Old Bollywood Trivia: Shammi Kapoor Incident -१८ एक वर्षांचा समशेर R K Studio मधे अभिनेत्री ला पहिल्यांदाच भेटत होता.मेक अप रूम मधे ती उदास बसलेली होती . तिला दिलासा देण्यासाठी तो म्हणाला..मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करीन यावर अभिनेत्री म्हणाली..”जर तुझी प्रार्थना ऐकली गेली तर मी तुला एक Kiss देईन!”
समशेर म्हणजे राज कपूर यांचा लहान भाऊ जो पुढे शम्मी कपूर नावाने प्रसिद्ध झाला-
५० च्या दशकातील आपल्या कुमार वयातील मजेशीर किस्सा शम्मी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे. ही मुलाखत इंस्टाग्राम च्या @hindifilmography या अकाउंट वर शेअर केली गेली आहे.
या मुलाखतीत शम्मी कपूर एक गमतीशीर teen age life incident सांगताना दिसतात. “या घटणेमुळे माझ्या आयुष्यात संगीत आले” असेही ते नमूद करतात
शम्मी कपूर आणि नर्गिस -बरसात च्या सेटवर पहिली भेट
नर्गिस या अभिनेत्री सोबत र्शम्मी कपूर यांचे थोरले भाऊ राज कपूर यांनी बरसात चित्रपटाचे शूटिंग त्यांच्या चेंबूर च्या RK Studio मधे सुरू केले होते.१९४८ सालचा ‘आग’ हा त्यांचा पहिला चित्रपट अपयशी ठरला होता. राज कपूर यांनी बरसात चे शूटिंग सुरू असतानाच आगामी ‘आवारा’ चित्रपटाची घोषणा केली होती.१८ वर्षांचे समशेर अर्थात शम्मी कपूर बरसात च्या सेटवर जात असत. अशाच एका भेटीत शम्मी कपूर यांनी नर्गिस ची मेक अप रूम मधे भेट घेतली
काय आहे बरसात च्या सेटवरचा किस्सा -Old Bollywood Trivia : Shammi Kapoor Incident
तरूण शम्मी कपूर बरसात च्या सेटवर नर्गिस ला भेटण्यासाठी तिच्या मेकअप रूम मधे गेले तेंव्हा ती उदासपणे रडत असल्याचे त्यांनी पाहिले. आपली ओळख ” मी समशेर! राजकपूर यांचा भाऊ!” अशी करून देताच..”हो मी तुला ओळखते” असे नर्गिस उत्तरली. शम्मी कपूर यांनी तिला ” तू का रडतेस?” असे विचारल्यावर नर्गिस ने “राजकपूर यांच्या आगामी ‘आवारा’ चित्रपटात मला काम करण्याची खूप इच्छा आहे पण माझे आई वडील यास संमती देत नाहीत ” असे सांगितले.यावर शम्मी कपूर म्हणाले ” तू देवाकडे प्रार्थना कर..तुझी इच्छा पूर्ण होईल!”..शम्मी कपूर चे हे शब्द नर्गिस ला दिलासा देवून गेले. ” तू ही माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना कर!.. जर माझी इच्छा पूर्ण झाली ना तर मी तुला एक Kiss देईन!” असं नर्गिस कुमार वयीन शम्मी कपूर ना सहज बोलून गेली.
नर्गिस ची इच्छा पूर्ण झाली
वर्षभरातच ‘बरसात’ चित्रपट रिलीज झाला आणि त्याला प्रचंड यश मिळाले. राज कपूर यांनी लगेचच ‘ आवारा’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. आवारा मधे त्यांची नाईका होती नर्गिस. नर्गिस ची इच्छा पूर्ण झाली होती. अशातच एक दिवस समशेर (शम्मी कपूर) आवारा च्या सेट वर पोहोचला. त्याने नर्गिस जवळ जाऊन ” तू मला ओळखलेस का?” असे विचारले. नर्गिस “Yes ! …but ..NO..NO ..NO !” असं म्हणत पळू लागली. दीड दोन वर्षांच्या अंतरानंतर शमशेर च्या व्यक्तीमत्वात आलेली maturity पाहून नर्गिस ने दिलेले आश्वासन पाळले नसावे हे निश्चित..
Kiss च्या बदल्यात वीस ग्रामोफोन रेकॉर्ड घेण्याचा प्रस्ताव
नर्गिस ने आता समशेर पुढे तू मला इतर काही ही माग असा प्रस्ताव ठेवत त्याला चर्चगेट च्या HMV च्या showroom मधे घेवून गेली. तिथे एक लाल रंगाचा ग्रामोफोन रेकॉर्ड प्लेअर समशेर ने पसंद केला जो नर्गिस ने त्याला भेट दिला. इथून ते काला घोडा परिसरातील प्रसिद्ध Rhythem House store मधे गेले. नर्गिस ने “तू तूझ्या आवडीच्या कुठल्या ही २० ग्रामोफोन रेकॉर्ड घे असे सांगितले” तरूण समशेर ला ही पर्वणीच वाटली.
तरूणपणी शम्मी कपूर Latino Music चे प्रेमी
शम्मी कपूर यांनी आपला हा गमतीशीर Teen age life incident सांगताना असे सांगितले की त्यांनी नर्गिस यांची offer स्वीकारत 20 Latino Music च्या रेकॉर्ड्स Rhythm house मधे घेतल्या ज्यात Rumba ,Samba, Bolero या Latino संगीत प्रकाराच्या रेकॉर्ड्स होत्या. त्या काळात हे संगीत Ball Room dance साठी प्रसिद्ध होते.
२० ग्रामोफोन रेकॉर्डस् नी शम्मी कपूर यांच्या आयुष्यात संगीत आणले
शम्मी कपूर या मुलाखतीत सांगतात की या नर्गिस दत्त यांच्या कडून मिळालेल्या 20 रेकॉर्ड्स ने माझ्या आयुष्यात संगीत आले. घराच्या टेरेस वर लाल ग्रामोफोन रेकॉर्ड प्लेअर वर ते एकटेच तासनतास ही Latino गाणी ऐकत व या गाण्यांवर अभिनय करत. आपल्या चित्रपटातील गाण्यांमधील expression साठी शम्मी कपूर पुढे प्रसिद्ध झाले. यामागे नर्गिस च्या Kiss च्या बदल्यात मिळालेल्या या वीस ग्रामोफोन रेकॉर्ड चा हात आहे … शम्मी कपूर यांचा हा गमतीशीर Old Bollywood Trivia त्यांच्याच शब्दात खालील लिंक वर जरूर पहा.
FAQ:
शम्मी कपूर यांचे मूळ नाव काय आहे?
शम्मी कपूर यांचे मूळ नाव समशेर राज कपूर असे होते. चित्रपटात येण्यापूर्वी ते याच नावाने ओळखले जात होते.
शम्मी कपूर यांच्या डान्सिंग स्टाईलवर कोणत्या संगीताचा प्रभाव होता?

तरूणपणी शम्मी कपूर यांना ‘Latino Music’ (Rumba, Samba, Bolero) ऐकण्याची प्रचंड आवड होती. Elvis Presley यांच्या Rock संगीताने ते खूप प्रभावित होते.
राज कपूर यांचे किती भाऊ होते?

राज कपूर यांचे शम्मी कपूर व शशी कपूर असे दोन भाऊ होते. शम्मी(समशेर) हे दुसरे व शशी हे सर्वात धाकटे होते.
हे ही वाचा:
▶️मेकअप कलेचे दादा :पंढरीदादा legendary makeup artist of Bollywood

