सध्या महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे. हवामान खात्याचे अंदाज यंदा पाऊस कमी पडेल असे सांगत आहेत. अशा वेळी नकळत एक जुनी आठवण मनात आली ‘अग्निपथ’ चित्रपटातील कांचा आणि त्याच्या तोंडी असलेले “ये रे ये रे पावसा” हे मराठी बालगीत.
Ye re ye re pawasa Sanjay Dutt-अनेकांना माहिती नसेल, पण अग्निपथ-2 (2012) या चित्रपटाचा सहसंवाद लेखक म्हणून काम करताना मला एक लक्षात राहणारा मराठी संस्कृती चा संदर्भ कांचा या पात्राला देण्याची संधी मिळाली होती. खलनायक कांचा साकारत असलेल्या संजय दत्त यांच्या तोंडी मी प्रसिद्ध मराठी बालगीत “ये रे ये रे पावसा” वापरण्याचा सल्ला दिला होता. पुढे तो चित्रपटाचा भाग बनला आणि प्रेक्षकांच्या लक्षातही राहिला.
विरोधाभासा मधली नाट्यमयता
हे बालगीत आपण लहानपणी घराच्या अंगणात हात पसरून गिरक्या घेत निरागसतेने म्हटलेले आहे. पण जेव्हा तेच शब्द कांचा सारखा क्रूर आणि भयावह खलनायक उच्चारतो, तेव्हा त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. बालपणाची आठवण करून देणारे पाऊस गाणे अचानक अनपेक्षित संदर्भात आपल्याला भेटते.
हा दचकवणारा विरोधाभासच (contradiction) नाट्यमयतेचा जनक असतो. कदाचित म्हणूनच Agneepath 2 मधील कांचा चा तो प्रसंग अनेक प्रेक्षकांच्या स्मरणात आजही जिवंत आहे. संजय दत्त यांच्या कांचा ने पडद्यावर निर्माण केलेली दहशत इतकी प्रभावी होती की अनेक चित्रपटप्रेमी आजही त्या भूमिकेला हिंदी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी खलनायकां पैकी एक मानतात. असा Mighty Villain जेंव्हा एक पावसाचे बालगीत म्हणत पडद्यावर दिसतो तेंव्हा त्याचा विक्षिप्त पणा अधिकच गडद होतो. पैसा हा खलनायकांची मुख्य प्रेरणा व ध्येय असते. पैशासाठी ते काहीही करायला कचरत नाहीत. कांचा चा हा Money Centric devilish विचार या पाऊस गीता मुळे अधोरेखित होतो.
खालील रील मधे हा नाट्यमय प्रसंग जरूर पहा
संजय दत्त यांच्या आयुष्यातील पाऊस
पावसाचा आणि संजय दत्त यांचा संबंध फक्त अग्निपथ पुरता मर्यादित नाही. त्यांच्या कारकिर्दीत पावसाशी जोडलेले अनेक संस्मरणीय क्षण आहेत. खलनायक मधील भावनिक वातावरण असो, साजन मधील प्रेमळ गाणी असोत किंवा वास्तव सारख्या चित्रपटांतील उदास आणि गंभीर प्रसंग पाऊस अनेकदा कथेला अधिक प्रभावी बनवताना दिसतो.
हिंदी चित्रपटांमध्ये पाऊस हा केवळ ऋतू नसतो; तो भावना व्यक्त करणारे एक स्वतंत्र पात्र असते. संजय दत्त यांच्या इतर चित्रपटांत हा पाऊस होता पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी झंजावाती हजेरी लावली आहे
संजय दत्त आणि पाऊस
कलाकारांचे आयुष्य चढ उतारांचे असते. पावसा आधी संजय दत्त ने ही वैशाख पाहिला आहे. संजय दत्त ने तशा चुकाही केल्या होत्या. AK 56 Assault Rifle (A K 47 या मिखाईल कलाश्निकोव यांच्या रायफल चे चायनीज वर्जन) केस, अंमली पदार्थांचे व्यसन है त्याच्या आयुष्यातील मोठे काळे अध्याय. संजय दत्त उत्कृष्ट अभिनेता कधीच नव्हता पण संवेदनशील दिग्दर्शकांबरोर काम करताना त्याने आपल्या अभिनयाचा प्रत्यय दिला आहे. महेश भट यांचा ‘नाम’ चित्रपट आठवून पहा. संजय दत्त चे चित्रपट पाहिले तर त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्यात असे दिसते. सुरूवातीच्या काळात ” आखिर तुम्हे आना है…जरा देर लगेगी” या पाऊसगीतात अभिनेत्री बरोबर clumsy dance करताना पाहून त्याची थट्टा ही झाली.याच संंजय दत्त ने पुढे माधुरी दिक्षित सोबत ‘तम्मा तम्मा’ गाण्यावर नृत्य केले होते..
पावसाने कितीही ओढग्रस्ती दिली तरी ” आखिर तुम्हे आना हे” हा आत्मविश्वास ठेवणे गरजेचे असते. पाऊस येईलच.. तोपर्यंत ” ये रे ये रे पावसा ‘ म्हणूया….
हे ही वाचा :
➡️प्यासा मधला गुरूदत्त यांचा दरवाजातला शॉट -किस्सा Pyasa Cinematogrphy चा
➡️Dhurandhar Sanjay Dutt Entry: VFX च्या अति-सुरक्षित वापरामुळे ‘हवा हवा’ झालेली ‘धडाकेबाज’ एन्ट्री!
➡️Dhurandhar – हीरो पेक्षा Akshay Khanna चा खलनायक का गाजतो आहे? – सिने लेखकाचा दृष्टिकोण

