Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

पुणे PCMC मध्ये 7 Wonders Park- आयफेल टॉवर पासून ताजमहाल पर्यंत सर्व जागतिक आश्चर्ये इथे आहेत – महाराष्ट्रातील एकमेव थीम पार्क पाहिलेत का ?

Pune PCMC World Park: PCMC पिंपरी-चिंचवड शहर आता उद्योगनगरी किंवा IT Hub या ओळखी बरोबरच “उद्यान नगरी” म्हणून ही आपली ओळख निर्माण करत आहे. यातीलच एक अभिनव उपक्रम म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून Wonders of the World स्मारकांच्या प्रतिकृती PCMC येथील Waste to Wonder Park मधे पहायला मिळतील

Colosseum,Rome Italian Replica

पिंपरी-चिंचवडमध्ये जगप्रसिद्ध स्मारकांचा मेळा : ‘Waste to Wonder’ World park PCMC

पिंपरी चिंचवड महापालिकेने UNESCO च्या जागतिक आश्चर्य यादीतील प्रसिद्ध स्मारकांच्या प्रतिकृतींना PCMC च्या पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात Waste to Wonder या Theme अंतर्गत ही अभिनव संकल्पना राबवली आहे . नागरिकांना हा अनेक जागतिक स्मारकांचा (Wonders of the World) मेळा Pune PCMC World Park मधे पहायला मिळत आहे.

कचऱ्यातून कलाकृती – Waste to Wonder- संकल्पना

शहरात कचऱ्याचा प्रश्न डोकेदुखी ठरतो. पण याच कचऱ्याचा “कलात्मक वापर” कसा होऊ शकतो, याचं जिवंत उदाहरण या उद्यानात पहायला मिळते. मुख्यत: टाकाऊ वस्तूंपासून (Scrap)या जगप्रसिद्ध स्मारकांच्या प्रतिकृती तयार केल्या गेल्या आहेत. भंगार व टाकाऊ वस्तूंनी उद्यानात घेतलेले हे नवे दिमाखदार रूप विलोभनीय वाटते.

pune-pcmc-world-park- with replica of Statue of Liberty made of waste metal scrap

जगभराची सफर, तीही पिंपळे सौदागरातच!

UNESCO ने Wonders of the World जाहीर केलेल्या ऐतिहासिक वास्तू व इतर प्रसिद्ध नामांकित अशी एकूण १७ नामांकित स्मारकं आता PCMC च्या राजमाता जिजाऊ उद्यानात पाहायला मिळत आहेत , PCMC ( पिंपरी-चिंचवड) च्या पिंपळे सौदागर या उपनगरात हे उद्यान आहे.Pune PCMC Theme Park मधे बनवलेल्या सर्व जागतिक आश्चर्याच्या वास्तू टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या आहेत.

La Sagrada Replica PCMC WORLD PARK,PUNE

उद्यानात खालील प्रसिद्ध जागतिक वास्तू तुम्ही पाहू शकता

  • ताजमहाल
  • आयफेल टॉवर, पॅरिस,फ्रांस
  • बुर्ज खलिफा, Dubai
  • लीनिंग टॉवर ऑफ पीसा,इटली
  • सिडनी ओपेरा हाऊस
  • स्टॅच्यू ऑफ लिबर्टी,अमेरिका
  • बिग बेन,लंडन
  • कोलोसियम
  • गिझाचे पिरॅमिड
  • पेट्रा (जॉर्डन)
  • अंकोरवाट
  • अजिंठा लेणी, महाराष्ट्र ,भारत
  • हंम्पी रथ, कर्नाटक,भारत
  • ला साग्रादा
  • ट्रेवी फाउंटन, इटली,रोम
  • माउंट रशमोर, South Dakota, अमेरिका
  • चिचेन इत्झा, पिरॅमिड, युकातान, मेक्सिको

अनेक पर्यटक या 7 Wonders Park ला भेट देत आहेत. काहींनी इन्स्टाग्रामवर वर या भेटीचे Reel post केले आहेत ज्यात पार्क ची झलक आपल्याला पहायला मिळते. @Pune_attractions या Insta account च्या Reel मधे या पार्क च्या रात्रीच्या विलोभनीय रोषनाईची झलक ही दिसते.

…Pune PCMC Theme Park ची सफर म्हणजे एकप्रकारे जगाची सफर आहे व ती ही पासपोर्ट-व्हिसाच्या शिवाय. आता तुम्ही पिंपळे सौदागर च्या राजमाता जिजाऊ उद्यानात पाऊल टाकलं की आपण मिनी वर्ल्ड टूरला निघालो आहोत असं तुम्हाला वाटेल!

फक्त मनोरंजन नाही, पर्यावरण संदेश ही..

हे पार्क केवळ फिरायला किंवा फोटो काढायला नाही, तर मुलांना आणि पर्यटकांना जगभरातील वारसा, कला आणि वास्तुकलेची ओळख करून देणारं एक शैक्षणिक केंद्र ठरणार आहे. तसेच त्यात पर्यावरणपूरक संदेश ही आहेच .कचऱ्याचा व टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला तर त्यापासून सौंदर्यपूर्ण स्मारके बनू शकतात हा मोठा संदेश यातून दिला जातोय.

पिंपरी-चिंचवडचं नवं लँडमार्क

एके काळी PCMC हे सुंदर मोकळे शहर होते. शहरीकरणात सततच्या वाढत्या बांधकामांमुळे इथली हिरवाई व मोकळे पणा नष्ट झाला आहे. याचसाठी नगरपालिकेने उपनगरात अनेक उद्याने उभी केली. याच मोहिमेचा भाग असलेल्या West to wonder Theme असलेले World Park चे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी निसर्ग संवर्धन तर होणार आहेच पण त्याचबरोबर जागतिक संस्कृती ची ओळख PCMC करांना होणार आहे. पालिकेचा हा उपक्रम आज शहराच्या सांस्कृतिक वैभवात नवा रंग भरत आहे.

पुणे PCMC मध्ये 7 Wonders Park- आयफेल टॉवर पासून ताजमहाल पर्यंत सर्व जागतिक आश्चर्ये इथे आहेत - महाराष्ट्रातील एकमेव थीम पार्क पाहिलेत का ?

कसे पोहोचाल:

पत्ता:

Rajmata Jijau World Park (Waste to Wonder Park)HQVW+W47, Roseland Residency जवळ,पिंपळे सौदागर, पिंपरी-चिंचवड, पुणे – 411027

खालीली Google Map वर अचूक Location पहा

FAQ

Waste to wonder park,PCMC ,Pune चे प्रवेश शुल्क किती आहे?

🎫 प्रवेश शुल्क (Entry Fee)
सध्या प्रौढांसाठी सुमारे ₹60 प्रति व्यक्ती प्रवेश शुल्क आकारले जात असल्याचे पर्यटकांच्या सोशल मीडिया पोस्ट वरून दिसते. शुल्कात वेळोवेळी बदल होऊ शकतो, त्यामुळे भेट देण्यापूर्वी अद्ययावत माहिती तपासावी.

Waste to wonder park, PCMC PUNE येथे Parking सुविधा आहे का?

होय, येथे Parking सुविधा आहे पण parking विभागाची क्षमता कमी आहे.

Waste to wonder park, PCMC PUNE हे पार्क चे वेळापत्रक काय आहे?

हे पार्क सकाळी १० ते रात्री १० पर्यटकांसाठी खुले असते. संध्याकाळी ७ नंतर इथे उभारलेल्या जागतिक प्रतिकृतींवर मनोहारी अशी रोशनाई केली जाते.‌ यामुळे इथे संध्याकाळी जाणे जास्त फायद्याचे आहे.

हे ही वाचा:

PCMC निगडी – दुर्गा टेकडी वर बिबट्या दिसला: वनविभाग सतर्क, उद्यान तात्पुरते बंद

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment