Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Clod Brew Coffee ही Iced Coffee पेक्षा वेगळी असते- या उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा ही Healthy Coffee!



Difference between Cold brew and Ice Coffee: उन्हाळा आला की बऱ्याच जणांची पहिली पसंत असते ती म्हणजे Iced Coffee. पण या उन्हाळ्यात कमी आम्लता असलेली Healthy Cold brew coffee नक्कीच टेस्ट करायला हवी.

Cold Brew Coffee आणि Iced coffee मधे फरक आहे



बऱ्याचदा लोकं Cold brew coffee आणि Iced coffee या एकच समजतात, पण प्रत्यक्षात या दोन्ही पद्धतींमध्ये खूप मोठा फरक आहे. चला तर मग, या फरकाबद्दल आणि कोल्ड ब्रू का ट्राय करावी याबद्दल जाणून घेऊया.


Instant Coffee आणि Filter Coffee मधला फरक: मूलभूत माहिती


मुळात BREW असा शब्द आला म्हणजे ही Instant Coffee नाही हे लक्षात घ्यावे. बाजारात मिळणारी Instant Coffee ची पावडर ही ready to use असते आणि ती पाण्यात विरघळते. BREW साठी जी Coffe powder वापरतात ती भाजलेल्या कॉफी बिया Grind करून बनवली जाते व ती पाण्यात पूर्ण विरघळत नाही. याच कारणामुळे तिला Filter(गाळून )करून घ्यावी लागते.याच प्रक्रियेमुळे तिला Filter Coffee असे म्हटले जाते.

Hot Brew आणि Cold brew बनवण्यासाठी साठी Instant Coffee powder न वापरता ही दळलेली Filter Coffee वापरतात. ही मूलभूत माहिती समजून घेतल्यावर आता आपण मुख्य विषयाकडे वळू.

Cold Brew Coffee आणि Iced Coffee मधील फरक

Cold brew म्हणजे थंड पाण्यात कॉफीची भुकटी( Filter Coffee)भिजत ठेवून तयार केलेला कॉफीचा अर्क (Concentrate) . हा प्रकार आइस्ड कॉफीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. Iced Coffee बनवण्याच्या प्रक्रियेत आपण गरम कॉफी तयार करून त्यात बर्फ टाकतो. पण कोल्ड ब्रू मध्ये कॉफी कधीच गरम होत नाही.


Hot brew आणि Cold brew मधला चवीचा फरक


थंड तापमानात मुरत ठेवल्यामुळेच कोल्ड ब्रूची चव वेगळी ठरते. Cold Brew Coffee चवीला हलकीशी गोडसर लागते. साखर न घालता ही ती फार कडवट लागत नाही.


पाण्याचं तापमान आणि वेळ:

हॉट ब्रू कॉफी (एस्प्रेसो, फिल्टर कॉफी) तयार करताना आपण गरम पाणी (साधारण ९०-९६ अंश सेल्सिअस) वापरतो आणि ती फक्त ३-५ मिनिटांत तयार होते. तर कोल्ड ब्रूसाठी थंड किंवा खोलीच्या तापमानाचं पाणी वापरलं जातं आणि ती तयार व्हायला किमान १२ ते २४ तास लागतात. होय, एवढा वेळ लागतो!

चव आणि आम्लता (Acidity):

गरम पाण्यामुळे कॉफीमधील सगळे घटक लगेच बाहेर येतात, त्यामुळे हॉट ब्रू कॉफीला एक तीव्र सुगंध, तेजस्वी (bright) आणि किंचित तुरट चव मिळते. यात आम्लताही जास्त असते.
  दुसरीकडे, थंड पाण्यात कॉफी हळूहळू भिजत असल्याने, तिच्यातील आम्लता कमी होते. त्यामुळे कोल्ड ब्रूला एक हलकी (smooth), मृदू (mellow) आणि नैसर्गिकरीत्याच गोड अशी चव मिळते. ही चव पोटाला जड न वाटता अगदी हलकी आणि ताजी वाटते.


सर्व्हिंग पद्धत:

हॉट ब्रू सहसा गरमच प्यायली जाते. आइस्ड कॉफी म्हणायची झाली तर ती गरम कॉफी थंड करून बनवली जाते. पण कोल्ड ब्रू हा एक Concentrate असतो. तो तयार झाल्यावर तुम्हाला तो पिताना त्यात थंड पाणी, दंड दूध किंवा बर्फ टाकून पातळ करावा लागतो.

आइस्ड कॉफीपेक्षा Cold Brew Coffee का ट्राय करावी?

पोटासाठी हलकी:

उन्हाळ्यात जास्त आम्लयुक्त पदार्थ पोटाला जड जाऊ शकतात. कोल्ड ब्रूमध्ये आम्लता (acidity) कमी असल्याने, ती पचायला सोपी होते.

चवीतली उपजत गोडवा:

कोल्ड ब्रूमध्ये साखर न घालताही तिला एक नैसर्गिक गोडवा जाणवतो. त्यामुळे कमी साखर खाणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे.

ताजातवाना अनुभव:

उन्हाळ्याच्या उकाड्यात जेव्हा तुम्ही बर्फाच्या क्यूब सोबत एक ग्लास Cold brew coffee प्याल, तेव्हा तुम्हाला मिळणारा थंडगार आणि सुखद अनुभव हा Iced coffee पेक्षा खूप वेगळा आणि रिफ्रेशिंग असेल.


Cold brew coffee घराच्या घरी बनवण्याची पद्धत- Cold Brew Coffee Easy Recipe

Cold Brew Coffee घराच्या घरी तुम्ही ही सहज बनवू शकता. फक्त फिल्टर कॉफीची भुकटी पाण्यात टाकून १२-२४ तास फ्रीजमध्ये ठेवून द्या, नंतर ती गाळून घ्या आणि बर्फ टाकून सर्व्ह करा. हवे असल्यास यात थंड दूध ही टाकू शकता.ही नवीन चव तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा Summer Season अधिक ताजा होवून जाईल!

तुम्ही Cold brew coffee try केलीय का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.

आमच्या Lifestyle या सदरातील इतर लेख ही जरूर वाचा

▶️Kopi Luwak Coffee : जंगली मांजराच्या विष्ठेतून बनणारी महागडी काॅफी – किंमत ऐकून चकित व्हाल ▶️Coffee in India: भारतात कॉफी आली 17 व्या शतकात |एका सूफी संतानी चक्क दाढीत लपवून आणल्या होत्या 7 कॉफीच्या बीया

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment