तुम्ही ऑनलाइन पेमेंट करता ना? जर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण १ एप्रिल २०२६ पासून तुमचे Online Payment Security new rules अंतर्गत ऑनलाइन व्यवहार करण्याची पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे.
हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता फक्त OTP टाकून काम भागणार नाही. बँकिंग सुरक्षित ठेवण्यासाठी काही नवीन आणि कडक नियम लागू होत आहेत. चला, जाणून घेऊया सरकार ने लागू केलेले हे ८ नियम सोप्या भाषेत…
१. डायनॅमिक टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Dynamic Two-Factor Authentication)
आता तुम्ही जेव्हा पेमेंट कराल, तेव्हा बँक फक्त OTP विचारणार नाही, तर तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणाहून पेमेंट करत आहात हेही तपासणार आहे. म्हणजे जर तुम्ही मुंबईत असाल आणि कोणी दिल्लीतून पेमेंटचा प्रयत्न करत असेल, तर बँकेची सिस्टीम सतर्क होईल.
२. स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंगवर बंदी
तुम्ही बँकिंग ॲप वापरत असताना आता स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग घेता येणार नाही. का? कारण सायबर गुन्हेगार AnyDesk सारख्या ॲप्सद्वारे तुमचा फोन हाती घेऊन स्क्रीन रेकॉर्ड करतात आणि तुमचा OTP, पासवर्ड चोरतात. ही बंदी तुमचे पैसे वाचवेल.
३. रात्रीचे व्यवहार ‘लॉक’ करा
बऱ्याच लोकांना ही सवय असते की रात्री उशिरा मोबाईलवर online payment करून टाकतात. पण आता तुम्हाला हवे असल्यास, रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत तुमचे सर्व आर्थिक व्यवहार बंद (लॉक) ठेवता येतील. याचा अर्थ, या वेळेत तुमच्या खात्यातून एक रुपयाही डेबिट होणार नाही. झोपेत असताना पैसे गेले, अशी भीती नाही.
४. बनावट ॲप डाउनलोड केल्यास सजगतेचा इशारा
तुम्ही कधी एखादे अनोळखी ॲप डाउनलोड करता का? आता तुम्ही जर बनावट किंवा मालवेअर असलेले ॲप डाउनलोड केलेत, तर तुम्हाला लगेच वॉर्निंग मिळेल. बँकिंग सिस्टीम तुम्हाला सतर्क करेल की ‘हा व्यवहार सुरक्षित नाही, सावधान!’
५. OTP येण्याची पद्धत बदलणार
आता SMS द्वारे OTP येण्याची पद्धत बंद होत आहे. यापुढे OTP थेट तुमच्या बँकिंग ॲपमध्येच येईल. म्हणजे सिम स्वॅप करून किंवा दुसऱ्या फोनवर एसएमएस फॉरवर्ड करून फसवणूक करणाऱ्याची चोरीची पद्धत (modus oprendi) निकामी होणार आहे.
६. मोठ्या रकमेसाठी अतिरिक्त प्रश्न (Security Questions)
समजा तुम्ही नेहमी २,००० रुपयांचे व्यवहार करता, पण अचानक कोणी ५०,००० रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तर बँक तुम्हाला काही सुरक्षा प्रश्न विचारेल. जसे की “तुमच्या आईचे नाव काय?” किंवा “तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात?” याची उत्तरे बरोबर दिलीत, तरच व्यवहार होईल. अन्यथा व्यवहार रद्द होईल आणि बँकेला सूचना मिळेल.
७. बिहेवियरल बायोमेट्रिक्स (Behavioral Biometrics)
Online Payment Security new rules मधील हा नियम खूपच इंटरेस्टिंग आहे. आता तुमची बँकिंग ॲप तुम्ही कशी टाईप करता, किती वेगाने टाईप करता, स्क्रीन कशी स्क्रोल करता अशा तुमच्या फोन वापरण्याच्या वैयक्तिक पद्धती वरून तुमची ओळख पटवणार आहे. जर एखादा स्कॅमर वेगळ्या पद्धतीने फोन वापरत असेल, तर ॲप लगेच ते डिटेक्ट करेल.
८. मोठ्या व्यवहारांसाठी आधार आणि बायोमेट्रिक्स बंधनकारक
जर तुम्हाला ५ लाख, ८ लाख किंवा १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करायचा असेल, तर आधार लिंकिंग, बोटांचा ठसा (फिंगरप्रिंट) किंवा चेहऱ्याचे स्कॅनिंग करणे अनिवार्य असेल. याशिवाय मोठ्या रकमेचे पेमेंट शक्य होणार ना
थोडक्यात काय?
१ एप्रिलपासून लागू झालेल्या Online Payment Security new rules मुळे तुमचे Online व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. हो, अधिकच्या process मुळे तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते, पण तुमचे कष्टाचे पैसे यामुळे सुरक्षित राहणार आहेत.
हे सर्व नियम तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ आणि बँकिंग फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून वाचवण्यासाठी आणले आहेत.
आता ही माहिती फक्त तुम्हीच वाचून थांबू नका, तर आपल्या आई-वडील, नातेवाईक आणि मित्रांनाही नक्की शेअर करा. स्वतः जागरूक व्हा, आणि इतरांनाही जागरूक करा.
तुम्ही यापैकी कोणता नियम सर्वात उपयुक्त वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा.
हे ही वाचा:▶️ Government Employees Crypto investment करू शकतात का? कायदा काय सांगतो?▶️500 रुपयांची SIP कशी सुरू करावी?

