Dharmendra हे आपल्या प्रेमळ स्वभावा साठी प्रसिद्ध होते. ते कधीच औपचारिक वागले नाहित. क्वचित प्रसंगी त्यांनी आपला राग ही तितक्याच तीव्रतेने व्यक्त केला.स्टार असूनही त्यांनी आपले माणूसपण उघडपणे व्यक्त केले…

Dharmendra ला घेऊन परतलेली फ्रंटियर मेल……editorial लेख
1928 साली एक मेल ट्रेन सुरू केली होती ब्रिटिशांनी … फ्रंटियर मेल.. थेट आत्ताच्या पाकिस्तानमधील पेशावरहून मुंबईला यायची. कोळशाच्या इंजिन वरच्या चिमनी तून भकाभक धुराची रेषा आकाशात ओढत ही गाडी लुधियाना च्या नसराली गावा जवळून जात असे. दोन दशकांचा काळ असाच लोटला . आता नसराली चा एक जाट तरूण याच गाडीने मुंबईला जायची स्वप्नं पाहू लागला. त्याला हिंदी सिनेसृष्टीत हिरो बनायचे होते. फ्रंटीयर मेल मग त्याला घेवून मुंबई ला आली. तेंव्हा फ्रंटियर मेल आताच्या CSMT ला न थांबता पुढे जाऊन बेलार्ड पियर ला शेवटचा स्टाॅप घेई. ही पुढची रेल्वे लाईन आता उखडुन टाकली गेलीय. फ्रंटीयर मेलचा रूट ही बदलला.. आणि आकसला … फ्रंटीयर मेलचे नाव बदलून गोल्डन टेंपल झाले. दरम्यान जाट तरूण हिंदी सिनेसृष्टीत खूप मोठा स्टार झाला. कोमल मनाचा He Man धर्मेंद्र अशी त्याची प्रतिमा तयार झाली.
धर्मेंद्र चा मनस्वी स्वभाव
Dharmendra -मातीशी नातं आणि दारू वरच प्रेम
धर्मेंद्र आपल्या मातीला विसरला नाही.नसराली ,लुधियाना हून येणार्या लोकांसाठी धर्मेंद्र च्या बंगल्यात कायमची विशेष व्यवस्था असे. धर्मेंद्र यांनी अब्जाधीशांशी व बड्या राजकारण्यांशी मैत्री केली नाही. डिप्लोमसी व स्वार्थ त्यांना माहित नव्हता. दारू मात्र धर्मेंद्र यांचा वीक पॉइंट होता. ही गोष्ट त्यांनी कधी लपवली ही नाही. एका फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याला धर्मेंद्र यांनी अगदी पहिल्या रांगेत दारू च्या ग्लासा सकट हजेरी लावली होती. खार च्या कोळी वाड्यात एक आंटीचा गुत्ता होता . इथे वेगवेगळ्या फळांच्या फ्लेवर मधे हातभट्टी ची दारू मिळे. अशी वंदंता होती की धर्मेंद्र यांना ही मदीरा प्रिय होती..ही Star endorsement ऐकून मी ही एकदा उत्सुकते पोटी मित्रांबरोबर या मदिरालयाला भेट दिल्याचे आठवते. मांजरींनी भरलेलं ते घर होतं. वयस्क व वजनदार आंटी पलंगावर पडल्या पडल्या मांजरींशी संवाद साधत होती . “पैर दबाव मेरा ” असं म्हटलं की मांजरी पूढच्या दोन इवल्या पावलांनि आंटी चे पाय दाबत.इथुन धर्मेंद्र च्या बंगल्या वर एखादा ‘ब्रॅंड’ जातो का ? असं आंटीला विचारायचं धाडस झालं नाही.असेल ही नसेलही ..पण धर्मेंद्र ने जे केले ते मनापासून.
गरम धरमचा राग
Dharmendra यांनी क्वचित राग ही केला , तो ही मनापासून. पत्रकार देवियानी चौबळ हिच्या बेधडक रिपोर्टिंग ने भडकलेला गरम धरम तिला मारायला धावला होता असे कळते. धर्मेंद्र हळव्या मनाचा माणूस होता .आपला मुलगा बॉबी Negative भूमिका करतो हे धर्मेंद्र यांना आवडत नसे. बॉबी चे हे चित्रपट “मैं नही देख सकता ” असे म्हणत त्यांनी टाळले .धर्मेंद्र यांच्या अभिनयाबद्दल व चित्रपटांबद्दल खूप लीहिता येईल पण धर्मेंद्र या माणसाबद्दल लीहिणे आज जास्त महत्वाचे आहे. कारण अशी चेहर्यावर मुखवटा नसलेली माणसं आता भेटणे कठीण आहे. फ्रंटीयर मेलने मुंबईत आलेली एक पीढी अशीच होती .. खरा सिक्का वाजतो तशी खनखणीत वाजणारी. धर्मेंद्र हे त्या पीढीतलं शेवटचं नाणं. हॉलिवूड नायका सारखं व्यक्तीमत्व लाभलेला धर्मेंद्र आपल्या प्रेमळ आर्जवी स्वरात म्हणायचा …
“कोई मुझसे हाथ मिलाता है तो मैं उसे गले लगाता हूं.”
धर्मेंद्र चं जाणं
माझ्या गोव्याच्या एका मदिरा प्रेमी मित्राला Dharmendra फार आवडायचा. घराजवळच्या कांदोळी चर्च रस्त्यावर लहानपणी त्याने धर्मेंद्र आणि अमिताभ यांचे ‘इक रस्ता-दो राही’ हे गाणं चित्रित होताना पाहिलं होतं .”धर्मेंद्र को मिलना है यारा!” असं तो नेहमी म्हणायचा. मी एकदा उगीचच सहजतेचा आव आणत म्हटलं..”उनके पनवेल फार्म हाऊस पर जायेंगे.. Gate crashing करेंगे!” धर्मेंद्र या व्यक्तीमत्वाशी साजेसा असा power word मी वापरला होता पण अभिनयात कमी पडलो होतो हे मित्राच्या नजरेत दिसलं. वर्षभरा पूर्वी हा मित्र गेला. त्याची अंतयात्रा त्याच कांदोळी चर्च रस्त्यावरून चर्च ग्रेवियार्ड कडे गेली होती. काल धर्मेंद्र ही गेले. काळाचं इंजिन धडधडत पुढे पुढेच जात असतं. ते थांबत नाही. कुणासाठीच.
धर्मेंद्र -काळाच्या पुढचा नट व माणुस
९० वर्षांपूर्वी फ्रंटीयर मेल मुंबईतल्या आजच्या शेवटच्या स्थानकाहून पुढे जाऊन थांबायची…कारण तिला माहित होतं तिच्यातून उतरणारी ही माणसं काळाच्या पुढची होती. धर्मेंद्र परतीच्या प्रवासाला निघालेत ..अथक चालणारं काळाचं इंजिन धर्मेंद्र यांना फार पुढच्या गंतव्यावर नेऊन सोडो.. जिथे ते प्रत्यक्ष ईश्वराची गळाभेट घेतील.
९० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी सूरू केलेली ट्रेन ‘फ्रंटियर मेल’ मुंबईतल्या आजच्या शेवटच्या स्थानकाहून पुढे जाऊन थांबायची…कारण तिला माहित होतं तिच्यातून उतरणारी ही माणसं काळाच्या पुढची होती. धर्मेंद्र परतीच्या प्रवासाला निघालेत ..अथक चालणारं काळाचं इंजिन धर्मेंद्र यांना फार पुढच्या गंतव्यावर नेऊन सोडो.. जिथे ते प्रत्यक्ष ईश्वराची गळाभेट घेतील.
Blockbuster शोले चित्रपटातील अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांचे एक दृश्य..

लेखक अविनाश घोडके सिने लेखक आहेत
हे ही वाचा:
▶️ Don चा director Chandra Barot. टांझानिया मधील बॅंक कर्मचारी दिग्दर्शक कसा झाला.
▶️Vinod Khanna.Handsome Bollywood अभिनेता- लंबी रेस का घोडा


खुप सुरेख माहिती 👏🏻
Thanks
Thanks 🙏