Kopi Luwak Coffee, जगभरातील कॉफी प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः ती आपल्या अनोख्या प्रक्रियेच्या आणि स्वादामुळे ओळखली जाते. या लेखात Kopi Luwak Coffee बद्दलची सर्व माहिती जाणून घेऊ.

Kopi Luwak Coffee कुठे बनते?
Kopi Luwak Coffee प्रामुख्याने दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये तयार होते, विशेषतः इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाममध्ये ही महागडी कॉफी बनते
इंडोनेशियामधील
- सुमात्रा
- जावा
- बाली
येथे प्रामुख्याने Kopi Luwak expencive Coffee बनवली जाते. तिथल्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये राहणाऱ्या Civet या मांजर सदृश्य प्राण्यामुळे ही विशिष्ट कॉफी बनवणे येथे शक्य होते.
Kopi Luwak Coffee – डच वसाहत इतिहास
इंडोनेशियात डचांनी Coffee ची लागवड केली व स्थानिक शेतकर्यांना पिण्यास मज्जाव केला
18व्या शतकाच्या सुरुवातीस इंडोनेशिया वर डचांचे राज्य होते. सुरूवातीला डचांनीच इंडोनेशिया मधे काॅफी ची व्यापारी लागवड केली. स्थानिक इंडोनेशियन शेतकऱ्यांना या काॅफीचे सेवन करण्यास डचांनी मज्जाव केला होता.
जंगली मांजरे लागवड केलेल्या Coffee मळ्यात घुसत असत
डचांनी जरी शेतकऱ्यांना Coffe पिण्यास प्रतिबंधित केले होते तरी इंडोनेशियातील जंगली मांजरांना मात्र ते रोखू शकले नाहीत.ही मांजरे Coffee मळ्यात शिरून Coffee चेरी खावू लागली. चेरी मधील बिया मात्र या मांजरींच्या पोटात पचत नसत व त्या मलाद्वारे उत्सर्जित होत. शेतकऱ्यांना जेंव्हा आढळले की जंगली civet cats काॅफी चेरी खावून काॅफी च्या बिया मलातून उत्सर्जित करत आहेत त्यावेळी त्यांनी या बिया गोळा करून त्या भाजून त्याची काॅफी पावडर बनवली. या बियांना civet cats च्या पाचक एन्झाईम च्या प्रक्रियेमुळे वीशिष्ट अशी चव येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हीच ती विशिष्ट चव ज्या मुळे civet coffee पुढे प्रसिद्ध होत गेली.
Kopi Luwak Coffee ची अंदाजे किंमत
Kopi Luwak Coffee ही जगातील सर्वात महाग कॉफी आहे. तिची किंमत उत्पादन प्रक्रियेच्या अनोख्या पद्धतीमुळे खूप जास्त आहे. तिची किंमत अंदाजे $100 ते $500 (8,000 ते 40,000 रुपये) प्रति 100 ग्रॅम असू शकते. यातील उच्च गुणवत्तेची कॉफी जगभरात अत्यंत महाग विकली जाते.
Civet मांजर या प्राण्याची माहिती
Civet या प्राण्याला आपण जंगली मांजर म्हणू शकतो. शास्त्रीय दृष्ट्या तो Cat Family प्रकारात मोडत नाही पण याबाबतीत तो मुंगूस प्राण्याच्या बराच जवळचा आहे.Civet म्हणजेच मस्क-प्राण्याची एक जात आहे. इंडोनेशियामध्ये यांना Luwak म्हटले जाते.

निशाचर व सर्व-गृही Civet मांजर (Nocturnal and Omnivorous)
Civet हे बरेचसे मांजरीसारखे दिसणारे प्राणी मुख्यत्वे रात्री सक्रिय असतात. ते जंगलातील फळे, कीटक आणि लहान प्राण्यांवर आपली उपजीविका करतात. ते कॉफीच्या पिकलेल्या फळांचाही स्वाद घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पचन व्यवस्थेतून कॉफीचे दाणे पास होतात आणि त्यातूनच Kopi Luwak च्या उत्पादनाची सुरुवात होते.
Civet मांजर कॉफी बियांवर कशा प्रकारे प्रक्रिया करते?
Civet मांजरीने खाल्लेले कॉफीचे फळ त्यांच्या पचनतंत्रातून जात असताना, फक्त पल्प म्हणजेच फळाचा भाग पचवला जातो. मात्र कॉफीच्या बियांवर काही विशिष्ट जैविक प्रक्रिया होते. हे दाणे त्याच्याद्वारे उत्सर्जित केले जातात. हे दाणे नंतर हाताने गोळा केले जातात, स्वच्छ धुवून सुकवले जातात, आणि त्यानंतर त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. Civet मांजरीच्या पचनाच्या या प्रक्रियेमुळे कॉफीचे दाणे एक अनोखा स्वाद आणि कमी कडवटपणा प्राप्त करतात.
प्रक्रिया झालेल्या बियांपासून कॉफी कशी बनवली जाते?
- 1. Civet मांजरीच्या पचनातून निघालेले बियाणे हाताने गोळा केले जातात.
- 2. त्या बियांना व्यवस्थित धुतले जाते आणि सुकवले जाते.
- 3. सुकल्यानंतर या बियांचे कवच काढले जाते.
- 4. मग या बियांचा कॉफी बनवण्यासाठी रोस्टिंग केला जातो.
- 5. या प्रक्रियेनंतर, बियांना बारीक दळून, त्यापासून स्वादिष्ट Kopi Luwak कॉफी तयार केली जाते.
Kopi Luwak Coffee च्या सेवनाने स्वास्थ्य फायदे काय आहेत?
1. अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत: Kopi Luwak Coffee मध्ये इतर कॉफीप्रमाणेच अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींचे संरक्षण करतात.
2. शरीरातील तणाव कमी करते: या कॉफीमध्ये मऊ आणि सौम्य स्वाद असतो, ज्यामुळे शरीरावर होणारा ताण आणि तणाव कमी होतो.
3. पचनक्रियेच्या सुधारणा: Civet मांजरीच्या पचनतंत्रामुळे कॉफीच्या दाण्यांमध्ये काही बदल होतात, जे पचनक्रियेवर सकारात्मक परिणाम करू शकतात.
4. मानसिक स्पष्टता(focus)वाढवणे: सामान्य कॉफीप्रमाणेच, Kopi Luwak चा वापर मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतो.
निष्कर्ष:
Kopi Luwak Coffee ही केवळ कॉफी नसून, ती एक अनोखी खाद्यसंस्कृती आहे. तिच्या उत्पादनाची पद्धत अर्थात Civet मांजरींच्या पचनतंत्रामुळे आलेला स्वाद, आणि तिच्या वैशिष्ट्यांमुळे ती जगभरातील कॉफी प्रेमींमध्ये प्रिय आहे. नफा आला की नफाखोरी ची मानवीय वृत्ती पहावयास ही मिळते . व्यापारी फायद्याच्या अमीषामुळे Civet प्राण्यांना फक्त काॅफी उत्पादनासाठी बंदी करून त्यांचे exploitation होत असल्याचे ही निदर्शनास आल्याने प्राणीमित्र संघटनांनी यासंदर्भात चिंता ही व्यक्त केली आहे.

