मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Akshay Khanna-धुरंधर ची stylish entry आणि Zurna चे स्वर-Zurna या अरबी वाद्याचा इतिहास जाणून घ्या




Akshay Khanna Dhurandhar Entry अक्षय खन्नाच्या धुरंधर एंट्रीतील खरी जादू Zurna च्या अरबी सुरांची

Akshaye Khanna Dhurandhar entry Zurna sound

धुरंधर या चित्रपटात अक्षय खन्ना ज्या दमदार स्टाईलमध्ये एंट्री करतात,
त्यात ऐकू येणारे अरबी-डेजर्ट टाईप सुर लगेच लक्ष वेधून घेतात.
लोकांना हे सूर शहनाईसारखे वाटत असले तरी पण प्रत्यक्षात ते जुर्ना (Zurna) या तुर्की-मध्यपूर्वेतील पारंपरिक वाद्यातून आले आहेत.

धुरंधर चित्रपटाच्या संगीतकारांनी Akshay Khanna Dhurandhar Entry च्या song sequence मधे  या वाद्याचा केलेला प्रभावी वापर,अक्षय खन्नाच्या स्मार्ट व्हिलन’ भूमिकेला एक अनोखा आणि रहस्यमय आयाम देतो.

चला तर मग, या Zurna वाद्याचे रहस्य आणि त्याची वैशिष्ट्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. (टीप : Zurna चा उच्चार जुर्ना,झुर्ना असा प्रांतागणिक वेगळा आहे. तसेच Mizmar असे वेगळे नाव ही या वाद्याला आहे)

जुर्ना(Zurna) वाद्य कसे असते? आणि त्याचे ऐतिहासिक मूळ काय आहे?

जुर्ना हे एक double-reed wind instrument आहे. हे वाद्य बासरी किंवा क्लॅरिनेट (Clarinet)
यांच्या कुटुंबातील आहे, पण याचा आवाज त्यांच्यापेक्षा खूप वेगळा आणि खास असतो.
जुर्नाचा आवाज जोरदार, तीक्ष्ण आणि दूरवर पोहोचणारा असतो, ज्यामुळे हे वाद्य मोकळ्या जागांमध्ये किंवा
मोठ्या मिरवणुकांमध्ये वाजवण्यासाठी योग्य ठरते. तुर्की साम्राज्यामधे सम्राटाच्या ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी वाजवण्यात येणार्या बॅंड मधे Zurna वाद्य प्रामुख्याने वापरले जायी. या वाद्यमेळ्याला “नौबत” म्हणत . महाराष्ट्रातील तुर्की साम्राज्याच्या प्रभावा मुळे मराठी मधे “नौबत झडणे” असा ही वाक्प्रचार आहे.
रचना: या वाद्याचा मुख्य भाग लाकडी असतो, ज्याला
‘बुलबुल’ किंवा ‘पिरू’ नावाचे मुखपत्र (mouthpiece) जोडलेले असते.

या वाद्याची उत्पत्ती सुमारे ५००० वर्षांपूर्वी मध्य आशियात झाली असावी, असे मानले जाते.
कालांतराने, ओटोमन साम्राज्याच्या (Ottoman Empire) विस्तारासोबत हे वाद्य तुर्की,
आर्मेनिया, इराण, कुर्दिश प्रदेश आणि बाल्कन देशांपर्यंत पोहोचले.
प्रत्येक प्रदेशानुसार याच्या नावात आणि वाजवण्याच्या शैलीत थोडा फरक आढळतो,
पण त्याचा ऊर्जावान आणि उत्साहवर्धक बाज कायम राहतो.

तुर्की लोककथा: जुर्नाचे आध्यात्मिक महत्व आणि ‘नऊबत/नौबत’

जुर्नाचे महत्व केवळ संगीतापुरते मर्यादित नाही; तुर्की संस्कृतीत त्याला एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थान आहे.

तुर्की लोककथेनुसार, मातीपासून घडवलेला आदम (पहिले मानव) सुरुवातीला निर्जीव होता.
असे म्हटले जाते की महादूत गॅब्रिएल (Gabriel) यांनी तुईदुक (Tuiduk) नावाच्या
जुर्नासारख्याच एका वाद्यावर मधुर संगीत वाजवले आणि त्या संगीतामुळेच आदममध्ये प्राण आला.
ही कथा जुर्नाच्या पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची साक्ष देते.

महत्त्वाची ऐतिहासिक नोंद : नौबत (Nevbet) ऐतिहासिक दृष्ट्या, जुर्ना हा ओटोमन साम्राज्याच्या शाही लष्करी बँड ‘मेहतर’ (Mehter) चा अविभाज्य भाग होता. ‘मेहतर’ बँड दररोज विशिष्ट वेळी सुलतानाची शक्ती आणि सार्वभौमत्व दर्शवण्यासाठी ढोल, नगारे आणि जुर्ना यांचा उपयोग करून राजेशाही घोषणा करत असे, या समारंभाला ‘नौबत’ म्हटले जाई. त्यामुळे जुर्ना हे केवळ लोकवाद्य नसून ते राजसत्तेचे प्रतीक देखील आहे.

आजही तुर्की लोकसंगीत, लग्नसमारंभ,
मिरवणुका आणि उत्सवांमध्ये जुर्नाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय प्रेक्षकांसाठी हा आवाज नवीन असल्याने,
तो सिनेमात लगेच वेगळा आणि प्रभावी ठसा उमटवतो. Zurna च्या अद्भुत सुरांमुळेच आज Akshay Khanna Dhurandhar Entry trend होत आहे. Akshay Khanna चा swag खालील youtube video मधे जरूर पहा

https://youtu.be/VvBXf7SldhY?si=cPEFY5V4kj48ajHz

जुर्ना (Zurna) आणि सनई (Shehnai) – दोन्ही एकसारखे का वाटतात?

वैशिष्ट्यजुर्ना (Zurna)सनई (Shehnai)
आवाजतीक्ष्ण, मोठा, रणशिंगासारखा (Trumpet-like), डेजर्ट-वाइबमृदू, भावपूर्ण, सुसंवादी (Harmonious), शास्त्रीय टोन
प्रदेशतुर्की, मध्यपूर्व, आर्मेनिया, बाल्कनभारत, पाकिस्तान, बांगलादेश (मुख्यतः दक्षिण आशिया)
वापरनृत्य, मिरवणुका, युद्धभूमीतील संगीत, सिनेमॅटिक एंट्री सीनलग्न, पूजा, शास्त्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक उत्सव
रचनाDouble-reed, लाकडी शरीर, मोठा आणि पसरट ‘बेल’ (Bell)Double-reed, लाकडी शरीर, सडपातळ आणि नाजूक ‘बेल’

दोन्ही वाद्ये एकाच ‘शॉल्म’ (Shawm) कुटुंबातील असली तरी त्यांचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे.
जुर्नाचा मोठा आणि पसरट बेल (Bell-आकाराचा शेवटचा भाग) आवाजाला अधिक मोठे आणि तीक्ष्ण बनवतो,
तर सनईचा नाजूक आकार तिला अधिक मधुरता देतो.
म्हणूनच धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या ‘दबंग’ एंट्रीला जुर्ना चा स्वर अगदी नेमका जुळतो.(Akshay Khanna Dhurandhar Entry
मधल्या त्याच्या एकूणच cool swag ला तसाच  शांत , संयत पण ऊर्जावान आणि लक्ष वेधून घेणारा sound हवा होता. ही sound and visual chamistry Akshay Khanna च्या धुरंधर चित्रपटातील गाण्यात अप्रतिम पुणे उतरली आहे.

धुरंधर चित्रपटातील गाण्यात जुर्ना वाद्याचे स्वर इतके प्रभावी का वाटतात?

चित्रपटाच्या संगीतकारांनी जुर्ना, आधुनिक बीट्स आणि सिंथेसायझर यांचा एक सुंदर फ्युजन तयार केला आहे.
जुर्नाचा ‘मिस्टिक’ आणि ‘अरबी’ टोन अक्षय खन्नाच्या पात्रातील रहस्य आणि धोकादायक स्वभावाचे प्रतीक बनतो.
तसेच, Flipperachi सारख्या गल्फ-वाइब असलेल्या व्होकलिस्टचा आवाज
या वाद्यासोबत खूप प्रभावी वाटतो.
हा ‘अरबी-भारतीय’ संगीताचा मिलाफ आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खूप लोकप्रिय ठरतो आहे.
यामुळे पूर्ण एंट्रीला मिस्टिक + स्टायलिश + सिनेमॅटिक अनुभव मिळतो आणि भारतीय प्रेक्षकांना
बॉलिवूडच्या प्रेक्षकांना नेहमीच्या संगीतापेक्षा काहीतरी नवीन ऐकायला मिळते.


सुलतानांच्या ताकदीचे प्रतीक

भारतीय प्रेक्षकांना शहनाईची सवय असल्याने, जुर्नाचा आवाज त्यांना काहीसा परिचित पण वेगळा वाटतो. तो सूर सनई चा नक्कीच नाही. ऐतिहासिक संदर्भांनी पाहता..
जुर्ना हे केवळ एक वाद्य नाही, तर ते तुर्की सुलतानांच्या “असीम ताकदीचे एक सांगितीक प्रतीक” आहे.
धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या एंट्रीला हे वाद्य सूचक पणे वाजवून दिग्दर्शकाने त्या पात्राची power establish केली आहे.
तुर्की संस्कृतीपासून सिनेमापर्यंत – जुर्नाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे आणि या एका वाद्याने
चित्रपटातील एक सामान्य एंट्रीला ‘आयकॉनिक’ बनवले आहे यात शंका नाही! आपण धुरंधर चित्रपटाचे Akshay Khanna यांचे हे गाणे अजून पाहिले नसेल तर Youtube  वर या LINK 🔗 वर जरूर पहा

तुम्हाला Zurna या Arabic वाद्याची माहिती आवडली का ? अशा आणखी काही पारंपरिक वाद्यांबद्दल माहिती वाचायला आवडेल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.

हे ही वाचा :

गिरीजा ओक ची viral blue saree. किंमत किती व ब्रॅड कोणता | pan Adhar link घरच्या घरी कसे करावे? Online method| जंगली मांजराच्या विष्ठेपासून बनणारी महागडी कॉफी | कोल्हापूर चे समाजसुधारक छत्रपती -शाहू महाराज | बखर साहित्याची झलक आणि शनिवार वाड्याची सफर |

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment