Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Johatsu – जपानमधे दर वर्षी १ लाख लोक स्वेच्छेने अदृश्य होत आहेत. का? आणि कसे? जाणून घ्या

A man with an umbrella walks through rain-soaked streets of Kyoto at night.

Johatsu : Japan interesting facts ‘जोहात्सू’ या जपानी शब्दाचा अर्थ आहे अदृश्य होणे. जपानमध्ये अचानक लोकं कागदोपत्री अदृश्य किंवा गायब होऊ लागले आहेत. हे असे अचानक होते म्हणजे एखादा व्यक्ती मध्यरात्री अचानक त्याचं सरकार दप्तरी व इतर ठिकाणचं अस्तित्वस पुसून टाकतो आणि हे कृत्य स्वनिर्णयाने केले जाते .

जपानमध्ये का गायब होत आहेत माणसं ?

जपानमध्ये माणसं अचानक एखाद्या रात्री गायब होतात . हे गायब होणं म्हणजे काही जादूटोणा नाही किंवा काही अपघात वा क्राईम ही नाही. हे जे जपानी लोकांचे गायब होणे आहे ते स्वेच्छेने होत आहे. जशी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती असते तसेच आपण जगत असलेल्या आयुष्यातून आपल्या अस्तित्वा सकट निवृत्त होणे व नव्या ओळखीने,नव्या गावात नवे जिणे सुरू करणे इथे अपेक्षित असते. असा निर्णय सर्वसामान्य जपानी माणसे घेतायत हे अविश्वसनीय वाटते पण आहे मात्र खरं! असं होतंय आणि अति प्रगत अशा जपानमध्ये . .माणसं गायब होत आहेत आणि स्वेच्छेने.

या अद्भुत प्रकारास जपानी भाषेत जुहात्सू म्हटले जाते. दरवर्षी अंदाजे एक लाख लोक जपान मध्ये अशाप्रकारे Johatsu चा मार्ग अवलंबून गायब होत आहेत.(Johatsu :Japan interesting facts)

अदृश्य होण्याची इच्छा तडीस नेणार्या कंपन्या

अशा प्रकारे जपानी लोकांना गायब करण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक कंपन्या जपानमध्ये निर्माण झाल्या आहेत. या एजंट कंपन्यांना Yoni-ge-ya (Night Movers) म्हटले जाते.

अदृश्य होण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या क्लायंटला या कंपन्या योग्य मार्गदर्शन करून व योग्य अशी फी आकारून या जगातून अदृश्य करून टाकतात .जगातले त्यांचे on record असलेले जुने अस्तित्व पुसून टाकले जाते. या अद्भुत प्रकारास जपानी भाषेत जुहात्सू म्हटले जाते.

दरवर्षी अंदाजे एक लाख लोक जपान मध्ये अशाप्रकारे Johatsu जुहात्सू चा मार्ग अवलंबून गायब होत आहेत.

गायब अर्थात Vanish होण्याची प्रक्रिया

जोहात्सु (Johatsu)ला इंग्रजी पर्यायी शब्द Vanish होणे असा आहे. काय असते प्रक्रिया गायब होण्याची कसे होतात ही जपानी माणसं गायब? खरं तर आपली ओळख म्हणजे आपली जुनी ओळख मिटवून एक नवीन ओळख निर्माण करून पुन्हा एकदा नवे आयुष्य जगण्याची या जपानी माणसांची इच्छा असते .म्हणजे माणसे तीच राहतात पण एक वेगळ्या ओळखीने ते पुढील आयुष्य जगू लागतता .

हे कसे होते ?

यासाठी काही विशिष्ट गोष्टींचा अवलंब जपानी लोक करतात ..जसे की

  • कागदोपत्री एक नवीन कायदेशीर अशी ओळख ते निर्माण करतात आणि त्याप्रमाणे त्यांची सरकारी कागदपत्रांतील नावे, पत्ते ,जन्मतारख बदलल्या जातात .
  • प्लास्टिक सर्जरी करून -काही लोकं आपले पूर्ण रूपच बदलून टाकतात त्याचबरोबर

जपानी लोक असे का करतात

यामागची कारणे मुख्यतः मानसिक असतात

  • काही लोकांना कौटुंबिक अत्याचारा पासून त्रास झालेला असतो काही लोकांच्या डोक्यावर कर्ज असते व या कर्जापासून वाचण्यासाठी एक नवी ओळख निर्माण केली जाते.
  • काही लोकांच्या मनात स्वतःबद्दलची हीन अशी भावना असते त्यातून बाहेर येण्यासाठी ते एक नवी ओळख घेऊन जगणे सुरू करतात.
  • काही लोकांना स्वतःकडून खूप अवास्तव अशा अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण न झाल्याने एक पराभूत मानसिकता त्यांच्यात निर्माण होते आणि ते आपले जुने अस्तित्व पूर्ण पुणे मिटवून नवे जगणे सुरू करतात

Yonige Ya – योनीगेया- अस्तित्व पुसणार्या एजंट कंपन्या

Johatsu ची ही गायब होण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी Yonige ya योनीगेया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जपानी कंपन्या असतात त्या त्यांच्या या क्लायंट्स ना गायब होण्यास मदत करतात .योनिगेया या कंपन्यांचा हा एक व्यवसायच असतो आणि त्यासाठी ते आपल्या क्लाएंट ला व्यवस्थित फी आकारतात. दरवर्षी अंदाजे एक लाख लोक अशा प्रकारे जपान मध्ये आपले अस्तित्व मिटवून गायब होतात आणि नवे आयुष्य जगू लागतात. या अद्भुत विषयावर Johatsu – into thin air हा चित्रपट ही निर्माण झालेला आहे ज्याची माहिती या IMDB‌ ←link वर आपण पाहू शकता .(Johatsu : Japan interesting facts)

आपल्या भारतात किंवा इतर अनेक देशात मुख्यतः गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एखादा मोठा गुन्हा करून त्या गुन्ह्या बद्दलची कायदेशीर कारवाई होण्यापासून वाचण्यासाठी एक नवी ओळख किंवा fake identity निर्माण करून पुन्हा जगू लागतात हे सर्वश्रुत आहे. पण जपानी नागरिकांनी मानसिक दुःखापासून व मानसिक समस्यांपासून सुटकारा करून घेण्यासाठी ही पद्धत वापरली हे विशेष आहे अशी पद्धत वापरून जर एक व्यक्ती पुन्हा एकदा आयुष्यात उभा राहू शकत असेल तर एकादृष्टीने हा मार्ग काही अंशी योग्यच म्हणावा लागेल कारण हे दिलासादायक आहे की माणसे नैराश्यपोटी स्वतःच आयुष्य संपवत नाही आहेत .पण या पद्धतीने जर कुणी केलेल्या गुन्हेगारी कृत्यांच्या शिक्षे पासून वाचण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अनैतिकच म्हणावे लागेल.

हे ही वाचा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

2 thoughts on “Johatsu – जपानमधे दर वर्षी १ लाख लोक स्वेच्छेने अदृश्य होत आहेत. का? आणि कसे? जाणून घ्या”

Leave a Comment