दरवर्षी 10-15 Million Views YouTube वर मिळत. इथून गायक संजू हिंगे यांच्या यशाच्य प्रवासाची सुरुवात झाली.आईने दिलेल्या सल्ल्यानुसार काम केल्यामुळेच हा यशाचा मार्ग त्यांना दिसला. हाच धागा पकडून त्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली

बाप्पावाला गाना .. Series निर्मिती:

या यशानंतर त्यांनी ‘बाप्पा वाला गाणं’चे अनेक भाग प्रकाशित केले. ‘Bappa Wala Gana 5.0 (Bappacha Swapna)’ आणि ‘Bappa Wala Gana 6’ ही त्यांची लोकप्रिय गाणी आहेत . गणेश उत्सव काळात ही गाणि मोठ्या प्रमाणात ऐकली व पाहिली जातात. बाप्पा वाला गाना series करतच त्यांनी मराठी Pop गाणी ही बनवली ज्यातील ‘गुलाबी साडी ‘ हे गाणे त्यांची ओळख बनले.

गुलाबी साडी गाणे Times square वर झळकले

मुलायम आवाजा साठी प्रसिद्ध असलेले गायक संजू राठोड यांनी गायलेले ‘ गुलाबी साडी ‘ हे मराठी गाणे महाराष्ट्राबाहेर देशात व विदेशातही प्रसिद्ध झाले. अनेक प्रसिद्ध युरोपियन Disco club मधे हे गाणे वाजले तसेच Newyork च्या Times Square वर ही हे गाणे झळकले आहे.

Global Hit होणारी अनेक मराठी गाणी

आईच्या सल्ल्यानुसार मराठी गाणि गावून गायक संजू राठोड यांनी आत्तापर्यंत अनेक हिट गाणी दिली आहेत. वेगवेगळ्या Online streaming platform वर ही गाणी खालील प्रमाणे नवेनवे उच्चांक मांडत आहेत.

  • Spotify स्ट्रीम्स: ‘गुलाबी साडी’ (सुमारे 13.2 कोटी), ‘शेकी’ (सुमारे 12.1 कोटी) आणि ‘बांगडी’ (सुमारे 4.2 कोटी) या सर्वात जास्त ऐकल्या गेलेल्या गाण्यांमध्ये आहेत.·
  • YouTube व्ह्यूज: ‘नऊवारी पाहिजे’ २० कोटी, ‘शेकी’ १०० कोटी आणि ‘सुंदरी’ला पहिल्या महिन्यात ४.४७ कोटी व्ह्यूज मिळाले.· सोशल मीडिया ट्रेंड: ‘गुलाबी साडी’वर ५० लाखांहून अधिक
  • Instagram रील्स बनल्या, तर ‘शेकी’वर ३४ लाखांहून अधिक रील्स बनल्या. ‘बांगडी’ने देखील रील्स आणि इव्हेंट्समध्ये धुमाकूळ घातला आहे.·
  • पुरस्कार: ‘नऊवारी पाहिजे’ला ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ पुरस्कार मिळाला आहे.

छोट्याशा गावात व बंजारा संस्कृती मधे वाढलेल्या गायक संजू राठोड यांचे यश कौतुकास्पद आहे.आपल्या G-SPXRK या संस्थेद्वारे ते नवनवीन गाणी प्रेक्षकांपुढे आणत असतात. गाण्यांचे लेखन व संगीत संयोजन ते स्वतः करतात. आज आपल्या Genuine Gentle आणि Soft आवाजाची प्रेक्षकांना भुरळ घालत ते प्रत्येक वेळी मराठी गाण्यांना Global audience मिळवून देत आहेत यात त्यांच्या आईच्या सल्ल्याचा मोठा वाटा आहे.

हे ही वाचा

निद्रानाशा वर उपाय हे Music| बायनॉरल बिट्स binaural beats music काय आहे ?

Sion हे मुंबई उपनगराचे नाव जेरूसेलेम च्या पुरातन टेकडीवरून दिले आहे – Christ चे ‘शेवटचे भोजन’ तिथे झाले असे मानतात ? – Mumbai History जाणून घ्या

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment