Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

महापौर पद भूषवून वेल्डिंग च्या मूळ व्यवसायाकडे परतले हे – welder Mayor of Gujarat



‘welder Mayor of Gujarat’ अर्थात भरतभाई वारद, हे नुकतेच गुजरात मधील भावनगर शहराच्या महापौर पदावरून पायउतार झाल्यानंतर स्वतःच्या मूळ वेल्डींग व्यवसायाकडे वळले आहेत. आपल्या छोट्याशा वेल्डिंग दुकानात ते आनंदाने काम करताना दिसतात. त्यांची ही कहाणी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि तत्वशीलतेची साक्ष देते.

कोण आहेत भारतभाई वारद?


भारतभाई वारद हे मूळचे गुजरातमधील भावनगर येथील रहिवासी. कष्टकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई फुलांचे हार विकण्याचा व्यवसाय करीत असे. आईच्या स्वभावाला अनुसरुन पुढे भारत भाई ही स्वयं रोजगार शिकले.आज गेली चार दशके ते वेल्डिंग व्यवसायात आहेत.

आज वयाच्या पन्नाशीत असलेले भारतभाई मूळचे एक मेहनती असे तंत्र कुशल कामगार आहेत. त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे वेल्डिंग.  BJP मधे सामान्य  कार्यकर्ता म्हणून काम करत असतानाच उदरनिर्वाहासाठी ते लोखंडी संरचना व सामुग्री जोडण्याचे काम ही  करत होते. त्यांचे शिक्षण फक्त S.S.C. पर्यंत झाले आहे. पण शिक्षण मर्यादित असले तरी समाजकार्याची त्यांची तळमळ मोठी होती. BJP पक्षात Grass root level ला अनेक वर्षे काम करत असताना केवळ लोकांच्या प्रेमा मुळे ते सर्व प्रथम नगरसेवक बनले.


राजकीय कारकीर्द


भारत भाईंनी स्वतःची  राजकीय कारकीर्द अतीशय खालच्या पातळीपासून सुरू केली. भारत भाई वरद हे साधे वेल्डर म्हणून काम करत असताना BJP ने आपल्या या तत्वनिष्ठ कार्यकर्त्यास नगरसेवक केले. त्यानंतर पुढे ते भावनगर महापालिकेच्या सभापतीपदीही विराजमान झाले. नुकतेच त्यांनी  भावनगरचे महापौर म्हणूनही काम पाहिले. सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२६ या त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली, विशेषत: सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला. मात्र, राजकारणातील पदे तात्पुरती असतात, हे त्यांनी जाणले.आपण केवळ एक लोकसेवक आहोत या भावनेने त्यांनी महापौर बंगल्यावर रहाण्याचे नाकारून ते भाड्याच्या छोट्या घरातच राहिले.

पुन्हा वेल्डिंगकडे परत


महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारत भाईं थेट आपल्या मूळ जीवन शैली कडे वळले. ना बंगला, ना गाडी, ना राजकीय पेंशन. ते सरळ आपला मूळ व्यवसाय वेल्डिंग कडे वळले. भावनगर चे माजी महापौर आज ते स्वतःच्या छोट्या दुकानात वेल्डिंगची कामे करताना दिसतात. एक ‘welder Mayor of Gujarat’ म्हणून ओळखले जाणारे भारतभाई सांगतात, “राजकारण हा योगायोग होता, वेल्डिंग हा माझा स्वभाव. कष्टाने कमवून खाण्यात जे सुख आहे, ते सुख सत्तेत नाही.”असे ते ठामपणे सांगतात.

साधेपणा आणि तत्वशीलता

भारत भाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नम्रता. ते स्वतः आपल्या हाताने स्वतःचे जेवण बनवतात. महापौर असतानाही त्यांनी कधी भपकेबाजी केली नाही. लोक त्यांना ‘भाई’ म्हणून हाक मारतात. वेल्डिंग च्या कामामुळे आजही त्यांचे अंगठे काळे झालेले दिसतात . भारत भाई म्हणतात, “पद हे एक ओझे असते, आपण आपले कर्तव्य करणे हाच खरा आनंद आहे.” त्यांचा हा विचार अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

समाजासाठी संदेश

भारतभाई वारद यांचे उदाहरण पाहून आपल्याला कळते की एखादी व्यक्ती कितीही उच्च पदावर असली तरी ती आपल्या जीवन मूल्यांशी  एकनिष्ठ राहून नम्र राहू शकते. राजकारणातील लाटा आल्या गेल्या, पण भारतभाई आजही तेच आहेत .एक प्रामाणिक वेल्डर. त्यांची गोष्ट सर्व राजकारणी आणि सामान्यांना शिकवण देते: खरे यश म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे. आणि म्हणूनच, ‘welder Mayor of Gujarat’ हा किताब त्यांना खूप शोभतो.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment