Infusion de Santal Chai या नावाने भारतीय चहा चा सुगंध Prada च्या परफ्यूम बाटलीत बंद
चला चहा घेवू या ! असं म्हणत आपण जवळच्या टपरीवर सहज गप्पांची मैफिल जमवतो . “या एकदा चहाला !” असं म्हणून आग्रहाचं आमंत्रण देतो . कधी प्रसंगी चाय-पाणी देवून काम करूनही घेतो. आपल्या साठीचहा म्हणजे केवळ एक पेय नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे.फक्कड चहा म्हणजे..मनाला शांत करणारा उबदार मसाल्याचा दरवळ. आता इटलीच्या Prada या luxury Fashion Brand ने चहाच्या सुगंधाची ही अनुभूती अत्तराच्या कुपीत बंद केली आहे.— Prada ने आपल्या नव्या टी-इन्स्पायर्ड Prada Chai perfume ला 7 जानेवारीला लॉंच केले आहे. या Luxury Fragrance चे नाव आहे Infusion de Santal Chai(इन्फ्यूजन दे सांता चाय).
चहाच्या दरवळाला चंदनाची उब
Prada Chai Perfume च्या सुगंधाचे वर्णन करताना Prada म्हणते:
“Infusion de Santal Chai unexpectedly fuses creamy sandalwood with the spicy notes of chai latte accord, creating a warm and cosy scent, lifted by a fresh touch of citrus and cardamom, plus the clean and comforting facets of musks.”
सोप्या शब्दांत सांगायचे तर, या Prada Chai perfume मध्ये चंदनाचा मऊ, क्रीमी वुडी सुगंध आहे, ज्यात चहा मसाल्याच्या सौम्य पण झिणझिणीत नोट्स मिसळलेल्या आहेत. सिट्रस आणि वेलचीचा ताजेपणा या उबदार सुगंधाला हलकीशी चमक देतो, तर मस्क्समुळे निर्मळ, आरामदायी आणि शांत करणारी अनुभूती मिळते.
चहाचा उबदार सुगंध तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख
या सुगंधातून चाची परिचित अशी एक उबदार, cosy आणि वुडी नोट जाणवते — चहा सुगंधा ला ही woody note देण्यासाठी चंदनाच्या सुगंधाचा वापर या अनोख्या परफ्यूम मधे केला गेला आहे— आणि त्यासोबतच चहा मसाल्यांची सौम्य सुगंध छटा ही याय अनुभवता येते. Prada स्वतः या fragrance चे वर्णन करताना म्हणते ,”Infusion de Santal Chai चा fragrance creamy comfort and sparkling freshness या दोन गंध आनुभूतींना एकत्र बांधतो”.
हा Perfume वापरणाऱ्याला cozy, warm आणि luminous वाटावा, अशा उद्देशाने तो डिझाइन करण्यात आला आहे.
किंमत आणि लक्झरी टॅग
चहा आपल्या साठी महत्वाचा असला तरी तो आपण कवडीमोल आहे असेच मानतो.एखाद्या कंजूस कवडी चुंबक माणसा बद्ल आपण सहज म्हणतो ..”कधी साधा चहा पाजणार नाही तो!”. Prada ने मात्र याच साध्या चहाच्या नुसत्या सुगंधाची किंमत हजारों मधे लावलीय Infusion de Santal Chai पूर्णपणे लक्झरी सेगमेंटमधील परफ्यूम आहे.
- किंमत आहे: $190
- भारतीय चलनात ही किंमत: सुमारे ₹17,000 होते
अर्थात ही किंमत केवळ सुगंधासाठी नाही, तर Prada च्या ब्रँड व्हॅल्यू, डिझाइन आणि सांस्कृतिक कल्पकतेसाठीही आहे. ही कल्पकता आपल्याकडे का नव्हती?..याच उत्तर आपलं आपणच शोधलं पाहिजे. सध्या आपल्या हातात चहा च्या टपरीवर बसून या Prada Chai perfume वर चर्चा करणे एवढेच शिल्लक आहे. या पूर्वी ही म्हणजे गेल्याच वर्षी आपण Prada च्या कोल्हापुरी inspired चप्पल वर अशी चर्चा केली होती.
भारत आणि Prada: प्रेरणा आणि वाद
Prada ला भारतीय संस्कृति मधून प्रेरणा घेणे ही नवीन गोष्ट नाही. मात्र Prada कडून असे करणे हे हल्लीच वादाचा विषय झाले आहे. 2025 मध्ये Prada ला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले, जेव्हा त्यांनी कोल्हापुरी चप्पलसारख्या दिसणाऱ्या महागड्या सँडल्स बाजारात आणल्या होत्या.
या प्रकरणात सांस्कृतिक अपप्रयोग (cultural appropriation) केल्याचा आरोप झाला आणि त्यावरून मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल करण्यात आली. त्यामुळे भारतीय संस्कृतीवर आधारित प्रत्येक जागतिक व्यावसायिक संकल्पना संवेदनशीलतेने हाताळणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Prada ची व्यावसायिक कल्पकता
Infusion de Santal Chai हा चहावर आधारित Prada Chai perfume भारतीय परंपरेला जागतिक लक्झरीच्या स्तरावर सादर करतो. एक साधा चहाचा कप, चंदनाचा दरवळ आणि मसाल्यांची उब — या सगळ्यांतून Prada हे सिद्ध करते की….
कला, संस्कृति व परंपरे मधील Unique Elements जर योग्य पद्धतीने मांडले व वापरले, तर ते जागतिक स्टाईल स्टेटमेंट बनू शकतात. Prada ची ही व्यावसायिक कल्पकता आता भारतीय उद्योजकांनीही अंगिकारली पाहिजे.
हे ही वाचा: कोल्हापुरी चप्पल विवादा नंतर Prada चे लोक कोल्हापुरात दाखल – भविष्यात स्थानिक कारागिरां सोबत करार होणार || इटालियन फॅशन ब्रॅंड प्रादावर कोल्हापुरी चप्पल चोरीचा आरोप – इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल ला लेदर-फ्लॅट-सॅंडल नावाने प्रादा ने सादर केले || Prada- आहे अती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड- जाणून घ्या प्राडा बद्दल सर्व काही








छान माहिती मिळाली