Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

महाकुंभ- निमंत्रण वा घोषणे शिवाय हजारो भक्त येतात- mahakumbh ‘घडण्याची’ अद्भुत परंपरा…

महाकुंभ पर्व : एक अती प्राचीन परंपरा

कुंभ पर्वात नदीमध्ये स्नान केल्यास पाप मुक्ती व पुण्य प्राप्त होते या श्रद्धेने हजारो भाविक या कुंभ स्नानासाठी येत असतात 

दोन साधू महाकुंभ पर्वात नदीमध्ये स्नान करताना
महाकुंभात प्रसन्न चित्त साधू जन स्नान करताना(AI image)
महाकुंभ- निमंत्रण वा घोषणे शिवाय हजारो भक्त येतात- mahakumbh 'घडण्याची' अद्भुत परंपरा...
महाकुंभ पर्वात कुंभ स्नान करताना साधू जन (AI image)

(Internate Title:  Maha Kumbh -Spiritual event Beliefs and traditions )

महाकुंभ घडत असते

हजारो वर्षांच्या प्नाचीन परंपरे अनुसार महाकुंभ पर्व घडत असते. “घडत असते” असे मुद्दाम म्हटले कारण या अद्भुत व प्राचीन उत्सवासाठी कुणालाही औपचारिक आमंत्रण नसते. ठरल्या तिथीला हजारो साधूगण व भाविक ठरल्या ठिकाणी कुंभ स्नानासाठी येत असतात.

महाकुंभ मेळा भारतातील प्राचीन आणि जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक परंपरांपैकी एक आहे. ही परंपरा वैदिक काळापासून सुरू असल्याचे मानले जाते. महाकुंभ मेळ्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो.

महाकुभ -सागर-मंथन पौराणिक कथा

महाकुंभ परंपरेचा उगम सागरमंथनाच्या कथेशी संबंधित आहे. देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी सागर मंथन केले, ज्यामध्ये अमृत कलश (अमृताने भरलेला घडा) बाहेर आला. अमृत मिळवण्यासाठी देव-दानवांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात अमृताचा काही भाग पृथ्वीवरील चार ठिकाणी सांडल्याचे मानले जाते .ती चार ठिकाणे म्हणजे

  1. प्रयागराज (अलाहाबाद)
  2. हरिद्वार
  3. उज्जैन
  4. नाशिक

ही चार ठिकाणे पवित्र मानली जातात आणि येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते.

समुद्रमंथनाचे काल्पनिक चित्र
समुद्र मंथन -एक पारंपारिक रेखाचित्र सौजन्य गूगल

महाकुंभ मेळा म्हणजे काय?

महाकुंभ मेळा हिंदू धर्मीयांसाठी सर्वांत पवित्र तीर्थयात्रा मानली जाते. या मेळ्याचा मुख्य उद्देश पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पापांपासून मुक्त होणे आणि मोक्षप्राप्ती करणे हा आहे.

महाकुंभ मेळ्याचा कालावधी आणि चार ठिकाणे

महाकुंभ पर्व दर ३ वर्षांनी  येते. खालील चार  ठिकाणी अनुक्रमे कुंभ पर्वाचे आयोजन होत असते.

कधी आणि कुठे भरतो कुंभ?

१-प्रयागराज:

अशी मान्यता आहे की, जेव्हा सूर्य मकर राशीत आणि गुरु वृषभ राशीत असतो, तेव्हा गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र तीरावर महाकुंभ भरतो.

२-हरिद्वार:

असे म्हणतात की, जेव्हा गुरु कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो, तेव्हा गंगेच्या तीरावर कुंभ भरतो.

३-नाशिक:

अशी धारणा आहे की, जेव्हा गुरु आणि सूर्य सिंह राशीत असतात, तेव्हा नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तीरावर कुंभ भरतो.

४-उज्जैन:

असे म्हणतात की, जेव्हा गुरु सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो, तेव्हा उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर कुंभ भरतो.

ही चारही ठिकाणे ज्या नद्यांच्या काठी आहेत त्या नद्या पवित्र मानल्या जातात‌ कारण या नद्यांच्या पाण्यात अमृताचा अंश आहे.

  1. प्रयागराज (गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम)
  2. हरिद्वार (गंगा नदी)
  3. उज्जैन (क्षिप्रा नदी)
  4. नाशिक (गोदावरी नदी)

अर्धकुंभ: प्रत्येक 6 वर्षांनी महाकुंभाच्या मध्यावर काही ठिकाणी अर्धकुंभ आयोजित होतो.

विशेष वैशिष्ट्ये

  1. पवित्र स्नान: महाकुंभ काळात शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे.
  2. साधू-संतांचे जमाव: भारतातील विविध अखाड्यांमधील साधू, नागा साधू, आणि धार्मिक नेते या मेळ्यात सहभागी होतात.
  3. आध्यात्मिक प्रवचन: वेगवेगळ्या धर्मगुरूंकडून अध्यात्म, वेद, उपनिषद यांवरील प्रवचन दिले जाते.

महत्त्व

  1. आध्यात्मिक शुद्धीकरण: महाकुंभ स्नानाला आध्यात्मिक शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते.
  2. संस्कृतीचा वारसा: महाकुंभ भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे.
  3. वैज्ञानिक महत्त्व: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, चंद्र आणि गुरु ग्रहांच्या विशिष्ट स्थितीत या मेळ्याचे आयोजन होते.

महाकुंभ मेळा केवळ धार्मिक मेळा नसून जगभरातील लाखो लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. आत्तापर्यंत अनेक पाश्चिमात्य सेलिब्रिटींनी या महाकुंभाच्या अद्भुत सोहळ्याला हजेरी लावलेली आहे. ही परंपरा वैश्विक मानवतेच्या विविध अंगांना जोडणारी आणि भारतीय संस्कृतीला समृद्ध करणारी मानली जाते.

हे ही वाचा: ▶️भूमी स्पर्श मुद्रा कशी करावी – Bhumi Sparsha Mudra मार्गदर्शन आणि त्यामागील कथा जाणून घ्या…▶️Tara – अध्यात्मातील पहिली महिला गुरू- तिचा मंत्र शक्तिशाली मानला जातो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment