Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

चाळीशीत पंचविशी चा दिसणारा जपानी – रोज फक्त 30 मिनीटे झोपतो – Daisuke Hori ची अजब Lifestyle

Daisuke Hori smiling closeup -Pic Courtesy Google

 डायसुके होरी हा जपानी व्यक्ती आपल्या अजब जीवनपद्धती मुळे चर्चेत आहे. गेल्या 12 वर्षांपासून डायसुके रोज फक्त 30 मिनीटे झोप घेतोय. या झोपेला तो Quality Sleep म्हणतो. आपली झोप त्याने टप्प्याटप्प्याने कमी केली आहे व एक नवी Sleep Technique शोधली आहे असा त्याचा दावा आहे.

गेली बारा वर्षे 40 वयाचा डायसुके 30 मिनीटेच झोपतोय.दिसतो मात्र 25 चा 

झोप ही मानवी जीवनाची एक नैसर्गिक व अत्यावश्यक अशी प्रक्रिया आहे. आपले शरीर आणि मन आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी दिवसातून ६ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे असे आरोग्य शास्त्र सांगते. पण डायसुके होरी या जपानी व्यक्तीने झोपेविषयीचा हा पारंपारिक व आरोग्य शास्त्रीय विचार धुडकावून लावला आहे. तो गेली बारा वर्षे रोज फक्त ३० मिनिटांची झोप (Quality Sleep)घेतोय आणि तरीही तो पूर्णतः तंदुरुस्त आहे, एवढेच नाही तर ही अनोखी Sleep Technique वापरल्यामुळे 40 वर्षांचा Daisuke Hori अवघ्या 25 वयाचा दिसतोय.

डायसुके होरी ने प्रयत्नपूर्वक जीवन शैली बदलली

40 वर्षीय होरी डायसुके म्हणतो की, वयाच्या 28 व्या वर्षापासून त्याने आपल्या झोपेचे तास कमी करण्यासाठी सराव करण्याची सुरुवात केली. गेली बारा वर्षे तो दररोज केवळ ३० मिनिटांची झोप घेतो आणि त्यानुसार काम करतो. होरी याच्या मते, झोप कमी केल्याने त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही, उलट त्याला इतरांपेक्षा दिवसभरात अधिक वेळ मिळतो आणि यामुळे त्याने कामातही अधिक प्रगती केली आहे.

व्यायाम आणि जेवणा आधी Coffee

Daisuke Hori in a body builder pose .Pic Courtesy Google

Daisuke रोज नियमीतपणे एक तास व्यायाम करतो. तसेच जेवणाच्या आधी एक तास काॅफी सेवनाचा सल्ला Daisuke Hori देतो. जेवणा आधी Coffee पील्याने सुस्तपणा व गुंगी (drowsiness ) कमी होते असे तो स्वानुभवातून सांगतो. 

Short Sleep Association स्थापना : Sleep Technique प्रशिक्षण

आपली ही अनोखी Lifestyle इतरांनीही अवलंबावी व त्याच्या सारखे स्वस्थ जीवन जगावे असे त्याला वाटते. Daisuke Hori याने ‘Japan short sleep training Association’ ही संस्था स्थापन करून या संस्थे द्वारा आत्तापर्यंत त्याने 2000 व्यक्तींना त्याचे झोप कमी करण्याचे तंत्र शिकवले आहे. ज्यांना ही Sleep Technique शिकायची आहे ते डायसुके होरी यांच्या Website वर नाव नोंदणी करू शकतात. पारंपारिक झोप तज्ञ याला पूर्णत: सुरक्षित मानत नाहीत पण डायसूके होरी या झोपेला Quality Sleep संबोधतो.

होरी यांचे प्रयोग प्रचलित झोपेच्या विज्ञाना विरोधात ?

सर्वसाधारणपणे, वैज्ञानिक अभ्यासानुसार, 8 तासांची झोप शरीरासाठी महत्त्वाची व आवश्यक मानली गेली आहे. झोपेच्या दरम्यान मेंदू आणि शरीर शिथिल अवस्थेत जातात त्यामुळे मेंदू व शरीरा वरील ताण कमी होतो, तसेच शरीरातील हॉर्मोन्सही संतुलित होतात. पण होरी याच्या दाव्यानुसार, अशा प्रकारची दीर्घकाळ झोप गरजेची नाही. त्याच्या मतानुसार, शरीराला पुन्हा ऊर्जावान होण्यासाठी फक्त काही मिनिटे झोप पुरेशी असते. फक्त 30 मिनीटांची Quality Sleep घेवून ही शरीर उर्जावान होवू शकते हे त्याने वैयक्तिक अनुभवातून सिध्द केले आहे.

होरी डायसुके हे अपवाद आहेत का?

Sleep Science हे विज्ञान सांगते की, झोपेची कमतरता ही मनोसामाजिक ताण, व्याधी, आणि एकाग्रतेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. तरीही, डायसुके होरी याच्या बाबतीत हे नियम लागू होत नाहीत असे दिसते. त्याच्या या अनुभवामुळे वैज्ञानिक मंडळी आणि ‘झोप विषयाचे अभ्यासक ‘ याकडे अपवाद म्हणून पहात आहेत. कमी झोप ही सामान्यतः Sleep Disorder(निद्रा नाश समस्या)मानली जाते व ही एक आरोग्य समस्या आहे असे Sleep Science मानते.

काही लोकांची Sleep Technique चे नवे तंत्र आजमावण्याची मानसिकता

Daisuke Hori याचा ‘झोपेचा प्रयोग‘ आज अनेकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आधुनिक जीवनशैली मधे येणाऱ्या कामाच्या तणावामुळे व आजची Competitive Lifestyle पाहता Daisuke याची Sleep Technique अवलंबून ‘उत्पादकतेचा काळ’ वाढवण्यासाठी अनेक लोक कमी झोप घेण्याचा विचार करू लागले आहेत. पण हे खरोखरच सर्वांसाठी योग्य आहे का? हा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाचे शरीर आणि मानसिकता वेगळी असते, त्यामुळे होरी यांची पद्धत सर्वांसाठी योग्य असेलच असे म्हणता येणार नाही. 

इतिहास काय सांगतो 

काही ऐतिहासिक व्यक्तीमत्वांनी झोपेवर संपूर्ण नियंत्रण मिळवल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. नेपोलियन बोनापार्ट व पेशवा बाजीराव कधी कधी घोड्यावरच ‘संक्षिप्त निद्रा'(Power Nap) घेत असत अशा काही ऐतिहासिक नोंदी आहेत. पण रोजची झोप अशा प्रकारे कमी करण्याचे उदाहरण सर्वसाधारण पणे आढळत नाही. हठयोग या योग साधनेत पारंगत असलेले साधू डोळे उघडे ठेवून झोप घेवू शकतात असे ही योगशास्त्र सांगते .पण सर्वसामान्य आयुष्य जगणार्या समाजातील Japan च्या Daisuke Hori चे उदाहरण “विरळा” आहे असेच म्हणावे लागेल. 

निष्कर्ष

डायसुके होरी यांचा ३० मिनिटांची झोप घेण्याचा दावा आणि त्यावर आधारित जीवनशैली ही एक कुतूहल निर्माण करणारी बाब आहे. काही लोक त्याला एक आश्चर्य मानत असतील, तर काहीजण त्यात धोका पाहतात. वैज्ञानिक दृष्टीने हे अजूनही विवादास्पद आहे. त्यामुळे, झोप कमी करण्याचा प्रयत्न करण्याआधी आपल्या आरोग्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. 

आपल्याला काय योग्य आहे हे शोधणे आणि शास्त्रीय आधार घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, कारण झोपेचा अभाव शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम करू शकतो.

जीवनातील समस्या सोडवण्यासाठी जपानी लोक अपारंपरिक मार्ग अवलंबताना दिसत आहेत. ‘जोहात्सू’ (Johatsu) या नवे जीवन सुरू करण्याच्या मार्गा प्रमाणेच स्वास्थ्यासाठी ‘फक्त 30 मिनीट झोप’ हा ही एक अजब व धक्कादायक मार्ग म्हणावा लागेला.

हे ही वाचा:

गायक संंजू राठोड- हिंदित अपयशी मराठीत मात्र Hit- आईच्या सल्ल्याने मिळाले यश – म्हणाली होती..

Sion हे मुंबई उपनगराचे नाव जेरूसेलेम च्या पुरातन टेकडीवरून दिले आहे – Christ चे ‘शेवटचे भोजन’ तिथे झाले असे मानतात ? – Mumbai History जाणून घ्या

Marathi Box Office – प्रथमच देशाच्या एकूण collection मधे मराठी चित्रपटांचा 4% वाटा – सहा महिन्यांत 250+ कोटींची ‘सैराट घोडदौड’

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment