Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Tesla India च्या किती गाड्या भारताच्या रस्त्यावर? काय आहे Tesla Car price in India जाणून घ्या

Tesla ही जगातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी July 2025 पासून भारतीय बाजारात आपली कार विकत आहे. Tesla Electric Car च्या एकूण किती गाड्या भारतीय रस्त्यांवर सध्या धावत आहेत व Tesla car price in India किती आहे याचा आढावा या लेखात घेतला आहे पण त्या आधी या कारची खासीयत काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे..,

Tesla Model Y pic courtesy Google

टेस्ला कार ची खासियत काय ?

एलॉन मस्क यांनी स्थापलेल्या Tesla Inc. ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी इलेक्ट्रिक गाड्या, बॅटरी स्टोरेज आणि सोलर एनर्जी सोल्यूशन्स तयार करते. त्यांच्या Model S, Model 3, Model X आणि Model Y या कार जगभरात लोकप्रिय आहेत. टेस्ला गाड्यांची खासियत म्हणजे त्यांचा प्रगत ऑटोपायलट फीचर, जबरदस्त वेग आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक (zero emission) तंत्रज्ञान. (Tesla car price in India)

July 2026 पर्यंत Tesla ने किती गाड्या भारतात विकल्या आहेत

टेस्लाने भारतात जुलै २०२५ मध्ये विक्री सुरू केली आणि सप्टेंबर २०२५ पासून वाहनांची वितरणे सुरू केली.

आतापर्यंतच्या एकूण विक्रीच्या आकडेवारीबाबत, वेगवेगळ्या स्त्रोतांकडून वेगवेगळी माहिती मिळते:

· सर्वात अलीकडील एकूण विक्री (एप्रिल २०२६ पर्यंत): सुमारे ३८३ युनिट्स.


· आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) मधील विक्री: ३४२ युनिट्स. (हा आकडा ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन‘ (FADA) ने दिला आहे.)


· कॅलेंडर वर्ष २०२५ मधील विक्री: २२५ युनिट्स.
· ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची नोंदणी: २४३ वाहने.

थोडक्यात, टेस्लाने भारतात आतापर्यंत सुमारे ३८३ वाहने विकली आहेत, जी बहुतांशी ‘मॉडेल Y’ आहेत.

Tesla चे भारतात सध्या कुठे शोरूम आहेत

भारतात Tesla चे पहिले Show Room मुंबई येथे उघडण्यात आले. मुंबई च्या Bandra Kurla Complex (BKC) भागात एक प्रिमियम स्पेस मधे हे शोरूम आहे. तसेच दिल्ली NCR आणि बेंगळुरू या महत्त्वाच्या मेट्रो शहरांमध्यही Tesla चे शोरूम आहेत.

भारतीय ग्राहकांसाठी Tesla ची किंमत?(Tesla car price in India)

भारतात सुरुवातीला Tesla Model 3 लाँच झाली . या मॉडेल ची किंमत अंदाजे ₹50 ते 60 लाखांच्या दरम्यान आहे. ही किंमत भारतीय बाजारासाठी काहीशी जास्त आहे, परंतु लक्झरी आणि इनोव्हेशनच्या प्रेमींसाठी Tesla ची ही किंमत नक्कीच आकर्षक ठरेल.

Quora Site वरील माहितीवर Telsa Car price in India चा खालील Price Chart आधारित आहे.

Infographic about Tesla car price in india

भारत सरकारची टेस्ला निर्मिती प्रकल्पासाठी भूमिका

भारत सरकार इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय आहे. FAME II योजनेद्वारे Electric वाहन प्रकल्पांना सबसिडी दिली जाते, तसेच इलेक्ट्रिक वाहनांचे आयात शुल्क कमी करण्यावर चर्चाही सुरू आहे. टेस्लाने भारतात स्थानिक Tesla Manufacturing Unit सुरू करावे यासाठी केंद्र सरकार व काही राज्य सरकारांनी विशेष सवलती व पायाभूत सुविधा देऊ करण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका यांनी टेस्लाला आकर्षक पॅकेज ऑफर केल्याचे समजते.असे असले तरी Tesla कंपनी ने अजून भारतात manufacturing unit उभे करण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

Tesla म्हणते भारतात E V part उत्पादन प्रगत नाही

सप्लाय चेनची कमतरता: भारतात अद्याप ईव्ही पार्ट उत्पादन आणि स्थानिक सप्लाय चेन पूर्णपणे प्रगत झालेली नाही, ज्यामुळे स्थानिक उत्पादनाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे हे महत्त्वाचे कारण Tesla चे भारतात manufacturing unit न उभारण्यामागे आहे. भारत या अडचणीवर नक्कीच भविष्यात उपाय शोधेल.

भारतातील आव्हाने

  • चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर : भारतात अजूनही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स तुलनात्मक दृष्टीने अजून खूपच मर्यादित आहेत.
  • किंमत : बहुसंख्य भारतीय ग्राहकांसाठी टेस्लाची किंमत खूपच जास्त आहे.
  • नीती : आयात कर आणि स्थानिक उत्पादन प्रोत्साहन यावर अजून अधिक काम करण्याची गरज आहे.चीनमधील Tesla च्या किंमती हून भारतातील Tesla ची किंमत दुप्पट आहे हे लक्षात घ्यायला हवे.

तरीही आशेचा किरण

भारतात पेट्रोल-डिझेल दर उच्च असून प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. Trump यांच्या America first धोरणा मुळे भारताने इंधन टंचाई चा काळ पाहिला व त्यातूनच Green energy कडे भारताचा झुकाव आहे.अशा परिस्थितीत Tesla India सारखी कंपनी भारतात येणे म्हणजे हरित भविष्याकडे टाकलेले मोठे पाऊल आहे. सध्या सरकारही इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देऊन लोकांना प्रोत्साहन देत आहे . (Tesla car price in India)

Elon Musk यांचा प्रकल्प Tesla India फक्त एक व्यवसायिक प्रकल्प न राहता, भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत वाहतूक स्वप्नासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. पुढील काही वर्षांत Tesla ने जर भारतात आपले Manufacturing Unit सुरू केले तर भविष्यात Tesla Electric Car ची भारतातील किंमत लक्षणीय रित्या कमी होईल.


FAQ

भारतात Tesla ची कोणती कार सर्वप्रथम येईल?

सुरुवातीला Model 3 लाँच होण्याची शक्यता आहे.

टेस्लाची किंमत भारतात किती असेल?

₹50 लाख ते ₹60 लाख (आयात केलेल्या मॉडेलसाठी), स्थानिक उत्पादन झाल्यास किंमती कमी होऊ शकतात.

भारतात Electric car चार्जिंगसाठी नेटवर्क आहे का?

सध्या, Tesla ने भारतात 5 सुपरचार्जर स्टेशन सुरू केली आहेत. यामध्ये गुरुग्राम, दिल्ली, मुंबई (BKC) आणि नवी मुंबई येथील स्टेशन्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईतील नेक्सस सीवुड्स मॉलमध्ये उभारलेले स्टेशन हे भारतातील पहिले मॉल-आधारित सुपरचार्जर आहे, जेथे ग्राहक खरेदी करताना गाडी चार्ज करू शकतात.

Tesla चे शोरूम भारतात कुठे आहेत?

सध्या भारतात Tesla चे एकूण 5 Experience Centre (शोरूम) आहेत.
१· मुंबई (Mumbai): बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), Maker Maxity मॉल.
२· दिल्ली (Delhi): एरोसिटी, Worldmark 2 किंवा 3.
३· गुरुग्राम (Gurugram): सेक्टर 48, Orchid Business Park मधील Tesla Centre.
४· बेंगळुरू (Bengaluru): व्हाइटफील्ड.
५· हैदराबाद (Hyderabad): हायटेक सिटी (HITEC City), माधापूर.
*या शोरूम व्यतिरिक्त, हैदराबादमध्ये बोलारम इंडस्ट्रियल एरियामध्ये डिलिव्हरी आणि सर्व्हिस सेंटरही आहे.

हे ही वाचा :

➡️6G Phone येत आहेत – Next Generation Technology

➡️पक्षाघाता सारख्या आजारात वरदान: Elon Musk यांची Neuralink Chip प्रगतीपथावर

➡️Apple logo ची जन्म कथा आणि लोक कथा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment