Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Tara – अध्यात्मातील पहिली महिला गुरू- तिचा मंत्र Green Tara Mantra शक्तिशाली मानला जातो

Photo of the statue of Tibetan Buddhist Goddess Green Tara. She is sitting and looking down with compassion

तारा देवीची कथा

Green Tara Mantra देणारी देवी तारा स्त्रीवादी होती- ती भारतातील नेपाळ येथील राजाची मुलगी होती.या राजकन्येने अध्यात्मिक उन्नती चा हक्क स्त्री ला ही आहे असे म्हटले.

आध्यात्मिक उन्नतीचा हक्क स्त्रीयांनाही आहे

-Green Tara

इ. स.7 वे शतक – नेपाळ मधे त्या काळात बुद्धीझम मधे स्त्री साध्वींना निशिद्ध मानले जाई. अशा वेळी नेपाळी राजकन्येने अथक ध्यान साधना व सेवा धर्माचे आचरण करून अध्यात्म जगात ख्याती प्राप्त केली. एक जेष्ठ बौद्ध भिक्कू एकदा राजकन्येस भेटावयास आले व तिला आशिर्वाद देवून म्हणाले ” हे मला फारच दुःखदायक वाटते की तुझ्यासारख्या उज्वलीत अशा आत्म्याने स्त्री रूपात जन्म घेतला आहे. आता तुला बोधिसत्व मिळवण्यासाठी पुन्हा एकदा पुरूष म्हणून जन्म घ्यावा लागेल व त्यासाठी मी तुला आशिर्वाद देतो

” या विश्वात स्त्रीत्व, पौरुषत्व, स्वत्व वा व्यक्तित्व असे काहीच नाही.. स्त्री -पुरूष असा भेद कुणी मानत असेल तर तो मूर्खपणाच असेल!”

Green Tara पुढे म्हणाली…

“पुरुष जन्म घेवून अध्यात्मिक उन्नती प्राप्त करू इच्छिणारे या जगात अनेक असतील पण स्त्री जन्म घेवून मानव सेवेसाठी जगणारे विरळाच. आणि म्हणूनच मी शपथ घेते की  या विश्वाच्या शेवटापर्यंत मी स्त्री जन्मच घेत राहीन व आपल्या सारख्या संत महात्म्यांची व जन सामान्यांची सेवा करीन! “

नेपाळी राजकन्येने तिबेटी राजकुमाराशी विवाह केला

हीच नेपाळी राजकन्या पुढे तिबेटन राजाची राणी झाली. देवी “तारा” म्हणून तिला लौकिक प्राप्त झाला.  बुद्ध धर्माच्या तिबेटी तंत्र शाखेतील ती एक महत्त्वाची देवता आहे. हिंदू धर्मातील तंत्रशाखेतही तिला अग्रणी स्थान आहे. भक्तांना तारणारी म्हणून ही ‘तारा’ म्हणवली जाते असे भारतीय परंपरा सांगते. तारा ला ‘स्त्री बुद्ध’ किंवा Lady Buddha म्हणून ही ओळखतात.

Lady Buddha -तारा

इ.स. ७ व्या शतकात स्त्री ला आध्यात्मिक उन्नतीसाठी अयोग्य मानले जात असे .या काळात धार्मिक व सामाजिक पूर्वगृहांना खोटे पाडून गौतम बुद्धांच्या भक्ती मधे समर्पित राहून एक स्त्री अखेर ‘स्त्री बूद्ध’ म्हणवली गेली .हा तारा देवीचा आध्यात्मिक जगातला स्त्रीवादच म्हणावा लागेल.


The Green Tara Mantra 

The Green Tara Mantra : मंत्रोच्चार व प्रभाव

भारतीय तंत्र शाखेतील शाक्त किंवा शक्ती पंथात ग्रीन तारे ला अग्रणी दैवत मानले जाते. भक्तांसाठी धावून येणारी अशी protector deity म्हणून तिला मान्यता आहे. पौराणिक काळात Green Tara जंगली हिंस्त्र श्वापदांपासू भक्तांचे रक्षण करते अशीही मान्यता होती.

गायत्री मंत्राप्रमाणेच Green Tara Mantra ने निर्माण होणारे प्रभामंडल शक्तिशाली मानले जाते. या मंत्राच्या जपाने साधका भोवती positive waves तयार होतात व त्याचा नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो असे मानले जाते. याच बरोबर संकट समयी Green Tara देवी तत्परतेने आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ धावून येते अशी अनुभूती अनेक भक्त सांगतात.

"ओम तारे तु त्तारे तुरे सोहा"
(Oam Tare Tu Tare Ture Soha)

Green Tara Mantra -Courtesy YouTube 

मंत्राचा अर्थ

या मंत्रातील प्रत्येक शब्दाला आध्यात्मिक महत्त्व आहे:

  • ॐ (Om): हे विश्वाचे मूळ प्रतीक आहे, जे शरीर, वाणी आणि मनाचे शुद्धीकरण करते.
  • तारे (Tare): याचा अर्थ ‘तारणारी’ असा होतो. हा शब्द सांसारिक दुःख, जन्म-मृत्यूचे चक्र आणि सर्व प्रकारच्या बाह्य संकटांमधून (जसे की भय, आजारपण) मुक्ती मिळवून देतो
  • तुत्तारे (Tuttare): हा शब्द अंतर्गत संकटांमधून (जसे की अज्ञान, संशय, राग, गर्व आणि आसक्ती) आपले रक्षण करतो. हे आपल्याला आध्यात्मिक मार्गावर आणते
  • तुरे (Ture): याचा अर्थ ‘त्वरित’ किंवा ‘वेगाने’ असा आहे. जेव्हा एखादा साधक संकटात असतो, तेव्हा ग्रीन तारा त्याच्या रक्षणासाठी अतिशय वेगाने धावून येते, हे या शब्दातून दर्शवले जाते. तसेच हे मानसिक आणि शारीरिक आजारातून त्वरित बरे होण्यास मदत करते
  • स्वाहा (Svaha): याचा अर्थ ‘समर्पण’ किंवा ‘माझ्या हृदयात हा मंत्र वास करो’ असा आहे. याने मंत्राची ऊर्जा आपल्यात सामावून जाते (* तिबेटी मधे स्वाहा चा उच्चार “सोहा” असाही करतात)

ग्रीन तारा मंत्राचे विशेष लाभ

भय आणि संकटांपासून मुक्ती: तिबेटी परंपरेनुसार, हा मंत्र माणसाला खालील ८ प्रकारच्या प्रबळ भयांवर विजय मिळवण्यास मदत करतो.

  • सिंह-अभिमान
  • हत्ती-अज्ञान
  • अग्नी-क्रोध
  • साप-मत्सर
  • चोर-चुकीचे विचार
  • पूर-आसक्ती

संकटातून तारणारा व यश देणारा Green Tara मंत्र

इच्छापूर्ती आणि प्रगती: हा मंत्र व्यवसाय, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्यातील अडथळे दूर करून यश आणि समृद्धी प्रदान करतो.करुणा आणि मानसिक शांतता: मंत्राच्या नियमित जपाने मनातील नकारात्मक विचार दूर होऊन चित्त शांत होते आणि मनात इतरांबद्दल करुणेची भावना निर्माण होते.

भारतीय परंपरेतील तारा मंत्राचा साधा सरळ अर्थ

भारतीय परंपरेत “तारा” म्हणजे संकटातून तारणारी असा अर्थ मानला जातो. Green Tara Mantra चा ही अर्थ भारतात देवी आवाहन स्वरूपात घेतला जातो. ” हे तारा देवी तू सत्वर येवून आम्हाला संकटातून तार” अशा अर्थाने ही हा मंत्र जाप केला जातो.

भारतीय परंपरेत “तारा” म्हणजे संकटातून तारणारी असा अर्थ मानला जातो. Green Tara Mantra चा ही अर्थ भारतात देवी आवाहन स्वरूपात घेतला जातो. ” हे तारा देवी तू सत्वर येवून आम्हाला संकटातून तार” अशा अर्थाने ही हा मंत्र जाप केला जातो. Tibetan Buddhism मधील Green Tara Mantra च्या मूळ अर्थाहून हा अर्थ वेगळा नाही पण भारतीय भक्ती परंपरेला अनुसरून ‘सरल’ असा आहे.

त्वरित साहाय्य (Quick Action): ग्रीन तारा यांच्या मूर्ती किंवा चित्रात त्यांचा उजवा पाय पुढे निघालेला (मजकुरावरून उठण्याच्या स्थितीत) दिसतो. याचा अर्थ असा आहे की, भक्ताने हा मंत्र म्हणताच त्या मदतीसाठी त्वरित धावून येतात.

Tara एक स्त्री वादी आध्यात्म गुरू

अध्यात्म जगतात वाद-प्रतीवाद असंख्य आहेत .धर्म आणि संस्कृती च्या दृष्टीने दावे प्रतीदावे ही अंतहीन आहेत पण “जगाच्या अंतापर्यंत मी स्त्री म्हणूनच जन्माला येणार!” असे ठणकावून सांगणार्या तारा देवीचा यलगार आज च्या feminist विचारांना बळ देणारा नक्कीच आहे 


हे ही वाचा:

भूमी स्पर्श मुद्रा कशी करावी – Bhumi Sparsha Mudra मार्गदर्शन आणि त्यामागील कथा जाणून घ्या…

महाकुंभ- निमंत्रण वा घोषणे शिवाय हजारो भक्त येतात- mahakumbh ‘घडण्याची’ अद्भुत परंपरा…

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment