मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

पुणे PCMC मधे अवतरणार पॅरिस चा आयफेल टॉवर व लंडन चे बिगबेन- थीम पार्क चे काम पूर्णत्वाकडे

पिंपरी-चिंचवडमध्ये जगप्रसिद्ध स्मारकांचा मेळा : ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’

PCMC पिंपरी-चिंचवड शहर आता केवळ उद्योगनगरी किंवा आयटी हब म्हणूनच नव्हे, तर जागतिक कलात्मक स्मारकांना आपल्या उद्यानात स्थान देणारे शहर म्हणूनही प्रसिद्ध होणार आहे. कारण महापालिकेने पिंपळे सौदागर येथील *राजमाता जिजाऊ उद्यानात* सुरू केले आहे एक भन्नाट आकर्षण – ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’! हे काम वेगात सुरू असून लवकरच नागरिकांना हा जागतिक स्मारकांचा मेळा PCMC मधे पहायला मिळणार आहे

कचऱ्यातून कलाकृती

शहरात कचऱ्याचा प्रश्न डोकेदुखी ठरतो. पण याच कचऱ्याचा “सौंदर्य पूर्ण वापर” कसा होऊ शकतो, याचं जिवंत उदाहरण हे उद्यान असेल. स्क्रॅप, टाकाऊ साहित्य आणि लोखंडी भागांपासून तयार होत आहेत जगप्रसिद्ध स्मारकांच्या प्रतिकृती. म्हणजे जे फेकून दिलं जातं, तेच पुन्हा एकदा रूपांतरित होऊन चकाकणार आहे!

जगभराची सफर, तीही पिंपळे सौदागरातच!

जगातील १७ नामांकित स्मारकं एकत्र कुठे पाहायला मिळणार? होय, PCMC पिंपरी-चिंचवडमध्ये!

इथे तुम्हाला दिसतील –

ताजमहालची मोहक शान

आयफेल टॉवर चा रेखीव कळस*

•झुकणारा पीसा टॉवर

•आकाशाला भिडणारा बुर्ज खलिफा

सिडनी ओपेरा हाऊसचा अद्वितीय आकार

•भारतातील अभिमान – अजंठा लेणी

•व हम्पीचा रथ

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी

गिझाचे पिरॅमिड

रोमचे कोलोशियम

लंडनचा बिग बेन

आणि अजून बरेच…म्हणजेच पासपोर्ट-व्हिसाची गरज नाही, थेट राजमाता जिजाऊ उद्यानात पाऊल टाकलं की आपण मिनी वर्ल्ड टूरला निघालो आहोत असं वाटेल!

अधिकृत घोषणेत पार्क च्या सुविधा 📌

शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत पत्रानुसार हा प्रकल्प पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

या संदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की –पर्यावरण आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सर्व परवानग्या घेतल्या जात आहेत. पर्यटकांना अडचण भासू नये म्हणून पार्किंगची व्यवस्था, तिकीट खिडक्या आणि इतर आवश्यक सोयी ही या प्रकल्पात समाविष्ट केल्या जात आहेत.

फक्त मनोरंजन नाही, शिकवणही आहे

हे पार्क केवळ फिरायला किंवा फोटो काढायला नाही, तर मुलांना आणि पर्यटकांना जगभरातील वारसा, कला आणि वास्तुकलेची ओळख करून देणारं एक *जीवंत शैक्षणिक केंद्र* ठरणार आहे. त्यात पर्यावरणपूरक संदेश तर आहेच – कचऱ्याचा व टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला तर त्यापासून सौंदर्यपूर्ण स्मारके बनू शकतात हो‌ मोठा संदेश यातून दिला जातोय

पिंपरी-चिंचवडचं नवं लँडमार्क

PCMC चा हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक वैभवात नवा रंग भरणार आहे. ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’ हे पुढच्या काळात पिंपरी-चिंचवडचं ओळखपत्र ठरण्याची शक्यता नक्कीच आहे

.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment