Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

ऋषी कपूर : ” रायटर को बुलाओ!” म्हणणारा Last Roman -Agneepath 2

ऋषी कपूर यांची Agneepath 2 सेटवरची आठवण

अग्निपथ 2 चित्रपटामधे सह संवाद लेखक म्हणून मी (अविनाश घोडके) काम करत होतो.. ऋषी कपूर यांच्या संवादात मी लिहिलेला एक शब्द ऋषी कपूर यांना अनोळखी वाटला. या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी “रायटर को बुलाओ!” असं म्हणत त्यांनी शूटिंग थांबवलं होतं..

Written by – Avinash Bhanu Asha Ghodke – सह संवाद लेखक Agneepath 2

ऋषी कपूर : " रायटर को बुलाओ!" म्हणणारा Last Roman -Agneepath 2
Rishi Kapoor as Rauf Lala in Agneepath

डॉ. आंबेडकरांचे स्मारक जिथे निर्माणाधीन आहे त्या दादर चौपाटी जवळच्या इंदू मिलमधे Agneepath 2 चं शूटिंग सुरू होतं.‌ रौफ लाला नावाच्या Don चे पात्र ऋषी कपूर अभिनीत करत होते. त्यांना मी लिहिलेल्या संवादाचा कागद दिला गेला होता..ते वाचत होते.आशातच संवादातील एक शब्द त्यांना खटकला.“उठाईगिरा !? … ये क्या वर्ड है? मैने तो कभी नहीं सुना .. रायटर को बुलाओ यार !”……..ऋषी कपूर यांनी लेखकाशी बोलल्या शिवाय मी हा संवाद बोलणार नाही असा पवित्रा घेतला होता. शूटिंग खोळंबले होते..

दृश्य असे होते..

‘अग्निपथ’ 2 च्या सेटवर ऋषी कपूर यांची चिड चिड सुरू झाली होती. रौफलाला हे ऋषी कपूर रंगवत असलेले पात्र कांचा या संजय दत्त अभिनित पात्राला त्याच्या तोंडावर ‘उठाईगिरा’ असं संबोधून अपमानित करतो असा संवाद मी लिहिला होता. पटकथे नुसार ड्रग्स व्यवसायातील भागिदारीवर बोलणी करणयासाठी कांचा स्वतः रौफ लाला च्या कार्यालयात त्याच्या समोर बसलेला असतो. कांचा ने दिलेला प्रस्ताव न पटल्यामुळे रौफ लाला चिडतो व कांचा चा अपमान करतो असा Confrontation Scene चित्रित होणार होता.

करण मल्होत्राचा ठाम निर्णय

करण मल्होत्रा चा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. असे असूनही तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्याने

Veteran actor Rishi Kapoor posing as a ruthless villain Rauf Lala . He is looking straight in camera with fire in his eyes

ऋषीजींना आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकेनात . “ रायटर को बुलाओ” असं म्हणत राहिले. मी गेलो तर ऋषीजी मला उठाईगिरा शब्द बदलायला भाग पाडतील असे करण मल्होत्रा ला वाटले असावे. नक्की कारण माहित नाही पण करण मल्होत्रा ने मला त्यांच्यापुढे नेणे टाळलं. अखेर ऋषीजींनी मी लिहिलेला तो  ‘उठाईगिरा’ शब्द convincingly आपल्या संवादात उच्चारला. उठाईगिरा शब्द ‘उठाईगर’ असा ही म्हटला जातो.या हिंदी शब्दाला मराठी मधे ‘ उचल्या’ असा प्रतिशब्द आहे. छोट्या मोठ्या चोर्या करणारा ‘भुरटा चोर’ ज्याची गुन्हेगारी जगतात विशेष अशी कामगिरी नाही असा माणूस म्हणजे ‘उठाईगिरा’ .आजकालच्या मुंबईया भाषेत याला ‘ चिंधी चोर’ ही म्हटले जाते. रौफलाला हा अंदाजे ७० च्या दशकातला मुंबईतला Don आहे. त्याच्या dialogues मधे उर्दु शब्द येणे स्वाभाविक होते व ते त्याच्या व्यक्तीमत्वाला शोभत ही होते. चिंधीचोर हा शब्द त्याच्या संवादात शोभला नसता म्हणून मी तो वापरला नाही. त्याऐवजी ‘उठाईगिरा’शब्द वापरला. प्रत्येक शब्द समजून घेणे ही जुन्या पीढीच्या नटांची पद्धत आहे. ऋषी कपूर यांनी या old school चा नियम पाळला होता. मला व्यक्तीश: त्यांच्या या वागण्यात कुठली ही चूक आढळली नव्हती. जुन्या लोकांच्या काही गोष्टी आपणही आत्मसात करायला हव्यात असे ही मला वाटले.

ऋषी कपूर यांचे Switch on -Switch off हे अभिनय तंत्र

Switch on-Switch off म्हणून अभिनयाची एक जुनी पद्धत आहे. ज्या अभिनेत्यांच्या व्यक्तीमत्वाचा खूप असा प्रभाव जनमानसावर असतो असे स्टार अभिनेते सहसा अभिनयाची ही पद्धत वापरतात. यात भूमिकेचा गृहपाठ वगैरे करायचा नसतो. दिग्दर्शकाने ॲक्शन म्हणताच पूर्ण शक्तीनिशी कॅरेक्टर मधे स्वत:ला झोकुन द्यायचं . दिग्दर्शकाने कट म्हणताच पुन्हा Character mindset मधून बाहेर. ऋषीकपूर असं spontaneous अभिनय करण्यात बाप माणूस होते. या अभिनय तंत्रात काम convincing level ला आणन्यासाठी खूप ताकद लागते . शिवाय व्यक्तीमत्वात एक Aura असावा लागतो. प्रेक्षकांचे तुमच्या वर प्रेम असावे लागते.हे सर्व ऋषी कपूर यांच्याकडे होते. रौफ लालाचे पात्र ही त्यांनी याच ताकदीच्या जोरावर लीलया पेलले.

ऋषी कपूर यांनी Agneepath 2 मधील Negative भूमिका नाकारली होती

खरंतर ऋषी कपूर यांच्याकडे Agneepath 2 ची ही भूमिका घेवून जेंव्हा करण मल्होत्रा गेला होता तेंव्हा त्यांनी ही खलनायक रौफ लालाची ही भूमिका नाकारली होती. “एके काळी Romantic Hero म्हणून प्रेक्षकांनी मला पाहिलय तेच प्रेक्षक मला अता अशा खलनायकी भूमिकेत स्वीकारतील का?” असा रास्त प्रश्न त्यांनी करण पुढे ठेवला पण करण मल्होत्रा ठाम होता. अखेर ऋषीजींनी ‘हो’ म्हटले.बांद्र्याच्या मेहबूब स्टूडिओत करणने मला बोलावले होते .त्या दिवशी ऋषी कपूर यांची रौफ लाला च्या वेशभूषे मधे look test चालली होती. ऋषी जींचे ते transformation पाहून मी अवाक झालो. डोक्यावरचे बारिक पांढरे केस ,काॅटनचा कुर्ता, ढगळ पायजमा,पायात चपला,खांद्यावर रुमाल आणि सुरमा घातलेल्या डोळ्यातला तो अंगार..कसाई रौफ लाला अगदी जीवंत साकारला गेला होता. अग्निपथ २ मधील ऋषी कपूर यांचा रौफ लाला प्रेक्षकांच्या मनाच्या एका कप्प्यात कायमचा switch on राहिला आहे.

Bollywood मधल्या नव्या Corporate Culture बाबत ऋषी कपूर यांची चिडचिड

सिनेमा उद्योगात आलेल्या काॅर्पोरेट कल्चर बद्दल ऋषीजी नाराज असत. करारनाम्या मधील “अभिनेत्याला चित्रपट promotion साठी उपलब्ध रहावे लागेल ” या अटीवर त्यांचा विशेष राग होता. “ ॲक्टिंग भी करो .. प्रमोशन को भी आवो .. ये क्या बात हुवी !” असं ते म्हणत. हल्लीचे अभिनेते रात्रीपण गाॅगल का लावतात ? असा प्रश्न ही त्यांना पडे. रेडिओ शी मात्र त्यांची चांगली गट्टी जमली होती कारण त्यात जुनी गाणी लागत. ते Radio Adict होते.

पत्नी नीतू सिंग ने सांगितलेली आठवण

पत्नी नीतू बरोबर भांडण लागलं की ते हटकून इंग्रजीतला एखादा अनवट शब्द तिच्यावर फेकत. नीतू मग भांडण बाजुला ठेवून तो काय शब्द होता याचा विचार करत बसे. नेमकं काय बोलला असेल नवरा? .. मग डिक्शनरी उघडली जायी .. शाब्दिक भांडण English vocabulary development कडे वळे. ऋषी कपूर तिकडे निवांत रेडिओ ऐकत बसत. भांडणातला नवर्याचा शब्द न कळण्याने नीतूजींना होणार्या त्रासाची एक झलक नियतीने माझ्या ‘उठाईगिरा’ शब्दातून ऋषी कपूर यांना दिली असावी का?

लेखका वरचा विश्वास

अग्नीपथ च्या त्या प्रसंगाच्या वेळी “ Kapoor’s च्या डिक्शनरीत ‘उठाईगिरा’ शब्द नसावा “असं दिग्दर्शक करण मल्होत्रा हताशपणे बोलला होता . ‘उचलेगिरी करणारा माणूस’ अशा अर्थाचा शब्द कपूरांच्या डिक्शनरीत असावा तरी का? कपूर या शब्दातच एक Production Value आहे. या कपूरांनी सिनेजगतात ज़्याला हात लावला त्याचे सोने केले. कामातून शंभर टक्के देणे एवढच त्यांना माहित होते. ऋषीजींच्या “ रायटर को बुलाओ” या वाक्यात खरतर लेखकावरचा विश्वास जास्त प्रतीत होतो. ही Old School thinking लेखकाला केंद्रस्थानी मानते. लेखकाला काय म्हणायचय हे समजून घेण्यात यांना रस असतो. हेच त्यांचं एकमेव ‘मेथड’ असतं. टॅक्सी ड्रायव्हर चा रोल करायचाय म्हणून ते टॅक्सी चालवत बसत नाहित. भूमिकेसाठी सहा महिन्यात बॉडी बनवणंही त्यांना जमत नाही. आपल्या Aura सकट पात्रामधे धाड़कन उड़ी घेणार्या old school पीढीतले ऋषि कपूर हे ‘ लास्ट रोमन’ असावेत …….ज्या पीढीत अडचणीच्या प्रसंगी “ रायटर को बुलाओ !” असं म्हणन्याची जुनी परंपरा होती. जुन्या परंपरांना मानणारा शेवटचा माणूस या अर्थानेच मी ऋषी कपूर यांना LAST ROMAN असे शिर्षकात संबोधले आहे.

ऋषी कपूर : " रायटर को बुलाओ!" म्हणणारा Last Roman -Agneepath 2

FAQ :

Agneepath 2 व Agneepath 1 ची कथा एकच होती का?

दिग्दर्शक करण मल्होत्रा ने अग्निपथ 1 ची कथा जशीच्या तशी न वापरता story plot व Charachter design मधे बदल केले होते.

अमिताभ बच्चन यांच्या Agneepath 1 ला व्यावसायिक यश मिळाले होते का?

नाही . Agneepath 1 व्यावसायिक दृष्ट्या अपयशी ठरला होता. याउलट ह्रितिक रोशन अभिनित Agneepath मात्र Block Buster ठरला . या चित्रपटाने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच १०० करोड हून अधिक नफा मिळवला होता.

Agneepath 2 चित्रपटाचे वैशिष्ट्य काय?

1)Agneepath 2 ने हिंदी चित्रपट सृष्टीत 100 करोड + चा नफा कमावणारा पहिला चित्रपट आहे.
२) Agneepath 2 हा Celluloid (फिल्म) वर चित्रित झालेला शेवटचा बिग बजेट Cinema आहे.

हे ही वाचा:

▶️Priyanka Chopra चा मराठी संवादांसाठी होता हट्ट- AGNEEPATH 2 – BTS

▶️Agneepath BTS -Villain च्या प्रेमात पडलेला दिग्दर्शक । Karan Malhotra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “ऋषी कपूर : ” रायटर को बुलाओ!” म्हणणारा Last Roman -Agneepath 2”

Leave a Comment